By Bhakti, 21 February, 2026

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी

1

युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो. म्हणूनच तो आता केवळ इतिहासतज्ज्ञ नाही, तर एक ‘विचारवंत’ म्हणूनही ओळखला जात आहे.

By राजेंद्र मेहेंदळे, 21 February, 2026

कालच एक जुना मित्र बरेच दिवसांनी भेटला होता आणि बोलण्याच्या ओघात गप्पा खाडीवर पोहण्याकडे वळल्या. आणि झरकन सगळ्या आठवणी एक एक करून डोळ्यापुढे नाचू लागल्या.

By विजुभाऊ, 20 February, 2026

सकाळपासून वर्गातली सगळीच शांत आहेत. तो नेहमी फरफर्‍या स्टोव्ह सारखा येणारा मुलांच्या बडबडीचा आवाज ही कमी येतोय
शाळेत सतत काही ना काही तरी व्हायला हवे. रोज नुसते अभ्यास ,लहान सुट्टी, मधली सुट्टी , खेळाचे तास असे करत बसलो की कंटाळा येतो. प्रत्येक तासाला काही ना काही शिकवत असतातच पण तरीही.
कितीही आवडत असली तरी बटाट्याची काचर्‍याची भाजी रोज खाऊन कंटाळाच येणार की. सोबत लोणचे , कारळ्याची नाही तर लसुण खोबर्‍याची चटणी तरी हवीच.

By सोत्रि, 20 February, 2026

माउंट किनाबालू, ईस्ट मलेशिया ह्या बेटावरील (बोर्निओ आयलंड) साबा ह्या राज्यातला, मलेशियातील आणि साऊथ ईस्ट आशियातील सर्वात उंच पर्वत आहे. आणि, जगातील बेटांवर असलेल्या पर्वतांमध्ये जगात तिसऱ्या नंबरचा उंच पर्वत; ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 4095 मीटर आहे. गिर्यारोहकांमध्ये चढाई करण्यासाठीचं एक मानाचं नाव आहे माउंट किनाबालू (स्थानिक भाषेत गुनुंग किनाबालू) .

By बाजीगर, 20 February, 2026

भिवंडी ची दवंडी

भाजपा ने धरला
काँग्रेस चा हाथ !!
राष्ट्रवादी(शप) ची
घेतली साथ ||

भाजपात फूट,
9 जणांची लूट ||

नारायण चौधरी
भाजपा बंडखोर,
होणार आता,
भिवंडी महापौर !!

सत्तेसाठी ताताथैया
विरोधक आता एकशैय्या ||

--------------------------

भिवंडी बलाबल
एकूण ९०
बहुमत पाहिजे ४६

combo-1 :
भाजप 22
शिवसेना 12
राष्ट्रवादी (SP) 12
= 46

combo-2:
भाजप 22
शिवसेना 12
समाजवादी 6 ,
कोणार्क विकास आघाडी 4
भिवंडी विकास आघाडी 3
= 47

पण झाले combo -3

By मार्गी, 19 February, 2026

✪ उत्तराखंडमधल्या दुर्गम वाटेवरचा जीप प्रवास
✪ गोरी गंगेच्या तीरावर!
✪ जौलजिबी परिसरातल्या मदतकार्याच्या आठ्वणी
✪ मुन्सियारी- एक विलक्षण गाव
✪ नंदा देवी मंदिराचा ट्रेक
✪ पंचाचुली शिखरांच्या मागे होणारा चंद्रोदय!

By बिपीन सुरेश सांगळे, 19 February, 2026

अंडा घोटाला-बालकथा
---------------------------------------------------------
रविवार सकाळची वेळ. अनया आणि अनिलला जाम भूक लागली होती. ते आईच्या मागे लागलेच होते ,तोच आईला एक फोन आला. वरच्या आजींना बरं वाटेनासं झालं होतं. आई गडबडीने त्यांच्या घरी गेली.
आता काय करायचं ? बाबाही मित्राकडे गेलेले.
अनिल मोठा होता. तो म्हणाला , ' अने, घाबरू नकोस. मी आहे ना. मी अंड्याचं ऑम्लेट करतो.एकदम खुसखुशीत !’
‘ऑम्लेट अन खुसखुशीत ? ओके ! ते खुसखुशीत ऑम्लेट तूच खा हं. मला आपलं साधंच दे,’ तीही बोलायला भारीच होती.

By गवि, 18 February, 2026

आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली.