चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in काथ्याकूट
1 Mar 2026 - 7:41 am
गाभा: 

या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा.

केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.‌

आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.‌ हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?

प्रतिक्रिया

इराणने शेजारी देशांवर हल्ला केला आहे. इराण होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न करू शकते. याचा तेल पुरवठ्यावर आणि किंमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. हे युद्ध २-३ दिवसांत थांबले तर बरे. नाहीतर संपूर्ण जगाला बरेच दिवस बराच त्रास होऊ शकतो.

मदनबाण's picture

1 Mar 2026 - 2:19 pm | मदनबाण

युद्धः
सगळीकडे अशांतता पसरताना दिसत आहे. शिया इराण वरील हल्या नंतर आता मिडल इस्ट पूर्णपणे अशांत झालेला दिसत आहे. दुबईत ड्रोन हल्ले झाल्याने बरीच चर्चा झालेली दिसली. कालच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने काल VHF रेडिओद्वारे संदेश पाठवले होते की, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला जाण्याची परवानगी नाही. यामुळे या मार्गात असलेल्या अनेक ऑईल टँकर्सनी त्यांचा मार्ग बदलला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी ७२ हुरांकडे गेल्यामुळे हा मार्ग अजुन किती काळ विस्कळीत राहील हे सांगता येत नाही व याचा परिणाम तेलाच्या किंमतीवर होईल असे दिसते. मी काही लाईव्ह ट्रॅकिंग इमेजेस पाहिल्या होत्या त्या नुसार त्या भागातील जाहजांची हालचाल आणि संख्या रोडावली आहे. इराणने यावेळी एकत्रीतपणे बहारीन, कुवैत,कतार आणि युएइ यांच्यावर हल्ले केले असुन मुख्य लक्ष या ठिकाणी असलेले अमेरिकन बेस होते.

एआय स्टोरी : आधी एका ठिकाणी दिलेल्या प्रतिसादात मी सांगितले होते की अँथ्रोपिक च्या क्लॉड एआय चा वापर करुन व्हेनाझुएलाच्या मादुरोला अमेरिक मेलिटरी ने पकडले होते. याच Claude AI चा वापर इराणच्या विरोधात देखील केला गेला आहे.
अँथ्रोपिक आपल्या अस्तित्वाची लढाई देखील लढत असुन ही लढाई खुद्द अमेरिकन सरकारच्या विरोधात आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अँथ्रोपिक कंपनीला Supply Chain Risk घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.अँथ्रोपिकने अमेरिकन सरकारला त्यांचे AI मॉडेल क्लॉड (Claude) वापरताना दोन गोष्टींना नकार दिला होता, त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
वाद होण्याचे मूळ कारण :
अँथ्रोपिक कंपनीचे म्हणणे आहे की, सध्याचे AI मॉडेल्स पूर्णपणे स्वयंचलित शस्त्रांसाठी सुरक्षित नाहीत व त्यांचा तसा वापर केल्यास नागरिक आणि सैनिक दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो.तसेच,सामान्य अमेरिकन नागरिकांवर पाळत ठेवणे हे त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे.अँथ्रोपिकने स्पष्ट केले आहे की कोणत्याही दबावाखाली किंवा शिक्षेच्या भीतीपोटी ते त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करणार नाहीत.
संदर्भः
Statement from Dario Amodei on our discussions with the Department of War
Statement on the comments from Secretary of War Pete Hegseth

कोबी न्यूजः
कोबी जी नुकतेच इजरायला जावुन आले. कोबींजींना विवध पदके गळ्यात घालुन घ्यायची फार हौस आहे आणि इजरायला अर्थातच हे नीट माहित असल्याने त्यांनी कोबीजींची हैस भागवण्यासाठी एक नवेच पदक निर्माण केले आणि कोबीजींच्या गळ्यात घातले, कोबीजींना मग हर्शवायु झाला आणि त्यांनी इजराईल हे आपले फादर नेशन असल्याचे घोषीत करुन टाकले.आता या विधानामुळे वाद निर्मीती होऊ पाहत आहे.

