स्वातंत्र्याची दुसरी लढाई
अण्णा हजारे यांच्या गत २० वर्षातील भ्रष्टाचार विरोधी अद्बितीय संघर्षाचा वास्तव ज्वलंत इतिहास.
भगवान बुद्ध
आनंद श्रीकृष्ण, यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील बेनीपूर या छोट्या खेडेगावात झाला. कृषी अर्थशास्त्र या विषयात त्यांनी मास्टर्स पदवी प्राप्त केली. भारतीय राजस्व सेवेत ते 1986 साली दाखल झाले. आणि सध्या ते आयकर आयुक्त म्हणून आहेत.
कबीरपंथ, स्वामी नारायण संप्रदाय, रेकी आणि सिद्ध समाधी योग आदींचे गहन अध्ययन केल्यानंतर त्यांनी धम्माचा स्वीकार केला. तेव्हापासून बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. आचार्य सत्यनारायण गोएंका यांनी पुनरुज्जीवन केलेल्या विपस्सना ध्यानपद्धतीचे ते आता आघाडीचे पार्हक बनले आहेत.
रणरागिणी
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पुरूषांच्या बरोबरीने किंबहुना काकणभर अधिकच सहभाग स्त्रियांचा होता. स्वातंत्र्य आंदोलनात जेवढ्या स्त्रिया सहभागी झाल्या त्यापेक्षा अधिक स्त्रियांनी महाराष्ट्र निर्मितीच्या आंदोलनात भाग घेतला. एस.एम. जोशींनी म्हटले होते की, ’पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक सहभाग स्त्रियांचा होता’. एवढेच नव्हे तर हे आंदोलन अहिंसात्मक पद्धतीने जिवंत ठेवण्याचे कार्य या महिलांनीच केले.
कोल्ड स्टील
स्त्रोत : मेहता पब्लिशिंग हाऊस.कॉम
पुस्तकातील निवडक भाग: