पत्ता
१४७ बुधवार पेठ, अप्पा बळवंत चौक, पुणे ४११००२. फोन - ०२०-२४४८३५१७.
प्रकाशकांचा आनंददायक वेगळा अनुभव
आणि सध्याचे माझे प्रकाशक नितीन प्रकाशनचे श्री. नितीन गोगटे यांची सचोटी व व्यवसायिकता अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. लेखी करार करून प्रत्येक आवृत्तीचे मानधनाचे पैसे चेकने देणे, पुस्तक विक्रीचा चोख हिशोब दाखवणे आदि ते करतातच पण त्यांची लेखकांशी सन्मानपुर्वक वागणूक डोळ्यात भरते. त्यांचे श्री काळे व अन्य सहकारी तितक्याच आस्थेने व सन्मानाने वागवतात.
आज माझ्या पुस्तकांच्या शेकडो प्रती खपतात. दिल्लीकडे हिंदीत माझ्या पुस्तकाची चोरी करून पुस्तके छापली गेली. पण अजूनही महर्षींच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत पार पडले आहे.
लेखक - शशिकांत ओक. पुस्तकाचे नाव - नाडी ग्रंथ भविष्य - चला नवग्रह मंदिर यात्रेला