झोपी गेलेल्याला जागे करा

Submitted by आरागॉर्न on
पुस्तकाचे नाव

तिच्या जन्मापासूनच गरीबी सोबतीला होती. आई नोकराणी, बापाचा पत्ता नाही. पहिली सहा वर्षे आजीकडे काढली. गरीबी इतकी की आजी बटाट्याच्या पोत्याचे कपडे शिवून तिला घालायला लावायची. त्यामुळे ती चेष्टेचा विषय बनली होती. ती नऊ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला, नंतर नातेवाईक आणि परिचित यांच्याकडून विनयभंगाचे बरेच प्रकार घडले. १४ वर्षांची होती तेव्हा घरातून पळून गेली. गरोदर राहीली, मुलगा जन्मल्यानंतर काही काळातच मेला. इथपर्यंत ऐकल्यावर सहानूभूती वाटते, नाही? आणि आत्ता ती कुठे असेल असे विचारले तर डोळ्यासमोर कितीतरी वाईट पर्याय येतात.

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५८

पुस्तकाचे नाव

१. छोटेखानी कादंबरी आहे.
२. ही कादंबरी अनुवादित नाही. अस्सल मराठी आहे. मराठी मातीत रुजलेली आहे. लेखकाच्या दुसऱ्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.
३. संकेत म्हणून काही ­शब्द ­ठळक केले ­आहेत. ते नीट संदर्­भांच्या चौकटीत वाचले तर, ­ज्यांनी ही कादंबरी वाचली ­आहे त्यांना ती,­ पटकन ­ओळखता ये­ईल.
४. वेच्याचा दुसरा भाग आता दिला आहे. दुसऱ्या तीन तुटक रेषांच्या खाली तो आहे. पहिला भाग कादंबरीच्या सुरवातीलाच येतो. दुसरा भाग कादंबरीच्या अखेरीला येतो. तिथं घटनाचक्र जवळपास पूर्ण होते.
उत्तर दिले आहे!
---

गो.नी. दांडेकर

जन्मतारिख
871916
लेखकाचा पत्ता
तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे

श्री.गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर अर्थात गोनीदां हे मराठी साहित्यातील एक अनमोल असं रत्न्.त्यांना जवळचे, नात्यातले आणि ओळखीतले लोक आप्पा दाण्डेकर या नावाने देखील ओळखत.

दुर्गभ्रमणगाथा

भाषा
मराठी
आवृत्ती
चौथी आवृत्ती, जुलै २००८
किंमत
250.00
पृष्ठसंख्या
450

एका किल्ल्याच्या कुशींत जन्मलेला एक गडवेडा माणूस जन्मभर किल्ले भटकला किल्ल्यांएवढे प्रेम त्याने कशावरही केले नाही.
दरदर झरत्या पावसांत काकडत्या थंडीत भाजणार्‍या उन्हांत रात्रीं, दिवसां, पाहाटेंस, सायंकाळी तो किल्ले चढला-उतरला.
पांच तपे उलटून गेलीं किल्ल्यागडांचा वेध घेत तो त्यांच्या वाटा तुडवीत राहिला, कधीं आनंदाने थिरकला, कधीं प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेला असे त्याचे किल्ल्यागडांशी मैत्र
आयुष्याच्या सायंकाळीं क्षण स्वस्थ बसून तो तीं सगळीं स्मरणे जागवीत आहे.