पाताळयंत्री चर्चा

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
3 Mar 2026 - 5:07 am
गाभा: 

पाताळयंत्री या शब्दाचा गर्भित अर्थ आता वेगळ्या रुपात आपल्याला समजतो आहे असे वाटते.

युद्धभूमीवर जेव्हा वरून येणाऱ्या मृत्यूची भीती वाढते, तेव्हा सैन्य नैसर्गिकरित्या जमिनीच्या गर्भात आश्रय शोधू लागते. पाकिस्तानने भुयारी युद्धतंत्र अवलंबले आहे. हा एक अतिशय धूर्त आणि खोलवर विचार केलेला लष्करी डाव आहे. पाकिस्तानने अशा भुयारी मार्गांचे जाळे विणले आहे - असणार. हे जाळे आधुनिक सॅटेलाइट आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या नजरेला सहज चकवा देत असणार. या रणनीतीचा मुख्य आधार म्हणजे अदृश्य राहून वार करणे, रसद पोहोचवणे. हे बोगदे अनेकदा इतके खोल असतात की वरून होणारी साधी बॉम्बफेक त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. ऑप सिंदूरमध्ये जरी आपण काही महत्त्वाची भुयारे उडवली असली तरी अनेक अशी भुयारे अजूनही असणार हे नक्की. भारतीय सैन्याने या 'पाताळयंत्राला' उत्तर देण्यासाठी तितकीच आक्रमक आणि आधुनिक पद्धत अवलंबली. केवळ मानवी डोळ्यांवर अवलंबून न राहता ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार चा वापर केला.

याच पद्धतीने जर इराणच्या भौगोलिक रचनेचा विचार केला तर हे भुयारी युद्ध तंत्र एका वेगळ्याच आणि अधिक भयानक उंचीवर पोहोचलेले दिसते. अमेरिकेने इतके हल्ले करूनही इराण प्रतिहल्ले केले - असे तो कसे करू शकला? सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत इराणने आपली अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन तंत्रज्ञान केवळ जमिनीवर न ठेवता झॅग्रोस आणि अल्बोर्झ सारख्या अजस्त्र पर्वतरांगांच्या काळजात दडवून ठेवली असणार. इराणने या कठीण पाषाणात शेकडो फूट खाली क्षेपणास्त्र शहरे वसवली असावीत . अशा प्रदेशांतून ही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अनपेक्षित ठिकाणी थेट जमिनीच्या खालून बाहेर यतात. त्यांचा उगम शोधणेही कठीण जाते. हे केवळ साधे बोगदे नसून संपूर्ण लष्करी तळ असणार आहेत कदाचित तेथे हजारो सैनिक, रसद आणि इंधन कित्येक महिने सुरक्षित राहू शकते. गाझा मध्ये हे तंत्र केलेले दिसून आले आहे. म्हणजे इराणमधे तर नक्की असणार. इराणच्या मध्यवर्ती पठारी भागात आणि विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या डोंगररांगांमध्ये इराणने गुप्त जागा तयार केल्या असाव्यात.
या अवाढव्य पाताळयंत्राला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने लष्करी ताकद आणि इस्राएली विज्ञान पणाला लावले जाणार आहे. कदाचित प्रगत अशा ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार चा वापर करून याचा शोध आधीच लावलेला असणार आहे. या भुयारी शहरांचा अंत करण्यासाठी अमेरिकेचे सर्वात मोठे आणि क्रूर शस्त्र म्हणजे GBU हा १५ हजार किलो वजनाचा महाकाय बॉम्ब. एखाद्या खिळ्याप्रमाणे काँक्रीट आणि कठीण पाषाणाचे २०० फूट जाड थर चिरून थेट बोगद्याच्या मध्यभागी जाऊन फुटतो. यामुळे डोंगरच्या डोंगर आतून कोसळतात संपुर्ण भुयारी जग एका क्षणात जिवंत थडगे बनू शकते.