हिंदुस्थानी आयटी इंडस्ट्री:
सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेले क्षेत्र आणि या क्षेत्रातुन जाणार्‍या नोकर्‍या यावर युट्युबर भरपुर प्रमाणात व्हिडियो आले आहेत. येत्या काळात कंपन्या कोणत्या कोणत्या मार्गांनी कर्मचार्‍यांना घरी पाठवता येईल यावर विचार करत असल्याचे आणि त्याचे टारगेट आता सेट केले जात आहे अशी चर्चा / माहिती मिळत आहे. एआय एजंट्स डिप्लॉयमेंट हा मुख्य मुद्दा आता तरी दिसत आहे. मुंबई,पुणे,बँगलोर,हैद्राबाद ही शहर या सेक्टरच्या जोरात मोठी झाली आणि सर्वच प्रकारच्या अर्थकारणाला मोठे बळ मिळाले होते, त्याचे आता काय होईल? असे प्रश्न आता सामान्य लोकांना देखील भेडसावु लागले आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Mukkuthi... : Mamangam

कांदा लिंबू's picture

1 Mar 2026 - 2:22 pm | कांदा लिंबू

सोन्याच्या किमती पुन्हा उसळी घेऊन आज पावणेदोन लाखांच्या घरात गेल्या आहेत. ‌

पेट्रोकेम कंपन्यांच्या स्टॉक्स् वर लक्ष ठेवायला हवे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Mar 2026 - 3:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सध्याच्या या युद्धात भारताची भूमिका काय? की नेहमीप्रमाणे नरो वा कुंजरो वा? काहीच भूमिका न घेणे ही पण एक भूमिकाच असते असे एकदा नरसिंह राव म्हणाल्याचे वाचले होते!सध्या तरी अमेरिका/ईस्रायलला न दुखवता गुळगुळीत बोलणे हे धोरण दिसते. आता कदाचित अड्कलेल्या भारतियांना आणण्यासाठी एयर ईंडियाची विमाने पाठवतील. कदाचित त्याला 'ऑपरेशन तेलदूत/ऑपरेशन कॅकटस' असे नाव देतील.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Mar 2026 - 3:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

यु.एन. सुऱ़क्षा परिषदेची तातडीची बैठक झाली. ईराणच्या प्रतिनिधीनी अमेरिकेचे/ईस्रायलचे त्यांच्यासमोरच वाभाडे काढले.
ईराणने चीन्/रशिया/पाकिस्तान ह्या तीन देशांचे स्पष्ट भूमिका घेतल्याबद्दल आभार मानले.
https://www.youtube.com/watch?v=6KYWJNWgVdI

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2026 - 7:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विश्वगुरु व्हायचं तर, भूमिका घ्यावी लागेल. 'वार रुकवा दी पापा' अशा जाहिराती करून विश्वगुरु होता येत नसतं.

कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला युद्ध घोषित न करता अशा प्रकारे मारणे हे 'आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सनदेचे थेट उल्लंघन मानले जाते. याला बऱ्याचदा कायद्याबाहेरील हत्या म्हटले जाते. असेच म्हणून रशियाने या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.

जागतिक राजकारणात एक अत्यंत धोकादायक पायंडा पडला आहे. जर आज महासत्तांनी राष्ट्रप्रमुखांना मारणे सामान्य केले, तर भविष्यात इतर देशही त्यांच्या सोयीनुसार याचे अनुकरण करू शकतील, असे म्हटल्या जात आहे.

-दिलीप बिरुटे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Mar 2026 - 10:18 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अमेरिका/ईस्रायल ह्यानी शाळेवर हल्ला करुन ५७ लहान मुलांना ठार मारले . ही मोठी चूक आहे. हा दहशतवाद आहे. सत्तेची सूत्रे आता कोणच्याही हातात गेली तर ईराण ह्याचा हळुहळु बदला घेणार. ह्यातुन ईराणमध्ये दहशतवादी संघटना जन्माला येतील आणि मग आय्सिस-अल-कायदा जे करत होते, त्याचीच पुनराव्रुत्ती होईल. मध्य-पूर्व भागात ईस्रायल-अमेरिकेला 'अरे ला का रे' करणारा कोणताही देश नको आहे.
खेमेनी ह्यांचा मृत्यु झाला म्हणुन यु-ट्युबवरच्या काही मराठी पत्रकारांना आनंद झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प भारताची थट्टा करतात,"भारत-पाक' युद्ध मीच थांबवले म्हणतात त्यावर हे 'देशप्रेमी' पत्रकार मूग गिळुन गप्प असतात.

आगामी युद्धांत भारताने अत्यंत खंबीर अशी भूमिका घेतली आहे. कोबी सरकारने त्वरित हालचाल करून खालील गोष्टी केल्या आहेत.

