सच्च्या प्रीतीसाठी तहानलेली जीवनाच्या वाटेवरील वाटसरु.....

Submitted by चित्रा राजेन्द… on

अंबिका सरकार ह्यांच्या ‘अंत ना आरंभही’ कादंबरीची नायिका, मराठी विषयाची प्राध्यापिका उषा. विसाव्या शतकाच्या, साठच्या दशकातील विवाहिता. पुरुषप्रधान समाजात जगताना तिला स्वत:ची खरी ओळख पटेपर्यंत उशीर होतो. वस्तुस्थिती काय आहे हे समजायला वेळ लागतो. आत्मभान जागं होईपर्यंतच्या काळात जास्तकरून वाईटच घडून गेलेलं असतं. त्या वाईटाने एक कमाल मर्यादा गाठल्यानंतर तिचं मन बंड करून उठतं. परिस्थितीशरण न होता परिस्थितीकडे डोळसपणे बघण्याचं भान तिला येतं.
बेटर लेट दॅन नेव्हर! एकदा जाग आल्यानंतर मात्र तिच्यातील बंडखोर स्त्री तिला स्वत:च्या विचारांप्रमाणे, इच्छेप्रमाणे कृती करण्यास भाग पाडते.

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ७२

पुस्तकाचे नाव

वेचा:

कशीबशी वाट संपते...आम्ही हॉस्टेलवर परत येतो-
हॉस्टेलची इमारत किल्ल्यासारखी...मधल्या काळात कुणाची तरी गढीच होती म्हणे ती. उंच निमुळती इमारत...काळ्याशार दगडांनी बांधलेली...समोर हिरवळ...मागे समुद्र. लाटांचा आवाज या शांत प्रहरी ऐकू येतो आहे. समुद्र आज खवळल्यासारखा वाटतो आहे -
एकदाचे आम्ही हॉस्टेलजवळ पोहोचतो. हिरवळीवरूनच हॉस्टेलकडे नजर टाकतो.
तो काळाकभिन्न किल्ला शांत झोपला आहे. फक्त एकाच खिडकीत उजेड -
खिडकीत एक उंच आकृती आमच्याकडे पाहत स्थिर उभी...चादर पांघरलेली, पांढुरक्या चेहर्‍याची.
क्षणभर आमच्या काळजाचा ठोका चुकतो.
मिलिंद मला बिलगतो.

संक्षिप्त आवृत्त्या - मराठी साहित्याला लागलेली एक कीड

Submitted by सागर on
पुस्तकाचे नाव

अलिकडेच मी काही जुनी पुस्तके नव्याने छापून बाजारात आली म्हणून उत्साहाच्या भरात विकत घेतली.
मी खरेदी करताना एकतर ऑनलाईन किंवा फोनवरुन ऑर्डर देऊन इकडे बंगळूरात मागवतो. अशा वेळी हा धोका लक्षात येत नाही. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेतल्यावर किमान कळते तरी की हातात काय कलाकृती आली आहे ते. असो पण मुद्दा तो नाहिये.

मुळात कोणत्याही कादंबरीचा अथवा पुस्तकाचा संक्षेप करणे हे योग्य आहे की अयोग्य?
माझ्यामते तरी कोणत्याही साहित्यकृतीचा दुसर्‍या लेखकाने संक्षेप करणे ही प्रचंड आक्षेपार्ह बाब आहे आणि संक्षिप्त आवृत्त्या या मराठी साहित्याला लागलेली ही कीड आहे.

सुहास शिरवळकर

Submitted by देवेन्द्र प्रभुणे on
पुस्तकाचे नाव

मित्रानो,
धन्यवाद!
एका पुस्तकाबद्दल माहिति हवी होती.
एक गुन्हेगार!
पलायन!
विमान प्रवास!
विमानाचे अपहरन!
सुट्का!
गुन्हेगार बनतो स्वामिजी!
rock band members as kidnappers!
swamiji marries lady left by her husband in aeroplane!
फार छान पुस्तक!
नाव आणि प्रकाशक समजतिल का?
धन्यवाद!

