मी साहित्य !

मी साहित्य !
अनादिअंत मी, अतिप्राचीन मी, जन्म घेतला मी ज्ञानयज्ञातून.
सळसळणा-या तेजशिखांच्या सोनेरी गर्भातून, श्रेष्ठ पंचमहाभूतांच्या आवेगातून अन्‌ मीलनातून, जन्म घेतला त्या ज्ञानकुंडातून, मी - मी साहित्य !

कडेकपारी शिखरे माझी जन्मा आली. शालीनता, स्वातंत्र्य, बंधुता, नीती... मातीची जिवंत झाली.
मुखामुखांतुन साहित्यवेड्या संस्कारांची गुढी उभारली, प्रार्थनांचे नाद निनादत विश्वशांतीच्या पसायदानी.
बंदिस्त कवाडे पुराणांची, उजळली ज्ञानियाच्या सोनकिरणांनी.
आलांछित चंद्रम्याच्या निवांत शीतल चांदण्यातुनी, अन्‌ तापमार्तंडाच्या देदिप्यमान प्रकाशकिरणांतुनी नहाण घेई महाराष्ट्र हा साहित्यवनभुवनी.