ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...८३
एक तट्टू जाळाच्या कड्यांतून उड्या मारून पडद्यात जात आहे तोच तंबूच्या डोलकाठीजवळ 'हूप' असा कानठळ्या बसविणारा आवाज प्रे़क्षकांनी ऐकला. सगळ्यांचे डोळे वर लागले. एक मोठा वानर---वानर कसला तो ! इतका मोठा का कधी वानर असतो ? मनुष्यच असला पाहिजे तो, वानराचे सोंग घेतलेला. इराण्णाच असावा तो - तंबूच्या डोलकाठीजवळून आत शिरून तो एका झोपाळ्यावर बसला. झोका घेत घेत त्याने ऐंशी फूट अंतरावरील समोरच्या झोपाळ्यावर उडी घेतली. शेपटीने झोपाळा पकडून झोके घेतले. इराण्णाने शेपटीची ही नवीन युक्ती शोधली असली पाहिजे असे मॅनेजरला वाटले.
