ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५७
५६ वे कोड्याचे उत्तर जाहिर व्हायच्या आत हे कोडे घालतो आहे. कारण एकदा आठवडा सुरू झाला की टंकायला वेळ होईल की नाही सांगता येत नाही. ह्या घाईबद्दल क्षमस्व
===========
गांधीयुगात डोळ्यापुढे आकार घेत होते ते काय हे स्वराज्य? एका अज्ञात बिहारी लोककवीने स्वराज्याच्या मिरवणूकीचे वर्णन करताना म्हटले आहे:
मिरवत आला
कलश धरून राजेंद्रबाबू बसले होते,
पुढे घोड्यावर स्वार होते जवाहरलाल.
आणि बापू?
बापू गर्दीत आमच्याबरोबर चालत होते!
ब्र' एक मुलुखावेगळी कादंबरी
ब्र
ब्र’ उच्चारणं सोपं नसतंच कधीही.
’ब्र’ म्हणजे अवाक्षर.
’गप्प बस... नाहीतर...’ या धमकीला न भिता धाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे ब्र!
स्वतःबाहेर पडणं, हा अशा भीतीवरचा उत्तम उपाय.
मग एक साधारण गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती अशाएकीचा सुरू झालेला प्रवास. बाईच्या नजरेनं निरागसपणानं पाहिलेलं जग. एक प्रकारे आदिवासी भागातल्या अनुभवांचा अहवाल.
त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधलं राजकारण आणि स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील! हे लेखन महानगर, शहर, खेडेगाव आणि आदिवासी वाड्यापाडे अशा सगळ्यांना सामावून घेतं.
कविता महाजन यांची ' ब्र' कादंबरी वाचताना मनामध्ये अनेक गोष्टी घर करून बसतात. संपूर्ण कादंबरीभर आदिवासी पाड्यात घडणारे व त्यांच्या जीवनाचा वेध घेणारे अनेक प्रसंग असल्यामुळे ही एक मुलुखावेगळी कादंबरी आहे याची जाणीव होते. पुस्तक वाचून संपवल्यानंतर एका अत्यंत वेगळया अनुभवातून आपण गेलो होतो हे लक्षात येते. मुळात ही कादंबरी प्रफुल्ला या मध्यमवर्गीय, शहरी साच्यातील एका मनस्वी स्त्रीची कहाणी आहे की, अंशत: लेखिकेचे आत्मकथन आहे की आजकालच्या सामाजिक कार्याविषयीच्या गुणदोषावर भाष्य करण्यासाठी वापरलेले तंत्र आहे हे शेवटपर्यंत कळत नाही.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५६
एका धाग्यावर श्री.सागर यानी आनंद साधले यांच्या संस्कृत-मराठी 'सोनेरी मालिका' पुस्तकांची एक यादी दिली आहे. त्यात 'कालिदासाच्या 'मालविकाग्निमित्र्' चे नाव वाचल्यावर चटकन एका कथेची आठवण झाली, जिच्यात अगदी गंमतीशीररितीने या नाटकातील पात्रांचे नाव येते. तीच कथा खालील संभाषणावरून सदस्यांनी ओळखायची आहे.
.....'नमस्कार ! नमस्कार!" कोणी तरी अगदी त्याच्याजवळच खिस्स केले. तो चमकला व त्याने मागे वळून पाहिले. हातात नेहमीची पिशवी घेऊन दाढीवाले केतकरशास्त्री उभे होते.
"का? फार दिवसांनी गाठभेट?" एक चारमिनार पेटवीत त्याने विचारले. गेल्या शनिवारीच त्यांची भेट झाली होती.
श्री.दा.पानवलकर.....एक विलक्षण प्रतिभावंत कथाकार !!

इथे एका धाग्याच्या निमित्ताने प्रसिद्ध कथाकार "श्री.दा.पानवलकर" यांच्याविषयी चर्चा छेडली गेली असता असाही विचार निघाला की या निमित्ताने त्यांची/त्यांच्या कथा साम्राज्याचीही सविस्तर ओळख करून द्यावी. तोच हा एक अल्पसा प्रयत्न.