विजेता क्र.१- दिगम्भा, विजेता क्र.२- इंद्रराज पवार, विजेता क्र.३- देवेन्द्र प्रभुणे व टण्या
सर्वांचे हार्दिक अभिनंदन......
खालील वेचा विश्राम बेडेकर लिखित ‘एक झाड आणि दोन पक्ष‘’ ह्या त्यांच्या आत्मचरित्रातील आहे.
गावात ग्रंथालय होते. जुनाट. तिथली पुस्तके पोरक्या पोरासारखी. त्यांच्यावर कव्हरे लक्तरासारखी. पाने दुमडलेली, फाटलेली, डाग खुणा पडलेली. जागजागी चिताडलेली. तिथे नाईलाज म्हणून तरुण मुले पुस्तकासाठी येत. मुकाट्याने पुस्तके घेत आणि अंग चोरून निघून जात. बाकावर जाड भिंगांचे चष्मे घातलेले म्हातारे बडबडायचे. खोकत असायचे. तंबाकूच्या पिचकार्या टाकायचे. तिथे जाणे याच्या जिवावर येई. पण आता कॉलेजची लायब्ररी होती. नवी. कोरी करकरीत. चिरेबंदी. खूप ऐसपैस. मोठमोठाली दारे आणि खिडक्यांची. त्यांच्या असंख्य काचा रोज साफ पुसलेल्या, धुतलेल्या. सकाळी बाहेरच्या व्हरांड्यातून धावत बागडत आलेले ऊन त्या काचांना बिलगे. त्या झळाळून जात. जणू सकाळचा सूर्य अगणित अल्लाउद्दीनचे दिवे तिथे उगाळीत बसला आहे!
काचेच्या कपाटात पुस्तके - अल्लाउद्दीनचे लाड पुरविणार्या राक्षसासारखी! पण हे राक्षस सुंदर होते. त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी कव्हरांचे कपडे. त्यावर सुंदर चित्रांची, नक्ष्यांची, वेलबुट्ट्यांची गोंदणे. छातीवर, डोक्यावर सोनेरी अक्षरांची पदके आणि शिरपेच. ही पुस्तके म्हणजे शब्दकळेची नवी दृष्टी देणारी, कल्पनेच्या बागेतली काळ्या चाफ्याची फुले! या पुस्तकांतून अनेक पात्रे बाहेर येत. याच्या डोक्यातल्या विचारचक्रावर स्वार होत. स्वत:शी गिरक्या घेत फिरत राहत. दिवसचे दिवस हा त्यांच्या संगतीत राही. तिथे हा डिकन्सच्या डेव्हिड कॉपरफील्ड बरोबर रडला होता. सॅम वेलर, हकलबरी फिनबरोबर मनमुराद हसला होता. इब्सेनच्या अनोख्या नाट्यशिल्पाने चकित झाला होता. शॉच्या बुध्दीच्या स्फुल्लिंगांनी दिपून गेला होता. नुकत्याच झालेल्या रशियन राज्यक्रांतीचे इतिहास वाचून थरारून उठला होता. काव्ये, कथा, कादंबर्या, नाटके इतिहास, तत्त्वज्ञान यांची पुस्तके विचारसौंदर्याचे धडेच्या धडे याच्या डोक्यावर ओतीत. हा त्याने न्हाऊन निघे.
विजेता...
दिगम्भा, हार्दिक अभिनंदन!
संकेत हवा
पुस्तक अनुवादित आहे किंवा कसे.? अधिक संकेत मिळाल्यावर त्या दिशेने प्रयत्न करता येतील.
मराठीच..
वल्ली,
पुस्तक मराठीतच आहे, अनुवादित नाही.
विजेता क्र. २
विजेता क्र. २ --
इंद्रराज पवार. हार्दिक अभिनंदन!
In reply to विजेता क्र. २ by चित्रा राजेन्द…
सुंदर पुस्तक...!!
थॅन्क्स चित्रा....खरेतर संकेताची आवश्यकता नव्हतीच...तरीही ज्येष्ठ-श्रेष्ठ हा ढळढळीत संकेत विचारात न घेताही श्री.सागर आणि श्रे.वल्ली हे सुंदर पुस्तक ओळखतील असा माझा विश्वास आहे.
इन्द्रा
In reply to सुंदर पुस्तक...!! by इंद्रराज पवार
+१ असेच म्हणतो
उशीर झाला
सुटीवर होतो त्यामुळे सहभागी नाहि होता आले. पण ओळखले असते मी.
बेडेकरांच्या याच पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे
हरलो ब्वा
हरलो ब्वा.
एक झाड आणी दोन
एक झाड आणी दोन प़क्शि,बहुतेक!
विश्राम बेडेकर
In reply to एक झाड आणी दोन by देवेन्द्र प्रभुणे
उत्तर देण्याची पद्धत....!!
देवेन्द्र....
तुम्ही इथे नवीन सदस्य असल्याने काही नियम माहीत नसतील. पण "ओळखा पाहू पुस्तकाचे नाव?" या कोड्यात भाग घेताना पुस्तकाचा अंदाज वा तुमचे उत्तर इथे द्यायचे नसून ते पानाच्या डाव्या बाजूला "व्यक्तिगत संदेश" असा जो विकल्प आहे त्याला क्लिक करून ज्या सदस्याने/सदस्येने तो वेचा दिला आहे त्याचे/तिचे नाव टंकून त्या खाली तुमचे उत्तर द्यावे अशी पद्धत आहे. म्हणजे तुमचे उत्तर तुम्हा दोघातच राहते आणि इतरांना ते समजत नाही.
तुमचे उत्तर बरोबर की चूक याबद्दलचा संदेश संबंधित धागाकर्ता स्वतःच इथे जाहीर करतात.
इन्द्रा