ओळखा पाहू ? - ७६ - उत्तर
विजेता क्र.१- दिगम्भा, विजेता क्र.२- इंद्रराज पवार, विजेता क्र.३- देवेन्द्र प्रभुणे व टण्या
सर्वांचे हार्दिक अभिनंदन......
खालील वेचा विश्राम बेडेकर लिखित ‘एक झाड आणि दोन पक्ष‘’ ह्या त्यांच्या आत्मचरित्रातील आहे.
विजेता क्र.१- दिगम्भा, विजेता क्र.२- इंद्रराज पवार, विजेता क्र.३- देवेन्द्र प्रभुणे व टण्या
सर्वांचे हार्दिक अभिनंदन......
खालील वेचा विश्राम बेडेकर लिखित ‘एक झाड आणि दोन पक्ष‘’ ह्या त्यांच्या आत्मचरित्रातील आहे.
आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या जगतामध्ये दर काही वर्षांनंतर वेगवेगळ्या कथाप्रकारांची चलती असते. एके काळी ऐतिहासिक प्रणयकथांना मागणी होती, मग स्टेफनी मायरच्या ट्वायलाइट सीरीजनंतर व्हॅम्पायर कथांची चलती झाली. साय-फाय त्यामानाने मध्यममार्गी. फार वरही नाही आणि अगदी तळालाही नाही. फक्त एकच कथाप्रकार असा आहे की ज्याला कायम मागणी असते आणि तो म्हणजे थ्रिलर. बेस्टसेलरच्या यादीत या विभागात एकाहून एक लोकप्रिय आणि वजनदार नावे असतात. ग्रिशम, स्टीफन किंग, टॉम क्लॅन्सी, जॉन ल कॅरे.
मी सहावीत असताना मला एक पुस्तक बक्षीसादाखल मिळाले होते जे पुढे कितीतरी काळ माझे आवडते होते. त्या पुस्तकात मला वाटतं सहा-सात कथा होत्या. पुस्तक लहान मुलांकरता होते.
पहिली कथा साकुरा नावाच्या मुलाची होती आणि मला वाटते त्या पुस्तकाचं नाव सुद्धा त्याच्यावरुनच होतं. 'साकुराची मांजरं'.
मित्रानो,
"बिजली नाचेल गगनात्,वादळ होईल जोरात"
व
"भव्य हिमालय तुमचा आमचा,केवळ माझा सह्यकडा"
ह्या कविता कोणत्या सन्ग्रहातिल आहेत?
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
हिरकमहोत्सवी वेचा देत आहे.:)
ताईच्या बोलण्याच्या ओघात पुन्हा एकदा विजेचा लोळ कोसळावा तसं झालं. ताई बोलून गेली. "विश्रामसारखा मुलगा विजेसारखा असतो. आकाशातून कोसळतो. अचानक जमिनीच्या कुशीत विलीन होतो. त्याला जाळायचं असतं. ते जाळलंच जात नाही. आपल्यासारख्यांना हे मरण निरर्थक वाटतं; एका अर्थी ते तसं असतंही. नसतंही ! लक्ष्य हुकलं तरी ते क्षणकाल. उजळून टाकणारा असला तरी त्याचा संधिप्रक्राश दीर्घकाल टिकतो. त्या संधीप्रकाशात संताजी वेगळ्या वाटेने जाणार, असं मला काही दिवस वाटत होतं."
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता.
संकेत : गरज पडल्यास उद्या देईन. :)
संकेताची गरज शक्यतो पडणार नाही असा अंदाज होताच. पण वेचा ओला असतानाच चित्रा यांनी विक्रमी वेळेत पुस्तक नेमके ओळखले आहे. चित्राजी अभिनंदन :)
या पुस्तकाच्या निमित्ताने दिग्गज वाचक श्रावण मोडक यांची वेचा कोड्यात बर्याच दिवसांनी उपस्थिती जाणवली त्याबद्दल खूप आनंद झाला.
चित्रा यांच्यानंतर श्रामोने हे पुस्तक ओळखले.
त्यानंतर वल्ली याने आणि अर्थातच दिग्गज वाचक इंद्रराज पवार यांनी ही ओळखले.
या पुस्तकाबद्दल वेगळा संकेत द्यायला लागेल असे मलाही वाटले नव्हते.
‘एकम’ ही ‘मौज - दिवाळी२००४’ च्या अंकात प्रसिध्द झालेली कादंबरी. ही कहाणी आहे देवकीची. देवकी मराठीतील एक प्रथितयश लेखिका. ‘मातृभाषा मराठीतच लिखाण करायचं’ असं तिनं पक्कं ठरवलं आणि त्यानुसार आपला जीवनमार्ग आखला. त्यासाठी तिला आजन्म एकटेपणा स्वीकारावा लागला आणि तिने तो जाणीवपूर्वक स्वीकारलासुध्दा.
आपला मुलूख सोडून नवर्याच्या बरोबर परमुलुखात जाण्याचं नाकारलं. माणसांच्या गजबजाटापासून दूर राहिली. एकटं राहण्याचा तिला कधीच बाऊ वाटला नाही. कारण आई-वडिल दोघंही नोकरी करत असल्याने खूप लहानपणापासून तिला एकटं राहण्याची सवय होती. त्यामुळे मुलगा प्रेमाने ‘ये’ म्हणत असूनही त्याच्याबरोबर ती परदेशी गेली नाही.
माधव गोडबोले यांचे नव्या दिशा, नवे संदर्भ हे पुस्तक, त्यांनी 1995 ते 1997 या काळात लोकसत्ता, सकाळ, व महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांसाठी वेळोवेळी लिहिलेल्या लेखनांचा संग्रह आहे. एके काळी आर्थिक, राजकीय,सामाजिक वा प्रशासकीय घडामोडी, संघर्ष व त्यामागची भूमिका यांचा ऊहापोह अनेक साप्ताहिके, मासिके यामधून होत असे. परंतु काही कारणांमुळे वैचारिक नियतकालिके हळूहळू बंद पडत गेली. त्यामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेली काही वृत्तपत्रे वैचारिक लेखांना प्रसिद्धी देऊ लागली. (आता तर याही गोष्टी पेड न्यूज वा प्रायोजकांच्या पाठिंब्याविना छापले जात नाहीत अशी अवस्था झाली आहे.
वाचले असल्यास संकेताची गरज नाहीच कारण वेच्यातच कितीतरी संकेत आहेत.
गरज पडली तर अवश्य संकेत देईन.
या वेच्याचे उत्तर 'वल्ली'ने विक्रमी वेळेत ओळखल्याबद्दल त्याचे अभिनंदन
चित्रा यांचेही अभिनंदन. त्यांनीदेखील एकाच प्रयत्नात वेच्याचे उत्तर ओळखले आहे.
दिग्गज पुस्तकप्रेमी वाचक दिगम्भा यांनीही लगेच ओळखले आहे तेव्हा उत्तर जाहीर करतो आहे.
*** सर्व विजेत्यांचे अभिनंदन ***
या कोड्याला २ विजेते मिळाले असल्यामुळे संध्याकाळी उत्तर जाहीर करेन. पण बाकीच्यांसाठी एकमेव संकेत देतो आहे खाली.