तार्किकदृष्ट्या पाहिले तर हे युद्ध दीर्घकाळ चालण्याचे मुख्य कारण इराणची ही पाताळयंत्री रणनीतीच आहे. इराणच्या या पर्वतांना फोडून आत शिरणे जवळजवळ अशक्य आहे. जोपर्यंत त्यांचा दारुगोळा साठा आणि लष्करी नेतृत्व या भुयारी जगात सुरक्षित आहे, तोपर्यंत इराण शरणागती पत्करणार नाही असे वाटते. यामुळे हे युद्ध केवळ ताकदीचे न राहता कोणाची सहनशक्ती जास्त आहे यावर येऊन थांबते. अर्थात काय घडेल हे काळ ठरवेल.
आणि हे वरील सर्व अंदाज आहेत.
हे युद्ध कसे पुढे जाईल. पाताळयंत्राला उत्तर काय होऊ शकेल यावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे.
येथे अनेक खूप ज्ञानी विचारवंत आहेत त्यांनी या युद्धतंत्रावर अजून प्रकाश पाडावा ही विनंती.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

3 Mar 2026 - 7:51 am | विजुभाऊ

भुयारी आश्रय हे रणनीती व्हिएटनाम ने सर्वात अगोदर वापरली. अमेरीका जेरीस आली

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Mar 2026 - 8:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर

युद्ध लवकर संपवायचे असेल तर जास्तीत जास्त अमेरिकन सैनिकांना यमसदनास पाठवणे ईराणच्या/जगाच्या हिताचे आहे. कारण अमेरिकन सरकारवर ह्याचा प्रचंड दबाव असतो. व्हियेतनाम युद्धाच्या वेळेस असेच झाले होते. सुरुवातीला म्रुतदेह गुपचुप आणले जायचे. नंतर त्याचा बोभाटा व्हायला लागल्यावर अमेरिकेतच निदर्शने सुरु झाली. कदाचित ईराणही हेच धोरण अवलंबेल.

मदनबाण's picture

3 Mar 2026 - 2:18 pm | मदनबाण

युद्ध हे तंत्रज्ञान्,युद्ध सामुग्री,ह्युमन इंटलिजन्स आणि रणनिती यांचा वापर करुन लढले जाते.
इराण यावेळी थांबलेला होता आणि त्यांनी हल्ल्याची सुरुवात आधी केली नाही.जरी त्यांना माहित होते की आपल्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात युद्धाची तयारी केली जात आहे, तरी युद्ध आम्ही सुरु केले नसुन आमच्यावर केलेल्या हल्ल्याला आम्ही प्रतिउत्तर देत आहोत हा नॅरेटिव्ह सेट होण्यासाठी ते वाट पाहत होते, झाले देखील तसेच.
अमेरिका आणि इजराईल या दोघांकडे असलेले तंत्रज्ञान जरी इराणकडे नसले तरी लढा देण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि बदला घेण्याची मानसिकता इराणकडे आहे आणि आत्ता ते याच मानसिकतेचे प्रर्दशन करत आहेत.
अमेरिकेने आत्ता पर्यंत इराणच्या १० युद्ध नौका समुद्राच्या तळाशी पाठवल्याचे कळते आहे.

पाताळयंत्री:
खामेनी पाताळयंत्रीच झाले होते आणि बहुतेक बंकर बस्टरच्या वापरामुळे ते ढगात गेले.ह्युमन इंटलिजन्संमुळेच हे शक्य झाले. सीआयए आणि मोसाद गेल्या अनेक महिन्यांपासून खामेनींच्या हालचालींवर आणि सुरक्षेच्या पद्धतींवर बारकाईने लक्ष ठेवून होते.२८ फेब्रुवारीच्या सकाळी खामेनी इराणच्या वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरच तातडीने हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांना ठार करण्यात यश मिळाले.

