नवीन पुस्तके
छत्तीसगड नियोगींचे आंदोलन आणि सद्यस्थिती
अन्वय
वंशवृक्ष
वार्यावरती वरात
कुहू
नवीन पुस्तक परीक्षणे
जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट )
http://www.chandamama.com/archive/storyArchive.htm
जुने चांदोबा वाचा जुन्या काळात रमा
१९५२ पासून ते २००६ पर्यंतचे सर्व जुने चांदोबा मराठीतून येथे वाचता येतील.
जुन्या चांदोबांची थेट लिंक : http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm
धूमकेतू, कांशाचा किल्ला, तीन मांत्रिक, अग्निद्विप, भल्लूक मांत्रिक, इ...तसेच विक्रम - वेताळाच्या आणि इतर सर्व कथा आणि सर्व चांदोबा जसाच्या तसा वाचा :)
संस्कृतीविषयी निर्भीडपणे केलेले विश्लेषण
![]() |
समाजमनाचा आढावा
एके काळचे 'लोकसत्ता' या दैनिकाचे संपादक असलेले अरुण टिकेकर यांनी वेळोवेळी लिहिलेले सात दीर्घ लेख सारांश या त्यांच्या पुस्तकात समावेश केल्या आहेत. अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी आपल्याला लेखकाच्या वैचारिक समृद्धीची कल्पना येईल. नेतृत्वाचे प्रशिक्षण, इतिहासाचे ओझे, साहित्याचे समाजशास्त्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे राजकारण, संस्कृतीचा अपकर्ष, जीवनशैलीचा अभाव व समाजमनाचे अस्वास्थ्य हे लेख या पुस्तकात असून आपला समाज कुठल्या दिशेकडे भरकटत आहे याची पूर्ण कल्पना लेख वाचताना येऊ लागते. प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक समस्यावर लेखकाचा तोडगा आहे असा अभिनिवेश नाही.
सरदार पटेल: स्फूर्ती देणारे व्यक्तिमत्व
सार्वजनिक जीवनाचे अध:पतन होत असलेल्या या काळात मागच्या पिढीतील नि:स्वार्थीपणे कार्य केलेल्यांची सतत आठवण येत असते. कारण ज्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी अशा व्यक्तिमत्वांची उणीव भासत आहे. म्हणूनच आपण इतिहासातल्या पानांत अशा निस्पृह व्यक्तींच्या शोधात असतो. अशा काही स्फूर्तीदायक व्यक्तींच्यापैकी सरदार पटेल यांचे नाव समोर येते. गांधी - नेहरूबरोबर काम केलेले पटेल यांनी आधुनिक व अखंड भारताचा पाया घातला. परंतु धर्मवाद व जातीयवादाची टोकाची भूमिका घेणार्या काही हितसंबंधींना थोर व्यक्तींच्या चारित्र्यहननात आसुरी आनंद मिळत असतो.
गांधी - विनोबांच्या विचारांची गडद छाया
अन्वय हे पुस्तक लेखक सु.श्री पांढरीपांडे यांनी वेळोवेळी लिहिलेल्या काही निवडक लेखांचा संग्रह आहे. यातील बहुतेक लेखावर गांधी व विनोबा यांच्या विचारांची गडद छाया पसरलेली आढळते. या संग्रहातील पहिल्या तीन लेखात भांडवली व्यवस्था, साम्यवाद, लोकशाही, विज्ञान - तंत्रज्ञान, विकास इत्यादींचा सामाजिक परिस्थितीवर होणार्या परिणामांचे विश्लेषण आहे. पुढील दोन लेख गांधी, टागोर व मानवेंद्र रॉय यांच्या वैचारिकतेविषयी आहेत. गांधी व विनोबांचे तत्वज्ञानच आजच्या संकटमय परिस्थितीत आपले मार्गदर्शन करू शकते, असा दृढविश्वास लेखक शेवटच्या चार लेखातून व्यक्त करतात.