‘आर्तता’ ह्या सूत्राभोवती गुंफलेल्या दीर्घकथा...

Submitted by चित्रा राजेन्द… on

‘आर्तता’ ह्या सूत्राभोवती गुंफलेल्या दीर्घकथांचा हा संग्रह आहे. नातेसंबंधांतील विविधता हे ह्यातील कथांचं वैशिष्ट्य.
स्त्री-पुरुष नातेसंबंध, स्त्रीची घुसमट आणि स्त्री-स्वातंत्र्य (संक्रमण, बाबाची आई), विवाहबाह्य नातेसंबंध (जन्म), रक्ताच्या नात्यातील माणसांचे आपसांतील नातेसंबंध (श्रध्दा, रूट्स)
जन्म-मृत्यु ह्यासारख्या माणसाच्या हातात नसणार्‍या घटनांमुळे अस्ताव्यस्त होणारे आयुष्य
(नातं) अशा नात्यांतील विविधता दाखवणार्‍या ह्या कथा आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया आणि पुरूषांची माणूस म्हणून जगताना होणारी भावनिक आंदोलने ह्यात टिपली आहेत.

अभिजात साहित्य म्हणजे काय? - इति इटालो कॅल्विनो

Submitted by चिंतातुर जंतू on

माझ्या आसपास असणाऱ्या पुष्कळ जणांना वाचनाची किंवा चित्रपट पाहण्याची आवड असते. काहीतरी सकस पहावं/वाचावं अशी इच्छाही असते. स्वत:ची अशी काहीएक आवडनिवडसुद्धा असते. पण विशिष्ट प्रकारच्या पुस्तक/चित्रपटांविषयी त्यांच्या मनात अढी म्हणा, संशय म्हणा असं काहीतरी असतं. ते का वाचावं/पहावं याविषयी त्यांच्या मनात संभ्रम किंवा कधी कधी सरळ नकारच असतो, पण त्याविषयी जाणून घेण्याची इच्छाही असते. किंवा ते कळायला कठीण जाईल असं वाटत असतं, पण कळून घ्यायचे कष्टदेखील घेण्याच्या लायकीचं ते आहे का याची खात्री नसते. मग ते उदा. असे काही प्रश्न विचारतात.

आधुनिकोत्तर कादंबरी का वाचावी?
पाश्चिमात्य साहित्य का वाचावं?

लोकप्रिय आणि अभिजात साहित्य

Submitted by वल्ली on

नुकतीच या धाग्यावर लोकप्रिय आणि अभिजात साहित्यावर एक छोटेखानी चर्चा झाली होती. त्या धाग्यावर तो विषय अप्रस्तुत वाटल्याने या नविन धाग्यावर ही चर्चा सुरु करत आहे.

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ७१

".....मद्याचा परवाना मिळवण्यासाठी मी सरकारी इस्पितळातील त्या डॉक्टरना जाऊन भेटलो. त्यानी माझे वजन, उंची, जिभेचा रंग तपासला; ठराविक नमुन्याच्या अर्जात मी माहिती भरली. 'तुम्हाला मद्य प्यायला आवडतं का?' असं त्यानी विचारलं. काहीसं लाजत मी 'होय' म्हटलं. तेव्हा त्यानी अर्जात 'अल्कोहोल घेण्याची सवय आहे' असं लिहिलं. मला नीट झोप लागते की, रात्री मध्येच जाग येते नि बेचैन वाटते? असं त्यानी विचारलं. पण मी काही उत्तर देण्याच्या आधीच त्यांनी लिहिलं, 'निद्रानाशाचा विकार'. पुढचा प्रश्न होता, 'माझ्या कामात खूप लक्ष केंद्रित करण्याची व कल्पकतेची गरज आहे काय?' त्यांनी अर्जावर लिहिलं., "सृजनात्मक कार्य!"

एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ६

Submitted by ऋषिकेश on

भाग ५ दुसर्‍या पानावर गेला त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.