डिजिटली इमॉर्टल होण्याची ओढ! (उत्तरार्ध)

Submitted by प्रभाकर नानावटी on

इ-पुस्तकांचे भवितव्य
संगीत क्षेत्रात Apple आय-पॉडने केलेली क्रांती किंवा गूगल कंपनीचा यू-ट्यूबद्वारे व्हिडिओला शह देण्याचे प्रयत्न यावरून इ-पुस्तकांचे भवितव्य काय असू शकेल याचा कदाचित अंदाज करता येऊ शकेल. तरुण - तरुणींमध्ये एकेकाळी लोकप्रिय असलेले म्युझिक अल्बम्स आता मृतप्राय झालेले असून काही अपवाद वगळता, त्या शेवटची घटका मोजत आहेत. आपल्याला आवडलेल्या गाण्यांची वेगळी यादी करून ती मित्र - मैत्रिणींबरोबर शेअर करणे ही सहज घडणारी अशी क्रिया आहे.

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

भाषा
मराठी
आवृत्ती
दहावी
किंमत
80.00
पृष्ठसंख्या
118

श्रीपाद अमृत डांगे यांची प्रस्तावना आहे या पुस्तकाला.
इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांचे हे अत्यंत गाजलेले पुस्तक आहे

थर्ड चॅनेल

भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली
किंमत
40.00
पृष्ठसंख्या
118

स्त्रोतः मॅजेस्टिकप्रकाशन.कॉम वरुन

‘थर्ड चॅनेल’ ही अनेक अर्थांनी वेगळी कादंबरी आहे.
खळबळजनक असूनही पुरेशी गंभीर असणारी, चौकटींचा धिक्कार करता करता एका विशिष्ट हेतूच्या चौकटीत काळजीपूर्वक बांधलेली आणि वाचनीयतेच्या सुबोध अंगाने जात जात वाचकांच्या चित्तवृत्ती खडबडून जाग्या करणारी.

सावत्र आईशी जगावेगळे नाते जडलेला मनस्वी मनमोहन काय किंवा वासनांचा धीट स्वीकार करणारी बुद्धिमान माया काय, यांची सनसनाटी खाजगी आयुष्ये रेखाटणे एवढेच या कादंबरीचे साध्य नाही. ती पाहता पाहता कहाणीतून मुक्त होते आणि नवसमाजाच्या परिवर्तनाचे अनोखे स्वप्न साकार करते.

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६१

पुस्तकाचे नाव

मागच्यावेळेस फारसे प्रतिसाद आले नाहीत. यावेळेस मात्र असे होणार नाही असे वाटते. तर हे घ्या... एक कविता टाकतो आहे. म्हणजे त्यातली काही कडवी.

**

रामाच्या देवळामागे
हातभट्टीची धुनी जागे,
शेपटी घालून चालू लागे
हनुमान कोणी भ्यालेला.

राज्य खुनी भांडग्यांचे,
राज्य धनदांडग्यांचे,
राज्य सत्तालांडग्यांचे,
भयभीत सारे.

हा इथे दिसतो भ्यालेला,
तो तिथे दिसतो भ्यालेला,
जो जो दिसतो तो भ्यालेला,
भयभीतसारे.

कोणाची भुई तोडून नेली,
कोणाची गुरे सोडून नेली,
कोणाची पोरगी ओढून नेली,
भयभीत सारे.

पाऊस आंधळा बडवून गेला,
दुष्काळ कोरडा रडवून गेला,
रोग झाडे झडवून गेला,
भयभीत सारे.

नितीन प्रकाशन

पत्ता
१४७ बुधवार पेठ, अप्पा बळवंत चौक, पुणे ४११००२. फोन - ०२०-२४४८३५१७.

प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव

आणि सध्याचे माझे प्रकाशक नितीन प्रकाशनचे श्री. नितीन गोगटे यांची सचोटी व व्यवसायिकता अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. लेखी करार करून प्रत्येक आवृत्तीचे मानधनाचे पैसे चेकने देणे, पुस्तक विक्रीचा चोख हिशोब दाखवणे आदि ते करतातच पण त्यांची लेखकांशी सन्मानपुर्वक वागणूक डोळ्यात भरते. त्यांचे श्री काळे व अन्य सहकारी तितक्याच आस्थेने व सन्मानाने वागवतात.

गॉन विथ द विन्ड १: स्कार्लेट

खूप वर्षांपूर्वी, टी एन टी कार्टून नेटवर्क नावाच्या वाहिनीवर रात्री नऊ वाजता जुने अभिजात इंग्रजी चित्रपट दाखवले जात असत. आता त्या चित्रपटांची नावंही नीट आठवत नाहीत. इंग्रजी कळायचा तर प्रश्न उद्भवत नसल्यामुळे फार काही समजतही नसे. कारण मला फक्त शास्त्र - गणिताची सवय होती. पण त्या चित्रपटांची गुणवत्ता अजून डोक्यात पक्की बसलेली आहे. सर्वात जास्त परिणामकारक वाटायचे ते त्यांच्यातले ठळक, लक्षवेधक रंग. गोरे लोक चेहऱ्याला इतकी प्रचंड रंगरंगोटी का करत असावेत? चांगले गोरेपान तर असतात असा प्रश्न पडण्याइतपत त्यातले रंग भडक वाटत असत. पण दूरदर्शनच्या पडद्यावर पडणारा पाऊस(तांत्रिक बिघाडांचा), रुकावट के लिये खेद है, नाहीतर लाल - निळ्या उभ्या पट्ट्याबरोबर येणारा टीऽऽऽऽऽऽ असा कर्णकर्कश्श आवाज याच गोष्टींची सवय होती. त्यामुळे टी एन टी वरच्या चित्रपटांचं चित्रीकरण अतिशय नेत्रसुखद वाटत असे. विशेषतः निसर्गचित्रण तर भुरळ घालत असे. जुना डेनिस द मेनेस, झीब्रा इन द किचन वगरे काही चित्रपटांची नावे आठवतात. बाकीच्यांच्या फक्त प्रतिमा आठवतात. ( द यर्लिंग सुद्धा मी इथेच पहिल्यांदा पाहिला. अर्थातच त्यात हुतो आजीलाच कापून टाकलंय हे सोडल्यास बाकी काहीच समजलं नव्हतं. अलिकडे पुन्हा पाहिल्यावर हे जाणवलं. ) टीएनटीवरच एक दिवस मी 'गॉन विथ द विंड' हा चित्रपट पाहिला. चार तासांचा आणि बोलल्या जाणाऱ्या संवादांमधलं एक अक्षरही न समजलेला, तरीही जागून पाहिलेला गॉन विथ द विंड. अमेरिकन सिव्हिल वॉर म्हणजे काय हे माहीतच नव्हतं त्यामुळे चित्रपटाची पार्श्वभूमीच कळली नाही. पण हिरव्या रंगाच्या पडद्याचा फ्रॉक शिवणारी स्कार्लेट आणि चेहऱ्यावरून पक्का बदमाश वाटणारा, कॅप्टन बटलर झालेला क्लार्क गेबल तेवढा आठवतो आहे. हा चित्रपट पाहिल्यापासून अशी खूप इच्छा होती की गॉन विथ द विंड एकदा मुळातून वाचावं.