लिहावे नेटके

भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली (२०१०)
किंमत
400.00
पृष्ठसंख्या
600

भाषा हा केवळ कथा-कादंबर्‍या-कविता लिहिणार्‍यांसाठी राखून ठेवलेला प्रांत नव्हे. प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रात, आपापल्या व्यवसायात भाषेचा वापर नेटकेपणे करता यावा लागतो, योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिताही यावे लागते. भाषा मुळातच कच्ची राहिली, तर कोणताही विषय समजणे कठीण होऊन बसते; इतर भाषा शिकतानाही खूप अडचणी येतात. म्हणून लेखन सुधारण्यासाठी मुलांना उपयोग व्हावा आणि त्यांना मदत करणे मोठ्यांना सोपे व्हावे, अशा उद्देशाने हा पुस्तकांचा संच तयार केला आहे.

भारतीय पक्षी

भाषा
मराठी
आवृत्ती
तिसरी आवृत्ती
किंमत
32.00
पृष्ठसंख्या
104

डॉ. सलिम अली व सहलेखिका लईक फतेहअली या दोन पक्षीप्रेमींची मौल्यवान भेट. भारतातील पक्ष्यांची माहिती मिळवण्यासाठी परकीय लेखकांच्याच्या पुस्तकांवर अवलंबून रहाण्यापेक्षा आपल्या भारतीयाचे हे पुस्तक खूप नवी आणि एकत्रित माहिती देते.
रा. वि. सोवनी यांनी पुस्तकाचा अनुवाद उत्तम केला आहे. केवळ हिंदीच नव्हे तर मोठ्या परिश्रमाने मराठी नावे शोधून तीही दिली आहेत. प्रत्येक पक्षाचे चित्र, त्याच्या सवयी, विणीच्या हंगामातील बदल, आवाज, घरटे याबद्द्ल नीट माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच आहे