ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ८०
आता मात्र मास्तरांनी दम खाल्ला नाही. उलटे असूनही ते सरळ चालत आले. हातात छडी घेउन आले आणि दातीखाती येउन त्यांनी सपासप छड्या ओढल्या. अंगावर जसे वळ उमटू लागले तसा मी केकाटू लागलो. जागच्या जागीच नाचू लागलो...डोके किंचित उतरले. ठणकणारी पाठ आणि हात दाबून धरीत 'अग आई ग' करून मी पळालो आणि सगळ्या वर्गातनं पळत सुटलो. मी कुठे पळतो आहे ते माझे मलाच कळत नव्हते. त्यामुळे तिघाचौघांच्या पाट्यांवर पाय देउन त्या निकामी केल्या. एकदोन दौती सांडल्या आणि काहींचे कपडे रंगीत केले. काही जणांना पालथे पाडले आणि काहींना त्यांच्या उरावर बसवले. मास्तरही माझ्या पाठीमागे पळत होते.