ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६३

पुस्तकाचे नाव

संकेत १ : हा वेचा एका कथासंग्रहातील आहे. तुलनेने हा वेचा ओळखायला बर्‍यापैकी सोपा आहे. या पुस्तकात स्त्री व्यक्तिरेखा प्रभावीपणे चितारलेल्या आहेत.
संकेत २ : वेच्यात दोन शब्द ठळक केले आहेत. पहिला ठळक केलेला शब्द लेखकाच्या दुसर्‍या एका पुस्तकाच्या नावाकडे दिशानिर्देश करतो आणि दुसरा ठळक शब्द वेचा ज्या पुस्तकातील आहे त्याकडे दिशानिर्देश करतो.
संकेत ३: सदर पुस्तकाच्या लेखकाला त्याच्या दुसर्‍या एका पुस्तकासाठी (सत्तांतर साठी) साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
संकेत ४: वल्ली आणि इंद्रराज पवार यांनी प्रयत्नाअंती लेखक ओळखला आहे - व्यंकटेश माडगूळकर

आता ओळखा मंडळी :)

विजय तेंडुलकरांच्या 'आरंभकाळा'विषयी....

Submitted by प्रभाकर नानावटी on
पुस्तकाचे नाव

विजय तेंडुलकरांचा परिचय करून देताना सामान्यपणे घाशीराम कोतवाल, मी जिंकलो मी हरलो, अशी पाखरे येती, सखाराम बाइंडर, कमला, इत्यादी गाजलेली नाटकं लिहिणारे एक थोर नाटककार म्हणूनच आवर्जून उल्लेख केला जात असतो. त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेखन (रातराणी, कोवळी उन्हे) हेही साहित्यप्रकार हाताळले व त्यातही त्यांची विलक्षण प्रतिभा दिसत असली तरी त्यांच्यावर नाटककार म्हणून लेबल चिकटविल्यामुळे त्यांच्या इतर लेखनाकडे आपले लक्ष जात नाही. (व नाटकं वाचण्यापेक्षा बघायला हवीत म्हणून नाटकही वाचली जात नाहीत!) मुळात तेंडुलकर आयुष्यभर अवती भोवतीच्या 'माणसां'च्या शोधात होते.

एक प्रांजळ आत्मकथन : आय. अझिमॉव्ह

Submitted by आरागॉर्न on

मी सहसा आत्मचरित्रे वाचायचे टाळतो. बहुतेक वेळा त्यात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न असतो, हे विशेषत: चित्रपट अभिनेत्यांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवते. दुसरे म्हणजे ज्यांच्या आयुष्यात काय काय कसे कसे झाले याबद्दल उत्सुकता वाटावी अशा व्यक्ती फारशा नाहीत. मग मुराकामीचे 'व्हॉट आय टॉक अबाउट व्हेन आय टॉक अबाउट रनिंग' हे पुस्तक वाचले. याला खर्‍या अर्थाने आत्मचरित्र म्हणता येणार नाही पण मुराकामीने त्याची लेखनप्रक्रिया आणि त्याचे धावणे यातील काहीसा गुंतागुंतीचा संबंध सुरेख प्रकारे उलगडून दाखवला आहे.

सध्या काय वाचताय? (भाग ३)

Submitted by निखिल देशपांडे on

सध्या काय वाचताय? (भाग २) बराच मागे गेलाय. आणि मधल्या काळात सगळ्या मित्रांनी भरपूर खरेदीचे धागे टाकले. ( जळजळ दुसरे काय. ;)) त्यातले काय काय वाचून झाले हे जाणून घेण्यासाठी काढलेला हा धागा.

नवे वर्ष.. नवा संकल्प -- नव्या रुपातली जुनी पुस्तके

Submitted by ऋषिकेश on

नमस्कार मित्रहो.. २०१० सरलं.. २०११चे वेध लागले आहेत. नववर्ष म्हणजे एका अर्थी एक दिवस मावळला.. एक उगवला.. तसा फरक काहिच नाहि.. पण तरीही आपण ह्या दिवसाकडे मैलाचा दगड म्हणून पाहतो.
गेल्या वर्षातील 'पुस्तकविश्व'चे आगमन ही माझ्यासारख्या पुस्तकप्रेमींच्या जगातली एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरली. मराठी जालावर असे संस्थळ येणे आणि ते इतक्या कमी वेळात बहरणे ही आनंददायक घडामोड या वर्षी घडली.

मदत हवी आहे.

Submitted by श्रीकांत बोरवणकर on
पुस्तकाचे नाव

नमस्कार!!
जरा एका पुस्तकाची माहिती हवी आहे.