पाताळयंत्री मिसाईल्स:
या पाताळयंत्री मिसाईल्सच्या सिटीज असतात आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असतात. यातल्या काही अंतर्गतपणे एकत्रीत जोडलेल्या असतात तर काही पूर्णपणे वेगळ्या असतात.अमेरिकेच्या NORAD बद्धल मी कधी काळी मिपावर एका प्रतिसादात उल्लेख केला होता.याचे बांधकाम इंजिनिअरिंगचा एक चमत्कार मानले जाते.
इराणच्या मिसाइल सिटीज ५०० मीटर किंवा त्याहुन खाली असल्याचे कळते आणि आश्या सिटीजची निर्मीती बोगदे करुन आत केलेली असते.पाकिस्तानात असे अनेक बोगदे बांधले आहेत त्यातील एक नमुना खाली देतो.
दुवा: https://tinyurl.com/2vvtrm36

ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण बोगदे उडवले की नाही ते मला ठावूक नाही पण नूरखान एअर बेसवर हल्ला करुन त्यांचे मोठे नुकसान केले होते,काल तालिबान ने इथेच असलेल्या त्यांच्या कमांड आणि कंट्रोल सेंटरवर हल्ला केला आहे.

ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार (GPR),सॅटेलाइट इमेजरी, SAR ( सिंथेटिक अपर्चर रडार ) ,Seismic Sensors ( जमिनीच्या कंपनांवरून खाली काही हालचाल चालली असेल तर कंपनांवरुन माग काढण्यासाठी ) आणि थर्मल इमेजिंगचा वापर बोगदे आणि त्यांचे विणलेले जाळे शोधण्यासाठी केला जातो.तुम्ही सांगितल्या प्रमाणे GBU सिरीज चे बॉंम्ब वापरले जातात ( GBU-57 MOP,GBU-28 आणि BLU-109 )

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Exclusive Scene | The Kerala Story 2 Goes Beyond

इराण कडे सामान्य हत्यारांचा प्रचंड साठा आहे. मागील अनेक दशके इराण सातत्याने त्यांचे निर्माण करत आला आहे. इराणी लोक अत्यंत हुशार आणि मेहनती आहेत. इस्लाम चे जोखड नसते तर हे राष्ट्र आज अत्यंत प्रगत राष्ट्र असते.

इस्राएल चे राष्ट्र सुद्धा एक धर्मांध पद्धतीचे राष्ट्र आहे. खोटे बोलणे, षडयंत्र करणे, ब्लॅकमेल, निष्पाप लोकांची हत्या, येन केन प्रकारें आपले हित साधून घेणे आणि प्रचंड प्रोपागंडा ह्यावर इस्राएल चालतो. बहुतेक गोष्टी ब्लॅकमेल, आर्थिक गुन्हे आणि अमेरिकन लोकांना ठगवणे ह्यांनी हस्तगत केल्या आहेत. एप्सटिन फाईल्स मधून ह्यांची षडयंत्र दिसून येतात. हि मंडळी भयंकर डांबिस आणि गोड बोलून गळा कापणारी आहेत. भारतीयांनी ह्यांना गरजेपुरता मामा म्हणून ठेवायला पाहिजे. जास्त जवळीक नको.

इराण मध्ये ट्राफिक केमेरा हॅक केले, डेंटिस्ट तर्फे विशेष इम्प्लांट दांतात घालून ट्रेक केले इत्यादी बटवण्या इस्राएल करते त्यानं कोबी सरकारच्या IT सेल प्रमाणेच प्रोपागंडा जास्त आहे. एव्हडी कर्तव्यदक्ष सुरक्षा यंत्रणा आहे तर ऑक्टॉबर ७ ला कसे बरे तुम्हाला काहीच ठाऊक नव्हते ? ९/११ चे खापर इराण वर फोडण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला होता पण तो साध्य नाही झाला.

युद्धांत ध्येय काय आहे आणि ते प्राप्त करण्याची क्षमता आहे कि नाही हे महत्वाचे आहे.

