नमस्कार रसिक वाचकहो,

पुस्तकविश्व आजपासून रसिक वाचकांच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहे. या दीर्घ विश्रांतीचे कारण म्हणजे पुस्तकविश्वचे नविन स्वतंत्र सर्वरवर स्थलांतर. मिसळपाव आणि पुस्तकविश्व या दोन्ही विदागारांचे ओझे आणि माहितीच्या आवक जावकाची क्षमता मिसळपावच्या सर्वरला झेपेनाशी झाली होती, यातूनच दोन्ही संकेतस्थळांना अनंत अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता पुस्तकविश्वचे नविन सर्वरवर स्थलांतर पुर्ण झाल्यामुळे ही तुमची आवडती दोन्ही संकेतस्थळे निर्विघ्न चालु रहातील अशी खात्री आहे.

नविन पुस्तकाची नोंद करतेवेळी त्याचा लेखक जोडतांना काही अडचणी येत होत्या त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. या संदर्भात तसेच इतर कोणत्याही बाबी संदर्भात अडचण आल्यास इथे किंवा मदतनीसला जरुर कळवावे.

-
मदतनीस