शंकर गुहा नियोगींच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन
साठ- सत्तरच्या भारावलेल्या काळात शंकर गुहा नियोगींचे नाव आपण नेहमी ऐकत होतो. डाव्या चळवळीच्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांचा हा हिरो एकाएकी भांडवलदारांच्या खुनशीपणाचा बळी झाला. ही बातमी वाचल्यानंतर मनं सुन्न झाली. परंतु अशा प्रकारच्या लढ्यांचा व लढावूपणाचा शेवट असाच होणार हे गृहितच धरले होते. पुस्तकाचे शीर्षक, छत्तीसगड नियोगींचे आंदोलन आणि सद्यस्थिती, वाचून पुस्तक हातात घेत असताना या आठवणीं उफाळून आल्या. रंगनाथ पठारे स्वत: तेथे जावून लेखनाची जमवाजमव केली हे प्रस्तावनेत वाचल्यानंतर खरच काही तरी वैचारिक खाद्य मिळेल याची खात्री पटली व लेखकांनेसुद्धा निराश केले नाही, हे विशेष.
नवीन चर्चा
एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग -८
भाग-७ दुसर्या पानावर जायला आला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.
अभिनव प्रश्नमंजुषा...... गुणवंत वाचकाचा शोध आणि सन्मान करण्याकरता!!
वाचक मित्र-मैत्रीणींनो,
गुणवंत वाचकांचा शोध आणि सन्मान करण्यासाठी ‘वाचू आनंदे’ ह्या ठाण्यातील घरपोच वाचनालयातर्फे दशकपूर्तीनिमित्त एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठी साहित्यावर आधारित एक अभिनव प्रश्नमंजुषा घेण्यात येणार आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......
आणि नक्की सहभागी व्हा!!!
http://ireadindia.com:8080/apex/f?p=100:1700:4411641986691358::NO
एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ७
भाग ६ दुसर्या पानावर जायला आला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.
पत्ता मिळू शकेल का?
मित्रांनो,
निशिगंधा प्रकाशन,पुणे ह्या प्रकाशकांचा अद्ययावत पत्ता मिळू शकेल
काय? हे प्रकाशन गुजर यांचे!
पहीला पत्ता-सिंहगद रोड
दूसरा पत्ता-कोथरुड
तीसरा पत्ता-मुकुंद नगर
अद्ययावत-????
तसेच ह्या पत्यांसंबंधी काही लिंक आहे का,आंतरजालावर?
क्रुपया कळवा.
-देवेन्द्र प्रभुणॅ,यवतमाळ.
प्रश्नमंजुषा-३ विजेते सागर अभिनंदन----
मित्रांनो,
विलंबासाठी क्षमस्व!
उत्तरे गुरुवार रात्री पर्यंत पाठवावीत.
---चला फार आनंद झाला.
अतिशय उत्तम व दर्जेदार प्रतिसाद आहेत.
पण,
HATS OF TO SAAGAR(छे,ज्ञानसागर!)
व मणिकर्णिका ताई__--!
सागर्-परीपुर्ण १०,लगे रहो,भाई!
ताई-उत्क्रुष्ट -७
चित्राताई-५,वल्ली-४,मेघनाताई-३.५
१.समुद्काठची रात्र हा कोणत्या प्रसिद्ध कवीचा कथासंग्रह आहे?(किंवा समुद्रकिनार्या वरची रात्र)
बा.भ्.बोरकर
२."लाट" हे कोणत्या दिवंगत आधुनीक विचारवंताचे ललित लेखन आहे?
हमीद दलवाई(मित्रा सागर्,जबरदस्त् उत्तर दिले तु!)
३.काशीनाथ घाणेकरांची दोन चरित्रे कोणती?
नाथ हा माझा व ----आणि डा.काशिनाथ घाणेकर
का वाचता येत नाही?
आपण काय वाचतो, का वाचतो, किती-कसे-कुठे वाचतो? ......... याविषयी आपण नेहमीच सांगतो - बोलतो -लिहितो. पण काही वेळा विपरित असतात आणि आपल्याला 'वाचणे' जमत नाही. किंवा ज्यांना जमत नाही अशी माणसं आपल्या भवताली दिसतात कधीमधी. हे अनुभव आपण इथे शेअर करूया का? नकारात्मक अनुभव सांगायला एक खास मोकळेपणा असावा लागतो आणि धाडसही! हे माहीत आहे. तरी हा प्रश्न विचारते आहे.