अमेरिकेकडे इराणचे संपूर्ण नेतृत्व संपविण्याची क्षमता आहे. इराणी आर्मी आणि नौदलाला नेस्तनाबूत करण्याची क्षमता आहे. पण त्यांनतर काय ? अमेरिकन सैन्य इराण मध्ये घुसणार का ? घुसले तरी करणार काय ? इस्राएल ने १६० लहान मुलींना ठार केले. त्यांचे आई वडील अमेरिकन सैन्याचे "कैवारी" म्हणून स्वागत करतील काय ? इराण मध्ये अनेक ग्रुप्स आहेत त्यांची भांडणे कशी रोखणार ?

आणि समजा बेस्ट केस सिनॅरिओ. इराण मध्ये सत्ता बदल झाला आणि अमेरिकेशी जवळीक असणारा नेता निर्माण झाला आणि जनता त्याच्या मागे उभी राहील तर काय ? असा स्टेबल आणि समृद्ध इराण हा इस्राएल च्या हिताचा आहे काय ? कारण समृद्ध इराण आणि इतर मुस्लिम राष्ट्रे ह्यांनी आपले वैर मिटविल्यास इस्राएल ला धोका जास्त आहे. हा धोका अतिरेकी हल्ले किंवा थेट युद्धाचा नसला तरी इस्रायलची आर्थिक कोंडी हि राष्ट्रे मिळून करू शकतात. त्यामुळे इस्राएल तरी इराण मध्ये यादवी माजविण्याचा प्रयत्न करेल असे वाटते. खोमेनी नंतर, मिळेल त्या नेत्याला ठार मारणे हा त्याचाच भाग आहे. कुठलाच राष्ट्रीय स्तराचा क्रेडिबल नेता नसेल तर यादवी होण्याची शक्यता बळावते.

मदनबाण's picture

4 Mar 2026 - 1:10 pm | मदनबाण

@साहना
तुमचा प्रतिसाद आवडला आणि इजरायलच्या बाबतीत असलेला तुमचा दृष्टीकोन योग्य आहे.
अमेरिकेला ज्यू लॉबी नियंत्रित करते हे आता सर्वश्रुत आहे आणि अमेरिकेत देखील अमेरिकन नागरिक त्यांच्या विरोधात काही काळा पासुन बोलत आहेत आणि आता या युद्धामुळे हा विरोध अधिक प्रखर झालेला दिसतोय. ९/११ चे म्हणाल तर त्या घटनेच्या वेळी डान्सिंग ज्यू प्रकरण वर आले होते जे ९/११ प्रमाणेच दाबले गेले.
अमेरिका त्यांच्या बलाढ्य साम्राज्याचे शेवटचे दिवस पाहत असुन अनेक अमेरिकन अमेरिकेतुनच बाहेर पडत असल्याचे समजत आहे,इजराइल देखील त्यांचा अमेरिकाचा उरला सुरला वापर करुन हिंदुस्थानाकडे वळत असल्याचे दिसते.टकर कार्लसन ने आत्ताच यावर भाष्य केलेले पाहण्यात आलेले आहे.अमेरिकेतल्या एका निवृत्त कर्नलच्या खुलाश्या नुसार अमेरिकेचे अनेक बेस नष्ट झाले आहेत, बंदरांवरील सेटअप नष्ट झाला आहे.याचा फॉलबॅक म्हणुन हिंदुस्थानी पोर्टस लेस दॅन आयडियल दॅट्स व्हॉट द नेव्ही सेज हे त्यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.आपण इजराइला कंट्रोल करत नसुन इजराइल आपल्याला कंट्रोल करते आहे हे देखील याच कर्नल ने सांगितले आहे. मागे मिपावर मी एका प्रतिसादात Interstellar दिसणार्‍या ड्रोनवर इंडिया दिसत आहे याचा उल्लेख केला होता, माझ्या आत्ताच्या विश्लेषणा नुसार आपल्याकडे इजारयली अलायन्समुळे येत्या काळात आपले डिफेन्स सेक्टर बूम करणार आहे. इजरायलच्या एका व्यक्तीच्या मुलाखतीत आमच्यासाठी काम करायला भारताची लोकसंख्या आहे हे वक्तव्य देखील तितकेच चर्चेत आले होते.
बादवे... आपल्या वेस्टर्न कमांडला फेब्रुवारी मध्ये युएस अ‍ॅंबॅसिडर Sergio Gor यांनी भेट दिली होती तेव्हा ही अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या!
संदर्भः US ambassador Sergio Gor visits Indian Army's Western Command HQ with Indo-Pacific commander
थोडक्यात आपल्याकडे इजरायली नियंत्रण पूर्णपणे मान्य केले जाईल का? हे येणारा काळच सांगेल.