१. बटलर साहेबानी आपले ChatGPT subscription प्लस ला अपडेट केले आणि लेसर आय चे नवीन अत्याधुनिक मिम्स बनवले आहेत.
२. कोबीजी नी विविध मंदिरांत लोटांगण घालून त्याचे ड्रोन ने फोटो काढून प्रकाशित केले आहेत.
३. युद्ध कुणीही जिंको पण सर्व मीडिया मध्ये विश्वगुरू भारताचे विश्वविद्यार्थी जे इराण सारख्या देशांत शिकतात त्यांना माघारी आणण्याचे विशेष ऑपरेशन विश्वगुरू बुमरेंगच २४x७ दाखविण्यात येईल ह्याची संपूर्ण खबरदारी घेतली गेली आहे.
४. ह्या युद्धांत कुवेत ने चुकून आपलीच (अमेरिकन) जेट्स पडली ह्यावर सखोल चर्चा घडवून भारताने फक्त एकाच राफेल पाडले आणि ह्यातून भारत कसा विश्वगुरू आहेत हे सिद्ध करण्याची संपूर्ण योजना IT Cell ने आखली आहे.
५. संघाने आणीबाणीच्या स्वरूपांत बैठक बोलावून स्वयंसेवकांना दंड फिरवून राष्ट्ररक्षण करण्यास सज्ज केले आहे.
६. टॅक्सी ताईनी इराणी चहा वर GST वाढविण्याचीही घोषणा केली आहे.
७. दुबई मध्ये ज्योतिषाचार्य मंडळींची परिषद भरली होती तिथे ते अडकून पडले आहेत नाहीतर त्यांची तातडीची बैठक बोलावून पुढील वाटचाल काय असावी ह्यावर कोबी त्यांचा सल्ला घेणार होते.
८. असंख्य क्षेपणास्त्रे पडून सुद्धा तेहेरान शहर मुंबई पेक्षा स्वच्छ का ह्याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे पथक बँकॉक मध्ये जाण्यास सज्ज.
९. इतक्या कचर्यात मानवी जीवन कसे राहू शकते ह्याचा अभ्यास करण्यासाठी इराणी नेत्यांचे पथक फरिदाबाद मध्ये दाखल पण कॉलरा झाल्याने ते एम्स मध्ये भरती झाले आहेत.

अमेरिकेतील तेल साठे आटू लागले आहेत का?
त्यासाठी काहितरी कुरापत काढून आणि कारण शोधून तेलाचे देश ताब्यात घेण्याची मोहिम आहे का? व्हेनेझुएला देश फुकटात मिळवला आणि कुणी काय बोलले नाही. अमेरिकेचा उत्साह वाढला आहे.
(हे केवळ तर्क आहेत.)

रामचंद्र's picture

1 Mar 2026 - 9:07 pm | रामचंद्र

आणि तेलाचे साठे असलेल्या कॅनडावरही ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Mar 2026 - 9:10 pm | अमरेंद्र बाहुबली

इराण ह्या देशाचे एक कळत नाही, सुन्नी देशानी घेरलेला शिया देश, वास्तविक त्याची नी इस्राईल ची मैत्री हवी. इस्रायल सारख्या आगीत कारण नसताना इराणने हात का पोळून घेतले?

पण खोमनी गेला हे खूप चांगलंच झालं. तिथल्या स्त्री्यांचं आयुष्य थेट नरक केल होतं. पण तो त्याच रणरागिणीकडून संपायला पाहिजे होता. असो!

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Mar 2026 - 10:43 pm | अमरेंद्र बाहुबली

खरं आहे.

अमरेंद्र बाहुबली,

इराणने शिया अवतार धारण केला तो उस्मानी ( ओटोमन ) साम्राज्याच्या विरोधात. ते साम्राज्य आज अस्तित्वात नाही. त्यामुळे शिया विरुद्ध सुन्नी हा संघर्ष राजकीय दृष्ट्या कालबाह्य झाला आहे. आज जो संघर्ष आहे तो भूराजकीय ( जियोपॉलिटिकल ) आहे.

इराण बाजूच्या अनेक प्रांतांवर वांशिक एकतेच्या आधारावर आपला हक्क सांगतो. त्यात बहारीन व कतार येतात. तसंच आजच्या इराकचा बराच मोठा भाग पूर्वी पर्शियन साम्राज्याचा भाग होता. त्यावरही इराण आपला अधिकार आहे असं मानतो. आपण जसं बांगलादेश व श्रीलंकेत परकीय हस्तक्षेप एका मर्यादेच्या बाहेर जाऊ देत नाही, तशाच धर्तीवर इराण शेजाऱ्यांच्या बाबतीत जागरूक आहे.

