ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ६२

पहिला संकेत : वल्ली यांनी अंदाज केल्याप्रमाणे ही एक शिकार कथा आहे. पण मला नेमके पुस्तक आणि त्यातील कथा कोणती याची अपेक्षा आहे...यातच दुसरा संकेत आला की हा एक कथा संग्रह आहे :)

दुसरा संकेत : वल्ली यांनी पहिल्या प्रयत्नात लेखक ओळखला आहे. पुस्तकाचे नाव आणि त्यातली नेमकी कथा वाचकांनी ओळखणे अपेक्षित

या वेच्याचे पहिले विजेते आहेत स्पिन डॉक्टर.
आणि दुसरे विजेते आहेत वल्ली

वेच्याचे उत्तरः
पुस्तकाचे नाव : कुमाऊंचे नरभक्षक
लेखक : जिम कॉर्बेट
अनुवादः डॉ. सुभाष भेंडे
पान क्रमांक : ९१
कथेचे नाव : पोवळगडचा ब्रह्मचारी

ठाणे साहित्य संमेलन पुस्तक खरेदी

Submitted by मेघना भुस्कुटे on

ठाण्यातल्या साहित्यसंमेलनात केलेली ही खरेदी:

बापमाणूस (अक्षर प्रकाशन) - संपा. निखिल वागळे

छत्रपती शिवाजीमहाराज जीवनरहस्य (इंद्रायणी प्रकाशन) - नरहर कुरुंदकर
जाम शोधाशोध करावी लागली. कारण इंद्रायणीचा स्टॉल नव्हता. निदान मला तरी नाही सापडला. शुभमवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप प्रयत्न केले. मेहतावाल्यांनी ’नाहीच मिळणार तुला कुठेच’ असं हसतमुखानं सांगितलं. शेवटी मॅजेस्टिकवाल्यांनी फोनाफोनी करून मला प्रत मिळवून दिली. :)

विवाहसंस्थेचा इतिहास - राजवाडे समग्र साहित्य खंड ७ - ८ (राजवाडे प्रकाशन) - वि. का. राजवाडे

व्यासरचित महाभारताचा कलाकृतीच्या अंगाने घेतलेला शोध

Submitted by प्रभाकर नानावटी on

इरावती कर्वे यांनी युगांत या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना असे सारा वेळ वाटते.

'मराठी रियासत' बद्दल माहिती हवीय

Submitted by वल्ली on

रियासतकार गो.स. सरदेसाईंचे अनुपलब्ध असलेले 'मराठी रियासत' चे सर्व खंड पॉप्युलर प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित होत आहे. सदर खंडांची एकत्रित किंमत सवलतीत ४००० रू. आहे. तरी सदर ग्रंथ कुणी वाचले आहेत का?
२५० वर्षांचा मराठेशाहीचा समग्र इतिहास असलेले हे खंड एव्हढी किंमत मोजून संग्रही ठेवण्यासारखे आहेत का? हे ग्रंथ फक्त इतिहासाच्या अभ्यासू वाचकांसाठीच आहेत का इतरही हे वाचू शकतील? मुख्य म्हणजे हे चरित्रग्रंथ आहेत का संदर्भग्रंथ?
जाणकारांनी अधिक माहिती द्यावी ही विनंती.

लोकमान्य टिळकांच्यावरील 'चरित्रात्मक कादंबरी'

Submitted by प्रभाकर नानावटी on

श्री.ना. पेंडसे यांचे हाक आभाळाची हे पुस्तक वाचण्यासाठी हाती घेत असताना केवळ श्री.ना.पेंडसे यांची कादंबरी व हा लेखक आपल्याला निराश करणार नाही याची खात्री असल्यामुळे वाचायला घेतली.