इराण अपडेटः
इराण जवळपास गेली २० वर्ष आत्ता जी स्थिती उद्भवली आहे त्यासाठी तयारी करत होता. मोठ्या प्रमाणात त्यांनी विवध रेंजच्या मिसाईल्स आणि ड्रोन्सचा साठा करुन ठेवला होता जो आता त्यांनी वापरात आणलेला दिसतो.सीआयए आणि मोसाद यांनी मिळुन आधी इराणाचे चलन पाडले जेणे करुन जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण होईल व असलेल्या सरकार विरोधात आक्रोश निर्माण होईल,झाले देखील पण प्रमुख नेत्रुत्व पहिल्यांदा ठार केल्याने जनता इराणच्या झेंड्याखाली एकवटली ज्याचा विचार केला गेला नव्हता. जरी कुठलेही नेत्रुत्व नसले तरी छोट्या छोट्या समुहातुन हल्ले केले जावेत याची देखील इराण मध्ये तयारी केली गेली होते ज्याचे परिणाम आपल्या समोर आहेत. इराणच्या इंटलिजन्स ने कोण कुठल्या बिल्डिंग मध्ये आहे हे व्यवस्थित हेरुन युएइ मध्ये हल्ले केले असे सध्या तरी समजत आहे.
इराण ने अमेरिकेला सगळ्यात मोठा दणका कतार मध्ये दिला असुन अमेरिकेचे तिथे असलेले साधारण १ ते २ बिलियनचे बॅलॅस्टिक मिसाइल अर्ली वॉर्निग रडार नष्ट करुन निगराणी करणारे महत्वाचे डोळेच फोडुन टाकले आहेत.
इलेक्ट्रॉनिक जॅमिंग आणि स्फुपिंग देखील पाहण्यात आले होते,चायनीज जाहजे जीपीस जॅमिंग फेस करत होती मग त्यांनी स्वतःला बीडीस (
BeiDou Navigation Satellite System ) वर स्वीच केले, तसेच चायना इराणला हाय रेसोल्युशन सॅटेलाईट डिटेल्स पुरवत असल्याचे दिसत आहे व ते ऑनलाईन इमेज सुद्धा रिलीज करत आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी देखील चीन पाकिस्तानला लाईव्ह फीड डिटेल्स देत होता.इतके होऊन देखील कोबींच्या चीन धोरणात शष्प फरक पडलेला दिसला नाही. इराणने इजरायलचे Hermes 900 drone सिग्नल जॅम करुन पाडल्याचे देखील समजते आहे.

जाता जाता: लईच बेक्कार रिसेशन येणार आहे आणि आपल्या इथे तेलाच्या किंमती किती काळ सरकार नियंत्रित करु शकेल याची मला आता शंका वाटत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Arash - Boro Boro | Nippandab Remix | FAST & FURIOUS [Dubai Scene]

