काथ्याकूट

साहना's picture
साहना in काथ्याकूट
5 Mar 2026 - 01:01

वेताळ कथा - कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश

राजा विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडाजवळ पुन्हा आला आणि त्याने प्रेत काढून खांद्यावर घेतले आणि मौन व्रत धारण करून तो पुन्हा चालू लागला. तेव्हा प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
3 Mar 2026 - 11:47

इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा

इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
3 Mar 2026 - 05:07

पाताळयंत्री चर्चा

पाताळयंत्री या शब्दाचा गर्भित अर्थ आता वेगळ्या रुपात आपल्याला समजतो आहे असे वाटते.

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in काथ्याकूट
1 Mar 2026 - 07:41

चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८

या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा.

केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.‌

kvponkshe's picture
kvponkshe in काथ्याकूट
25 Feb 2026 - 20:09

!!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!

भाग २ - उत्पादन कंपनीतील आजारपण आणि कॉर्पोरेट मधले आजारपण !

kvponkshe's picture
kvponkshe in काथ्याकूट
18 Feb 2026 - 08:21

!!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!

२००३ ते २००६ मी भूगाव पुणे येथे एका लिमिटेड कंपनीत प्रोडक्शन मध्ये इंजिनिअर म्हणून काम करत होतो. पगारवाढीसाठीचे डिस्कशन अगदी तोंडावर येऊन ठेपले होते. सोबत मार्च चे टार्गेट कम्प्लिट करायचे होते. आमची कंपनी ऍक्सेस कंट्रोल सिस्टम्स बनवायची.

Abhay Khatavkar's picture
Abhay Khatavkar in काथ्याकूट
8 Feb 2026 - 15:26

श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड

श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
8 Feb 2026 - 10:13

धागा भरकटण्याचा धोका

आतापर्यंत उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. मध्यंतरी "जानव्याची पॉवर" हा मिपावरील धागा अप्रकाशित झाला. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे.

kvponkshe's picture
kvponkshe in काथ्याकूट
5 Feb 2026 - 10:15

आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !

सायबर सेक्युरिटी मध्ये मी आणि माझ्या वयाचे म्हणजे ५०शी च्या आसपासचे लोक एक नवीन आव्हान झेलत आहोत. पूर्वी म्हणजे २००० ते २०१० बिग ४ कंपनीत जॉब मिळणे म्हणजे एक शान होती. तिथे जॉब मिळाला तर उमेदवार उत्तम प्रतीचे कौशल्ये असणारा असणारच असे मानले जात होते. मी अनेकदा बिग ४ मध्ये प्रयत्न केला पण एकदाही यश आले नाही.

तुर्रमखान's picture
तुर्रमखान in काथ्याकूट
2 Feb 2026 - 02:02

बजेट २०२६

खरं सांगायचं तर बजेट २०२६ मी पूर्णपणे ऐकलं नाही. संसदेतल्या दीर्घ भाषणाचा संयम माझ्यात नाही आणि तो असल्याचा आव आणणंही मला योग्य वाटत नाही. पण हो, सोशल मीडियावर फिरणारे मीम्स पाहिले, “निर्मला आंटीने रविवारीच बाजार कोसळवून इतिहास रचला” अशा हेडलाईन्स नजरेत आल्या. थोडंफार वाचलं, काही मुद्दे कानावर पडले.

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in काथ्याकूट
1 Feb 2026 - 05:04

चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६

चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
30 Jan 2026 - 11:28

बारामती विमान अपघात: वैमानिकाची 'मानवी चूक' की 'तांत्रिक अभाव'?

बारामती येथे कोसळलेल्या 'व्हीटी-एसएसके' (VT-SSK) या लियरजेट ४५ बिझनेस विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रभर दुःख, आवेग आणि शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दादांविषयी व सहप्रवाशांविषयी हळहळ व्यक्त होत आहे.

नूतन's picture
नूतन in काथ्याकूट
21 Jan 2026 - 13:41

या साड्यांचं काय करायचं?

नमस्कार मंडळी.
हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
मला तर तो अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. म्हणजे असं की , लग्न -मुंजी, शुभकार्य, त्या निमित्ताने होणारी देवाणघेवाण, हौस, बघितल्यावर घ्यावीशी वाटली म्हणून, कुणाला तरी तेवढीच मदत होईल म्हणून...अशा अनेक कारणांमुळे साड्या जमा होतात. कपाटं ओसंडून वहातात.

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in काथ्याकूट
16 Jan 2026 - 19:07

महापालिका निवडणूक निकालांचे चर्वितचर्वण

(उर्फ: “निकाल आले, पण अर्थ कुणाला लागला?”)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
16 Jan 2026 - 13:18

स्टारफिशची पचनसंस्था

समुद्राच्या अथांग विश्वात आढळणारा **स्टारफिश** (मराठीत *समुद्रतारा*) हा दिसायला जितका साधा आणि सुंदर वाटतो, तितकीच त्याची अंतर्गत रचना विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेषतः त्याची **पचनसंस्था** ही प्राणिजगतातील एक अद्वितीय रचना मानली जाते. इतर प्राण्यांप्रमाणे तोंड, अन्ननलिका, जठर आणि आतडी असा सरळ पचनमार्ग स्टारफिशमध्ये आढळत नाही.

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
16 Jan 2026 - 09:25

व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्म

व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्म

जगातले वेगवेगळे धर्म 'व्यक्तीस्वातंत्र्य' या कल्पनेकडे कसे बघतात, अशी उत्सुकता सक्काळी-सकाळी निर्माण झाली. मग ए०आय्०ला शरण गेलो. प्राथमिक शोध चॅटजीपीटीच्या मदतीने घेतल्यानंतर अधिक खोल शोध घेण्याची इच्छा निर्माण झाली. यासाठी जेमिनीसारखा दुसरा त्राता नाही.

ताजे प्रेत's picture
ताजे प्रेत in काथ्याकूट
14 Jan 2026 - 21:56

AI , विजेची गरज , वीज कंपनी , गुगल आणि अडाणी

आज गुगल ने त्यांच्या डेटा सेंटर ची विजेची प्रचंड मागणी लक्षात घेऊन एक वीजनिर्मिती कंपनी विकत घेतली

एक भीषण गोष्ट लक्षात आली का ?
कोणी AI बद्दल काहीही ऐकले नसेल तेंव्हा २००४/५ मध्ये अडानी ने प्लान केला
आणि २००६ मध्ये पहिला पॉवर प्लांट उभारला

आणि अडानी पॉवर ने बराच विस्तार केला
अगदी विदेशातून कोळसा आणण्याचा पर्यंत केला

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
9 Jan 2026 - 13:51

दूरवरची स्पष्ट प्रतिमा

दूरवरची स्पष्ट प्रतिमा दाखवणार्‍या दुर्बीण किंवा बायनॉक्लर्स, बायनॉक्युलर्स Binoculars चर्चेसाठी हा धागा काढत आहे.

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
3 Jan 2026 - 14:40

सध्या मी काय पाहतोय ? भाग १२

P1
कराटे गर्ल्स ही एक प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा वेब सिरीज आहे, जी हल्लीच माझ्या पाहण्यात आली. ही २०२४ मध्ये प्रदर्शित झाली वेब सिरीज असुन हा पहिला सिझन आहे.