तुम्ही जालावर काय वाचता?

Submitted by मेघना भुस्कुटे on

आपल्या मायबोलीतली संस्थळं वगळता (चावड्या ऊर्फ फोरम्स) तुम्ही जालावर काय वाचता? नियमितपणे चाळावीत अशी काही स्थळं जालावर असतील. अशा काही स्थळांविषयी सांगा, म्हणजे आपल्या सगळ्य़ांच्या माहितीत भर पडेल.
मी हे वाचते -
http://indiatogether.org
http://infochangeindia.org/
http://www.eanubhav.com/

डिजिटली इमॉर्टल होण्याची ओढ! (पूर्वार्ध)

Submitted by प्रभाकर नानावटी on

माधव मोहोळकरांनी आपल्या गीतयात्री या पुस्तकात हिंदी चित्रपटातील गाण्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्‍या गायक-गायिकांच्या, गीतकारांच्या शैलीविषयीच्या शीर्षकांसाठी त्यांच्या गाण्यातील ओळी निवडल्या आहेत. ती गाणी ऐकत ऐकत लेख वाचत गेल्यास आणखी मजा आली असती असे राहून राहून वाटू लागते. अशीच प्रतिक्रिया जी.एंची इस्किलार कथा वाचताना वा दुर्गा भगवत यांचे ऋतुचक्र वाचतानाही थोड्याफार प्रमाणात वाटते.

कलामाध्यमांचा रसास्वाद

सप्तरंगी कावळा

Submitted by शुचि on

माझी मुलगी ५ वर्षाची चिमुरडी होती तेव्हा एके दिवशी शाळेतून घरी आली आणि मला अधीरतेने म्हणाली "आई, मी ग्रंथालयातून एक पुस्तक आणलं आहे. आपण वाचू यात का? खूप सुंदर चित्रांचं पुस्तक आहे. मला आत्ताच्या आत्ता वाचायचं आहे." तिच्या बालहट्टाला मी आनंदाने रुकार भरत पुस्तक उघडले आणि मनात तुच्छतेने म्हटले - "रेनबो क्रो? म्हणजे सप्तरंगी कावळा? छे कावळा मेला सप्तरंगी कसा असेल? कावळा तो काळा तो काळाच. मेलेले उंदीर अन उकीरडा खाणारा."

पुस्तकाबद्दल माहिती

Submitted by अभय दातार on

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते श्री पां. ना तथा बापूसाहेब राजभोज यांनी तीन खंडात आपले आत्मचरित्र आणि आठवणी लिहील्या आहेत. प्रकाशकाबद्दल माहिती उपल्बध नाही. पुस्तकविश्वच्या सदस्यांपैकी कोणाला या विषयी माहिती असल्यास ती कळवावी.

अभय दातार

एक 'गोड' बाळ

Submitted by ऋषिकेश on

"लहानपणी वाचलेल्या अनेक पुस्तकांनी बालपण समृद्ध केलं आहे" वगैरे वाक्य अनेकांच्या लेखांत, मुलाखतील वाचायचो/ ऐकायचो तेव्हा किती छापील बोलतात असं पुर्वी वाटायचं. पण माझं वाचनं फारच बेताचं असलं आणि चरुरस्त्र नसलं तरी जे वाचलं त्याच्या जोरावरही 'लहानपणी वाचलेल्या अनेक पुस्तकांनी बालपण समृद्ध केलं आहे' हे वाक्य फेकण्यास हरकत घेता येऊ नये. अनेक पुस्तकांनी लहानपणी वेगळ्या विश्वात - त्या वयाला आवश्यक अशा कल्पनाविश्वात (फँटसी) - नेलं आहे. मग भा.रा.भागवतांची ज्यूल व्हर्नची भाषांतरे असोत किंवा देनिसच्या गोष्टी असोत.

हॉरसशू क्रॅब्स अँड शोअर बर्ड्स

Submitted by शुचि on

माझ्या मुलीबरोबर मी बॉर्डर्स या पुस्तकांच्या दुकानात प्रवेश केला आणि आम्ही दोघी एका टेबलवर आपापल्या पुस्तकामध्ये रममाण होऊन गेलो. नेहमी हे असच होतं पुस्तकांच्या दुकानात प्रवेश, मी कॉफी घेते आणि मग एका टेबलवर आम्हा दोघींची २ वेगवेगळी विश्व साकार होऊ लागतात. जिवंत, अतिशय मोहमयी, आम्हाला हरवून टाकणारी. त्यात खंड पडतो तो फक्त एक पुस्तक बदलून दुसरं घेण्याकरता.

Marshal Cavendish

पत्ता
MARSHALL CAVENDISH HEADQUARTERS
Times Centre
No. 1 New Industrial Road
Singapore 536196
Tel: (65) 6213 9300
Fax: (65) 6213 9398
E-mail: enquiry@sg.marshallcavendish.com
Website: www.marshallcavendish.com

Marshall Cavendish is an international publisher of books, directories and magazines. We produce material in both print and digital formats. With an extensive global network, we publish in 13 different languages across a wide variety of genre including education, general interest, home and library references, and business information.

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५९

Submitted by निवांत पोपट on

परंतु अलीकडे मात्र तिला पुर्णपणे नवी अशी एक उदास अस्वस्थता स्पर्श करू लागली होती.कधी तरी तिला एकदम अतिशय थकवा वाटे व त्याच्या दडपणाखाली तिला खिळून गेल्यासारखे वाटे.मनात एखादा विचार चमकून जाई; पण तो काय,कसला हे मात्र तिला समजत नसे.तो वाढू लागला तर स्पष्ट करता येत नसे.सतत नजरेपुढे येत राहून तिने आपल्याला गोंजरावे,आपल्याशी बोलावे,आपल्याला प्रवेश द्यावा,अशी सतत विनवणी करण्याय्रा अनेक नव्या,अपरिचित कल्पना तिच्या भोवती फ़िरत.परंतु ह्या परक्या माणसांशी बोलायचे म्हटले तरी तिला परवलीचे शब्द माहीत नव्हते.एखादा विचार म्हणजे केवळ आभास नसून ती एक सत्य वस्तू असते.शब्द म्हणजे तिची वस्त्रेच असे मानता येईल.