याच कारणास्तव अमेरिकी आक्रमणाच्या प्रत्युत्तरादाखल इराणने शेजारच्या देशांतल्या अमेरिकेच्या सैनिकी तळांवर आक्रमण केलं आहे. हे आक्रमण इराककडून व्हायची भीती अखाती देशांना वाटंत असे. ते शेवटी केलं इराणने.

आ.न.,
-गा.पै.

१. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचे समर्थन काय? [[ अणु शस्त्रे बनवली तर त्यांचा विरोध का? अमेरिकेनेही शस्त्रे बनवली आहेत.]]
२. भारताची भूमिका काय?
इराण, अमेरिका आणि इजरायल तिघांशीही व्यापारी करार भारताने केले आहेत, संबंध ठेवले आहेत. कुणाची बाजू घेणार?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणतात की भारताने धोरण स्पष्ट करावे, खोमेनीच्या मृत्यूचा निषेध व्यक्त करावा, इराणची बाजू घ्यावी. स्वतः अमेरिकेत जाऊन भारतविरोधी भाषणे ठोकताना ते अमेरिकेची बाजू घेतात का? किंवा अमेरिकेला मित्र समजतात का? खाडी देशांत जाऊन तिकडच्या लोकांना भेटतात का? त्यांचेही धोरण स्पष्ट नाही.

आग्या१९९०'s picture

2 Mar 2026 - 10:29 am | आग्या१९९०

भारतात परराष्ट्रीय धोरणे सत्ताधारी पक्ष ठरवत असतो, विरोधी पक्ष नाही

बरोबर. तीन वर्षांत विरोधी पक्ष सत्तेवर येणार आहे. त्यांनीही त्यांचे मत सांगावे. असेही नको तिथे भाषण ठोकतातच ना?

आता इंग्लंड फ्रान्स जर्मनी अमेरिकेच्या बाजूने आहेत. आमच्या जनतेची नवी पिढी इकडे सर्व देशांत आणि खाडी देशांतही नोकऱ्या करत आहेत. मग कोणाच्या विरुद्ध बोलणार?

आग्या१९९०'s picture

2 Mar 2026 - 2:43 pm | आग्या१९९०

बरोबर. तीन वर्षांत विरोधी पक्ष सत्तेवर येणार आहे. त्यांनीही त्यांचे मत सांगावे. असेही नको तिथे भाषण ठोकतातच ना?

काहीही!
सत्तेत नसताना मनरेगाला मूठमाती देणारी भाषा करणाऱ्यांनी सत्तेत आल्यावर काय केले ? ११ वर्ष झाली सत्तेत येऊन.
सध्याचे आपले सत्ताधारी युद्धखोर अमेरिकेला घाबरून आहेत. त्यासाठी राहुल गांधी सत्ताधाऱ्यांना स्पष्ट भूमिकेबद्दल प्रश्न विचारत आहेत. राहुल गांधीनी काय करावे ते सत्तेत आल्यावर विचारा,आज नव्हे. आज सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत करा. (आयटी सेलचे अनुकरण केलेच पाहिजे अशी सक्ती असेल तर करा )

विजुभाऊ's picture

2 Mar 2026 - 10:57 am | विजुभाऊ

राहूल गांधीच्या आज्जी ने इस्राईल ला पाकिस्तानी अणुभट्ट्ट्या नष्ट करण्यास मदत द्यायला नकार दिला.
अन्यथा पाक आज आहे इतकाही प्रभावी बनला नसता. त्यांची तेंव्हाच जिरली असती.
त्या उलट त्यानी नेहमीच पॅलेस्टाईनला सपोर्ट केला. यासर अराफतला सख्खा भाऊ असावा इतका सन्मान दिला.

पाषाणभेद's picture

2 Mar 2026 - 10:40 am | पाषाणभेद

वास्तविक पाहता भारत एक तटस्थ देश अशी भुमिका घेवून वडीलधार्‍याच्या नात्याने देशोदेशींच्या अनेक प्रसंगांत निर्णायक भुमिका बजावू शकला असता. पण आपले नेतृत्व केवळ जाहिराती करत बसले, खॅ खॅ खॅ करत बसले. परराष्ट्रीय धोरण साफ कोसळलेले आहे.

