सौम्य चंद्रवदना माझी आई

Submitted by शुचि on

देवी प्रेसचे "सॉफ्ट मून शायनिंग" हे पुस्तक वाचायचे राहून गेले या यादीतील एक पुस्तक! तीन्-चार वर्षांपूर्वी या पुस्तकातील काही कवितांचे अप्रतिम नमुने जालावर वाचवयास मिळाले त्याबद्दल थोडेसे.

चांगदेव चतुष्टय

Submitted by टण्या on

सी. ए. पाटील. चांगदेव पाटील. खेड्यात, भल्या मोठ्या वाड्यात, खंडीभर माणसांच्या कुटुंबात, अर्धवट लुच्च्या पण कष्टाळू आणि धूर्त-व्यवहारी पण पोकळ प्रतिष्ठेच्या मागे असणार्‍या बापाचा, मुंबईत जाऊन विदेशी - म्हणजे खरंतर पाश्चिमात्य व्यक्तिवादी - मूल्यांच्या आधारे इंग्रजीत एम.ए. केलेला मुलगा. एम.ए.ची मुंबईतली दोन वर्षे व त्यानंतर नोकरीची - तीन वेगवेगळ्या गावी घालवलेली - तीन वर्षे, असा पाच वर्षांचा एकूण प्रवास म्हणजे चांगदेव चतुष्टय.

एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ४

Submitted by सागर on

हुश्श... धावती भेट आटोपली पुण्याची, आता येथे आलो तेव्हा दिसले की भाग - ३ देखील दुसर्‍या पानावर गेला आहे तेव्हा भाग -४ सुरु करतो आहे.

धावत्या भेटीतही मला पुण्याच्या अक्षरधारा प्रदर्शनास भेट देता आली व काही पुस्तके घेऊ शकलो.
वेळेअभावी पुविच्या एक अपवाद वगळता कोणत्याच मित्र मैत्रीणींना भेटणे शक्य झाले नाही याबद्दल क्षमस्व.

भाषा आणि लिपी आणि अनंतमूर्ती

Submitted by कविता महाजन on

परवा गोव्याला बा. भ. बोरकर जन्मशताब्दीच्या समारोप सोहळ्याला गेले होते. कन्नड लेखक अनंतमुर्ती यांनी तिथे एक मुद्दा मांडला. तो असा :
"कोंकणी भाषेला स्वतःची लिपी नाही. ( हे मत वादग्रस्त आहे, असेही त्यांनी लगेच सांगितले.) कोंकणी भाषेत लिहिणारे लेखक त्यामुळे सुमारे १८ भाषांमधून लेखन ( पुस्तके ) करतात. कुठल्याच भाषेचे लिपीवाचून काही अडत नाही. फक्त ती लिपी त्या भाषेतील सगळ्यांना येत नसल्याने अडचण होते. त्यामुळे भारत सरकारकडे मी आता अशी एक योजना मांडली आहे की कोणत्याही भाषेतील मजकुराचे हव्या त्या लिपीत लिप्यंतर करता यावे. अशी सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यावी."

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६०

"शंकराचार्यांनी म्हटलं आहे की, त्या वरच्या पातळीवर ईश्वर नाहीच. त्यांनीच वेगवेगळी स्तोत्रही लिहिली. काय सुंदर संस्कृत भाषा आहे त्यांची. अप्रतिम. शंकराचार्यांइतकं सुंदर, सौष्ठवपूर्ण संस्कृत कुणालाच लिहिता आलेलं नाही. त्यांनी देवीवर''सौंदर्यलहरी' हे काव्य लिहिलंय. देवीच्या प्रत्येक अवयवाचं अतिशय सुंदर वर्णन केलंय. कुणी त्याला अश्लील म्हणून शकतो. बघणार्‍याची दृष्टी जशी असेल तसं श्लील किंवा अश्लील ठरतं. आपल्याला ते अश्लील वाटत नाही; चावट दृष्टीला ते अश्लील वाटेल."

***

म्हणलं तर सोप्पं आहे. बर्‍याच लोकांना ओळखू यावं अशी अपेक्षा आहे.

***

एक्सक्यूज मी प्लीज

Submitted by शुचि on

मी ज्या पुस्तकाची ओळख करून देणार आहे ते पुस्तक बर्‍याच जणांना अनावश्यक अथवा कृत्रीम वाटू शकेल. मला विचाराल तर मला या पुस्तकाचा वैयक्तीक आयुष्यात तसेच कार्यक्षेत्रात खूप फायदा झाला आहे आणि माझं हे लाडकं पुस्तक आहे.