विंदा (करंदीकर) आजोबा....

Submitted by चित्रा राजेन्द… on

विंदा करंदीकरांना जाऊन १४ तारखेला १ वर्ष होईल. आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत त्यांच्या सूनबाईंनी, प्रतिमा करंदीकर ह्यांनी, एका लेखात त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. तो वाचत असताना मला मी लिहिलेल्या खालील लेखाची आठवण झाली. ते गेल्यानंतर त्यांच्याविषयी माझ्या मनातील भावना मी त्यात लिहिल्या होत्या. `पुवि'वरील सर्व मित्र-मैत्रीणींनी तो वाचावा ह्या मोहापोटी तो इथे देत आहे.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=69…

त्यांच्या पुस्तकांतून तर आता ते कायमचेच माझ्याकडे वास्तव्यास आहेत. हे समाधान आहे.

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ७८

पुस्तकाचे नाव

चित्राने दिलेल्या वेच्याला २ विजेते मिळाले आहेत आणि जवळपास त्याचे उत्तर फक्त जाहीर करायचे बाकी आहे म्हणून हा नवीन वेचा देत आहे.

या कोड्याचे पहिले विजेते आहेत स्पिन डॉक्टर.
चित्राने पण ओळखले, चित्रा दुसरी विजेती आहे.
तिसरे विजेते श्रावण मोडक
आणि चौथे विजेते देवेन्द्र प्रभुणे

चार उत्तरे एकापाठोपाठ आल्याने उत्तर जाहीर करतो आहे. :)
पुस्तकाचे नाव : कोसबाडच्या टेकडीवरुन
लेखिका : अनुताई वाघ (त्यांच्या लेखनाला व्यवस्थित आकार देताना अशोक चिटणीस यांनी संपादनाचे काम केले)

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?.... ७७

पुस्तकाचे नाव

कादंबरी: रीटा वेलिणकर
लेखिका: शांता गोखले

विजेता क्र. १: देवेन्द्र प्रभुणे आणि विजेता क्र. २ मणिकर्णिका हार्दिक अभिनंदन!!!!!!!!!

हे पुस्तक कोणते?

Submitted by देवेन्द्र प्रभुणे on

मित्रांनो,
सु.शी.चे पुस्तक!
चन्द्रा!
एक मोटेल!
सुत्रबद्ध खून!
हीरे कारखानदार्,तीन बन्धु!
एक बन्धु,झोपेत चालणारा!
खून बघणारा एक वार्तहर!
आर्की टायट्स!
सर्व खून blackmail मुळॅ!
नाव व प्रकाशक समजतील का,प्लीज?
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.

स्वा. सावरकरांचे सर्व साहित्य....... मोफत

Submitted by चित्रा राजेन्द… on

खालील लिंकवर क्लिक करा.
स्वा. सावरकरांचे सर्व साहित्य ई-बुक स्वरूपात येथे मोफत उपलब्ध आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Swatantryaveer_Savarkar.htm

मदत

Submitted by स्नेहश्री on
पुस्तकाचे नाव

गोफ पुस्तका बद्दल कोणाला माहिती आहे का?
माझ्या मैत्रिणीला सासूबाईंना ते गिफ्ट द्यायच आहे.
कोणाकडे या पुस्तकाबद्दल माहित आहे का?

`पुवि'वरील मित्र-मैत्रीणंकरिता...

Submitted by चित्रा राजेन्द… on

ह्या पुस्तकाचा परिचय लोकसत्ता-लोकरंग-पुस्तकांचे पान येथे १ फेब्रुवारी २००९ साली प्रसिध्द झाला होता. `पुवि'च्या मित्र-मैत्रीणींकरता तो इथे देत आहे. तो वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....
http://www.loksatta.com/old/daily/20090201/lr09.htm

कंजारभाट युवकाच्या जीवनाची कहाणी

'हे दु:ख, या वेदना उगाळून मी जगू इच्छित नाही. पण हे आपल्याच वाट्याला का? याचा जाब विचारावासा वाटतो ' या शब्दांत दलित व विमुक्त जातीतील अनेक संवेदनशील शिक्षित युवक आपली चीड व्यक्त करत असतात. शेवटी असहाय्य होऊन, प्रस्थपित समाजावरील राग गिळत मूकपणे जीवन जगतात. अज्ञान, दारिद्र्य, दौर्बल्य व सामाजिक हीनत्व यातून बाहेर पडणे व आपल्या मुला-बाळांना त्यातून बाहेर काढणे एवढाच मार्ग त्यांच्यासमोर असतो. त्यातील काही युवक संधी मिळताच शब्दावाटे आपले मनोगत व्यक्त करतात. पुस्तकातून वा लेखातून कुठेतरी मनोगत प्रसिद्ध होते.