तरीदेखील कोणतेच युद्ध करणे हा पर्याय नाही. युद्ध नकोच.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Mar 2026 - 11:17 am | अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Mar 2026 - 11:20 am | अमरेंद्र बाहुबली

खामेनी मेल्याचे दुःख नाही, पण ज्या प्रकारे अमेरिकेने हल्ला केला तो नक्कीच निषेधार्ह आहे. चिन रशिया ह्यांनी इराणच्या बाजूने मैदानात उतरायला हवे! इराण हा काही अतिरेकी देश नाही, अमेरिकेची अशी दादागिरी जगणे खपवून घेऊ नये. तात्या युद्धखोर होत चालले आहेत, असे कसे नोबेल मिळेल तात्या?

पाषाणभेद's picture

2 Mar 2026 - 11:29 am | पाषाणभेद

तात्याला नोबेलची फिकीर नाही. त्याचा मुळ स्बभावच उद्दामपणाचा आहे. बरे अशांना सल्ले देणारे देखील जगाचे, परिस्थितीचे भान का राखत नसावेत?
जेत्यांना आणि पराजितांनाही युद्ध करणे सोपे नसते. त्याचे दुरगामी परिणाम सार्‍या जगाला भोगावे लागतात. अनेक कुटूंबियांची हानी होते ते निराळेच.

इराण हा काही अतिरेकी देश नाही

हमास, हुती , हिजबुल , शिया अमाल मिलेशिया हे सगळी इराणचीच पिलावळ आहे.

मदनबाण's picture

2 Mar 2026 - 3:12 pm | मदनबाण

इराण युद्ध:
इराणसाठी करो या मरो ही स्थिती असल्याने त्यांनी यावेळी वेगळी रणनीती आखलेली दिसत आहे. युएइ मधील हल्ल्या ने आज तिथले स्टॉक मार्केट बंद ठेवले गेले आहे. तिथल्या इमारतींवर ड्रोन हल्ले करुन एक सेफ टॅक्स फ्री हेवनच्या प्रतिमेला तडा देण्यात इराणला बर्‍यापैकी यश आलेले दिसत आहे.
इस्रायल
युएइ
सौदी अरेबिया
कतार
कुवेत
बहरिन
जॉर्डन
इराक
सायप्रस
ओमान
सिरीया
अश्या ११ देशांवर हल्ला करणारा इराण हा जगातला पहिलाच देश असावा. [ निदान मी जी माहिती वाचली त्यानुसार ]
विविध ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर वर हल्ले चढवण्याचा बहुधा इराणने निर्धार केलेला दिसतोय.
ताकः इराणच्या ड्रोन ने सौदी अरेबियाच्या अरामको च्या रास तनुरा तेल शुद्धीकरण प्लांट वर हल्ला केला त्यामुळे ५,५०,००० बॅरल प्रति दिन क्षमतेचा हा प्रकल्प बाधित झाला आहे व तेलाची किंमतीत १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समजत आहे.जगातील सगळ्यात जुन्या आणि सगळ्यात मोठ्या तेल शुद्धीकरण प्लांट पैकी हा एक आहे.

कोबी न्यूजः युजीसीचा विरोध तीव्र होत असुन देश भरात विवध ठिकाणी कोबींच्या विरोधात आंदोलने होताना दिसत आहेत,अनेक सभां मध्ये माजपाच्या नेत्यांना विरोध आहे.काही ठिकाणी कोबींचे फोटो,पुतळे जाळले गेले आहेत.कोणी उपोषणाला बसले आहेत तर कोणी कोबींचे पिंड दान करताना दिसुन आले आहे.युजीसी प्रकरण माजपाचा माज उतरवरणार असे दिसते.हल्लीच साक्षी महाराजांची ऑनलाईन व्यवस्थित ठासल्यावर ते लायनीत आलेले दिसले,तरी पुढील निवडणुकीत त्यांना हरवणार अश्या पोस्ट दिसुन आलेल्या आहेत.
कोबी सध्या तमिळनाडु मध्ये आहेत,बहुतेक येत्या काळात तिथे निवडणुका होणार आहेत... त्यामुळे भाषणबाजी,उद्घाटन आणि मुख्य म्हणजे फोटोबाजी + नौटंकी करताना दिसत आहेत.काल पर्यंत बुद्ध बुद्ध करत होते आता मंदिरात साष्टांग लोटांगण घालताना फोटोत दिसुन आले आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : J Balvin, Willy William - Mi Gente (Official Video)

यूजीसी मध्ये असे नक्की काय अन्यायकारक आहे वाचायला आवडेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Mar 2026 - 5:04 pm | अमरेंद्र बाहुबली

वर्चस्वाला धक्का!

