By युयुत्सु, 17 January, 2026

[ताज्या जिलब्या] आचरटपणा
===============

-- राजीव उपाध्ये

टीप - आजच्या जिलब्यांचा नैवेद्य श्री० चंद्रसूर्यकुमार यांना समर्पित करण्यात येत आहे.

मानवी इतिहास अनेक अंगांनी अनेकांनी लिहिला आहे. पण आचरटपणाच्या अंगाने लिहीला गेला नसावा असा माझा अंदाज आहे. आचरटपणा म्हणजे अतार्किक गोष्टींवर ठाम विश्वास, योग्य काय अयोग्य काय याच्या मनमानी कल्पना इ०

By गवि, 16 January, 2026

**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा : एक प्राचीन-आधुनिक-वैज्ञानिक पाककृती**

---
कालच घरच्या मागच्या अगण्णात मुंग्यांची रांगा दिसली आणि मन भूतकाळात गेल. माझ्या लहानपणी आमच्या गावी लाल मुंग्यांची दिसत असत. आमची आत्या त्या मुंग्यांची चविष्ट चटणी बनवत असे. मी विचार केला की आपण मानवजातीच्या विकासासाठी भविष्यकालात इतर ग्रहांवर देखिल खाता येऊ असा मुरंबा का बनवू नये. मग झटपट कामाला सुरुवात केली.

---

आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत दुर्लक्षित पण भविष्यातील दृष्टीने महत्त्वाची पाककृती —
**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा**.

By बाजीगर, 16 January, 2026

हिंदू मराठी महापौर

हिरवा उद्ध्वस्त ठेचला,
स्तब्ध नकलाकार कुंचला,
नानांनी असा विजय खेचला,
बोलल्याप्रमाणे ||

आता विरोधी बाकडा,
काय करेल तो वाकडा,
पाय ओढणारा खेकडा,
खोलल्याप्रमाणे ||

आधी ते EVM खोटे,
आता शाई पुसती बोटे,
किती बहाणे होते,
सोलल्याप्रमाणे ||

ठेचूनी देशी पाकडा,
भाजप बहुमत आकडा,
विरोधी पडला तोकडा
तोलल्याप्रमाणे ||

By कपिलमुनी, 16 January, 2026

२.१

२.२

२.३

ज्याचा पगार ७००० आहे.त्याला एकरकमी २ लाख म्हणजे मोठी रक्कम होती.
बुलेटची डुग डुग कानात ऐकू यायला लागली होती.

२.४

By युयुत्सु, 16 January, 2026

धर्मपालन आणी कायद्याचे पालन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत होऊ शकते आणि महत्त्व कशाला द्यायचे याबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. याचा निर्णय करताना ए०आय० ने जितकी स्पष्टता दाखवली आहे, तितकी मानवी विद्वान दाखवतील का ही मला शंका आहे. माझ्यामते कायद्याचे पालन धर्माचरणापेक्षा श्रेष्ठ आहे, ते अधिकार देते, तसेच संरक्षण देते.

- राजीव उपाध्ये

विविध राष्ट्रांच्या संविधानांतील अपेक्षा आणि धर्मांतील अपेक्षा

लेखक - चॅटजीपीटी

प्रस्तावना

By चांदणे संदीप, 14 January, 2026

पोटाची खळगी भरणे कारणी
स्वार्थें, वैऱ्याची हो मनधरणी

हसणे होईल पातक घोर
भवती मूर्खांचा वाढेल जोर

सत्य नित्य नको ओठी
वाचेत मुग्धतेची पराकोटी

आणि...

मती निकामी होय तेधवा
म्हणावे, नरो वा कुंजरो वा

- संदीप भानुदास चांदणे

By कपिलमुनी, 12 January, 2026

२.१

२.२

"मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले.

२.३

By हेमंतकुमार, 12 January, 2026

‘डीएनए’ हे आपल्या पेशीच्या केंद्रकातील एक ऍसिड. ते आपल्या आनुवंशिकतेचा मूलाधार असते. त्यादृष्टीने त्याचा सखोल अभ्यास अनेक वर्षांपासून होत होता. त्याच्या रचनेच्या संशोधनाबद्दलचा नोबेल पुरस्कार 1962मध्ये दिला गेला हे बहुतेकांना माहीत असते. परंतु या शोधाची पाळेमुळे पार इ. स.. 1869मध्ये जाऊन पोचतात. तेव्हा Friedrich Miescher या स्वीस जीवरसायनशास्त्रज्ञाने पहिल्यांदा अशा एका रेणूची संकल्पना मांडली आणि त्याला nuclein हे नाव दिले होते. पुढे 1953मध्ये जेम्स वॅटसन यांच्या चमूने त्याची दुहेरी दंडसर्पिलाकार (helical) रचना शोधून काढली.

By हणमंतअण्णा शंक…, 12 January, 2026

हा चित्रपट मी खूपदा पाहिला आहे. खूप मेडिटेटिव असा हा चित्रपट आहे. अगदी जादू केल्यासारखा धरून ठेवतो.

x

विनोदकुमार शुक्ल गेले.

हा चित्रपट आणि विनोदकुमार शुक्ल यांच्यातला एक दुवा जुळून आला.

त्यांच्यावर केलेली "चार फुल हैं और दुनिया है" ही डाक्यूमेंट्री मागच्या वर्षी मुबईवर पहिली होती. ती आता यूट्यूब वरती आहे.