मदनबाण's picture

3 Mar 2026 - 10:56 pm | मदनबाण

आज दुपारी एएनआय पचकले आणि म्हणाले की आपल्याकडे २५ दिवसाचा क्रूड आणि रिफांइण्ड ऑइलचा स्टॉक आहे! [ काय गरज होती जगाला ओरडुन सांगण्याची? ] तरी नशिब यात एसपीआर [ स्पेशल पेट्रोलिअम रिझर्व ] गृहित धरलेले नाही. ५० दिवसाच्या स्टॉकला जरासा ठीक-ठाक म्हणता येईल,जो बहुतेक हे दोन्ही मिळुन आपल्याकडे असावा.सध्या रशियाकडुन बहुतेक १.४ मिलियन बॅरल्स पर डे ने आपल्याकडे तेल येत आहे.कोबी जी ही आयात आता अधिक वाढवण्यासाठी तात्यांकडुन परमिशन मागतील का?
आत्ताच्या घडीला ब्रेंट क्रूड प्राईज ८३.८६ आहे.
इराणचे ९०% ऑइल चीनला जाते [ चीन चा इराण बरोबर ४०० बिलियन डॉलरचा २५ वर्षांसाठी केलेला करार आहे. ] आणि व्हेनाझुएलाचे ७०% ऑइल चीन ला जात होते. दोन्हीकडे आता ट्रम्प तात्यांनी पाचर मारुन ठेवली आहे.ऑइल टॅकरसाठी इनश्युरन्स असतो व हा इनश्युरन्स देणार्‍या कंपन्यांनी तो मागे घेतलेला दिसतो याचा परिणाम अर्थातच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या जाहजांनाच आहे,जहाजे इनश्युरन्स नसल्यास तिकडे जाणार नाही मग तेल वाहतुक होणार नाही.
तिकडे कतार गॅस ने गॅस उत्पादन बंद केले आहे, जगातील २०% एलएनजी सप्लाय हा कतार कडुन येतो.त्यामुळे युरोपीची बुच्चण लागली आहे व त्यांच्यासाठी गॅसच्या किंमत ३७% नी वाढली आहे. यात भर म्हणुन इराकने जगातली दुसरी सगळ्यात मोठी ऑइल फिल्ड बंद केली आहे.
थोडक्यात जगातल्या सगळ्या स्टॉक मार्केटचा बाजार उठणार ! :)))

जाता जाता: इराण मध्ये सुप्रिम लिडर निवडायची एक समिती असते त्यातील ८८ लोकांना एकाच वेळी इजरायल ने ढगात पाठवले आहे.वरती ७२ हुरांची फार बिकट अवस्था होणार आहे, किती गर्दी! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Exclusive Scene | The Kerala Story 2 Goes Beyond

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Mar 2026 - 10:33 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"काय गरज होती जगाला ओरडुन सांगण्याची?"
नाहीतर कळले नसते का जगाला? पिगॅससच्या मदतीने मोदी/शहा/राजनाथ कोणाकडे बोलतात हे बेंजामिनला माहित नसणार?

माई काय बोलावे? सगळी नुसती जुमलेबाजी आणि नौटंकी.मनमोहन बोलत नव्हते आणि कोबी इतके बडबड करत आहेत की आता त्याचे अजिर्ण झाले आहे.
इजरायली पदक गळ्यात घालुन घेतले की पट्टा? ते कळेल पुढे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Arash - Boro Boro | Nippandab Remix | FAST & FURIOUS [Dubai Scene]

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Mar 2026 - 5:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आमची आपली साधी मागणी- ईराण, ज्या देशाबरोबर आपले चान्गले संबंध होते, त्या देशाचा प्रमुख आणि त्याच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली त्यावर थोडे दु:ख व्यक्त करायला काय हरकत होती?
१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. तेव्हा ह्याच ईराणने त्यांच्या नागरिकांना तीन दिवस दुखवटा पाळण्याचे आवाहन केले होते.नेत्यान्याहु आणी ट्रम्प हे बदनाम टपोरी नेते आहेत हे सगळ्या जगाला माहित झाले आता.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Mar 2026 - 5:08 pm | अमरेंद्र बाहुबली

माई एफस्टीन फाईल मधे नाव आहे विश्वगुंचे! समजून घे!