काही मोदी समर्थकांचा टर्निंग पॉईंट हा युजिसी होता हे नोटवर्दी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2026 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

रात्रीचे चांदणे's picture

3 Mar 2026 - 10:18 am | रात्रीचे चांदणे

भारता बद्द्लची खामेनीची गेल्या काही वर्षाची भुमीका पाहता भारताने त्याच्या मुर्त्यूचा निषेध केला नसावा. त्यात एकीकडे इस्राएल सारखा देश म्हणजे कठीण प्रसंगात आपल्या पाठीशी असणारा.
खेमेनीने काही गरज नसताना तीन चार वेळा आपल्या विरोधात टीका केलेली. तसा आपण निषेध केला कांय किंवा नाही कांय काही फरक पडत नाही पण काही भारतीय मात्र नक्कीच दुःखी झालेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Mar 2026 - 12:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे. ईस्लाम धर्म भारतात अनेकांच्या नावडीचा असला तरी त्या धर्माचे धर्मगुरु आणी देशप्रमुख म्हणुन मान देणे गरजेचे होते.विकिपीडियानुसार भारत-ईराण संबंध २००५ पासुनच बिघड्ण्यास सुरुवात झाली होती. तेव्हाही अमेरिका/ईस्रायलने भारताला सध्यासारखाच दम भरला असावा. त्यानंतर भारत-ईराण संबंध ठीक म्हणावेत असेच होते. दोन देशांतली आयात-निर्यातही हळुहळु कमी होत जाताना दिसते.
२०१४ सालापासुन सध्याच्या सरकारने संबंध चांगले व्हावेत म्हणुन प्रयत्न केलेले दिसतात. खालच्या व्हिडियोत पंतप्रधान मोदी, ईराणकडुन अधिकाधिक तेल आयात करु असे जाहीर करतात. हे २०१६ सालचे आहे. त्यानंतर २०१७ साली अध्यक्ष हसन रौहानी ह्यांचा भारत दौरा.मग त्यानंतर खेमेनी ह्यांचा भारत दौरा.
फक्त कश्मीर प्रश्नावर ईराणचे मत आवडले नाही म्हणुन भारत-ईराण संबंध बिघडतील असे वाटत नाही कारण ईराण भारताला तुलनेने स्वस्तात ईंधन देत होता. भारतातर्फे अर्थात वेगळ्या वस्तु निर्यात केल्या गेल्या असणार.
करोना काळातही संबंध चांगले दिसतात. निदान बिघडलेले वाटत नाहीत.
मग असे अचानक काय झाले?
India supplies medical assistance to Iran as part of our ongoing humanitarian assistance
Iran has received a shipment of 150,000 doses of an Indian Covid-19 vaccine, Covaxin, local media reported Thursday, as the Islamic republic combats the Middle East's deadliest outbreak of the illness

https://timesofindia.indiatimes.com/world/middle-east/iran-says-received...

https://www.mea.gov.in/press-releases.htm?dtl/34862/India_supplies_medic...

https://www.youtube.com/watch?v=-RPoekx3fn0
https://www.youtube.com/watch?v=C1Dgt9ewZQU

लहान पोरांचा हात पिरगाळून मोठी पोरं त्याच्याकडच्या गोट्या, भोवरे काढून घेतात तसे अमेरिकेने व्हेनेझुएलाचे केले. आता इराणच्या नेत्यांच्या गोट्या काढणे सोपे नाही. मारामारी करून तेलावर कब्जा करणार.

रात्रीचे चांदणे's picture

3 Mar 2026 - 2:04 pm | रात्रीचे चांदणे

आपले इराण सोबतचे संबंध बिघडले म्हणू शकत नाही. पाकिस्तानचा शेजारी म्हणून आपल्याला त्यांची गरज आहेच. उदया खेमेनीच्या जागी दुसरं कोणतही सरकार आलं तरी आपल्याला जुळवून घावेच लागेल.
खरी अडचण आहे ती म्हणजे अमेरिकेची. आपल्याला अमेरिके पासून फार कांय लांब जाता येत नाही. एका मर्यादेनंतर अमेरिकेचा दबाव झुगाराणे अजून तरी शक्य नाही.
जो पर्यंत अमेरिका आणि इराण चे संबंध सुधारत नाही तो पर्यंत भारत इराण संबंध एका मर्यादेतच राहतील.