By हणमंतअण्णा शंक…, 28 January, 2026

इंग्रजी आणि युरोपियन भाषांमधे लेखन करण्यात ए. आय. पटाईत आहे. (विवेकी आहे का ते अजून माहित नाही पण पटाईत मात्र आहे, अजिबात विवेक नसलेले पटाईत लेखक माणसांत देखील असतात त्यामुळे ए. आय. तर आपल्याच डेटावरचा पोपट आहे), मात्र भारतीय भाषांमधे लेखन करताना खूपदा ए. आय. बेसिक चुका करतो. आताशा त्या चुका बर्‍याच कमी झाल्या असल्या आणि उत्तरोत्तर या चुका कमीच होत जाऊन अनकॅनी असे लेखन तो करेल. तोवर आपण काही आडाखे बांधून असे लेखन पटकन ओळखू शकतो.

By युयुत्सु, 28 January, 2026


ए०आय० - एक नवे देवत्व!
============================

- राजीव उपाध्ये

टीप - एक घोषणा करणे आवश्यक आहे - कदाचित हा लेख ए०आय० ला एक प्रॉम्प्ट देऊन लिहीला आहे, असे किरकिर करणार्‍यांना वाटू शकते. पण हे ए०आय० बरोबर केलेल्या **दीर्घ** विचारमंथनाचे संकलन आहे. त्यामुळे त्यावर माझे संस्कार झालेले आहेत.

By Avinash Anushe, 25 January, 2026

पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुण्याच्या आसपासच्या निसर्गरम्य परिसरात झालेला रस्त्यांचा बदल आणि सायकलिंगसाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती प्रकर्षाने जाणवली. डोंगररांगा, हिरवीगार दऱ्या, तलाव आणि वळणावळणाचे रस्ते यांच्या सान्निध्यात सायकल चालवण्याचा अनुभव खऱ्या अर्थाने वेगळाच असतो.

कधीकाळी पुण्याच्या आसपास सायकलिंग करताना मनात नेहमी एक विचार यायचा या सुंदर परिसरात जर दर्जेदार रस्ते आणि सायकलिंगसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या, तर पुणेकरांना किती अप्रतिम अनुभव घेता येईल! आज त्या कल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत.

By खटपट्या, 25 January, 2026

बंगलादेशा ने भारतात सुरक्षेच्या कारणास्तव सामने खेळण्यास नकार दिला म्हणून आता त्यांचा T20 विश्वचषकातला सहभाग जवळजवळ संपुष्टात आला आहे,

मुळात बांगलादेशाने भारतात ते सुरक्षित नाही असे म्हणणे म्हणजे एखाद्या वारांगनेने माझे शील तुमच्या घरी आले तर धोक्यात येऊ शकते असे म्हणण्यासारखे आहे,
बांगलादेश स्वतःला स्वप्नात अमेरिका, किंवा कॅनडा समजतो की काय?

By गोरगावलेकर, 24 January, 2026

वरळीच्या या ठिकाणांना पूर्वी अनेकदा भेट दिली असली तरी परत एकदा जावेसे वाटत होते .
भूमिगत मेट्रोने पहिला प्रवास हे ही मनात होते . या मेट्रोस मुंबई मेट्रो लाईन ३  किंवा अ‍ॅक्वा लाईन म्हणून ओळखले जाते . सरकत्या जिन्याने उतरून छशिमट मेट्रो स्थानकात आलो . खिडकीवर सायन्स सेन्टर स्टेशनचे तिकीट काढले . तिकीट रु . ३ ० /- मात्र . स्टेशन अगदी चकाचक . फलाटावर जाण्याचा मार्ग आणि फलाटावर आज शुकशुकाट .

By बाजीगर, 24 January, 2026

आधी रापचीक,
आता लवचिक,
सत्ते साठी विक,
पक्ष निष्ठा ||

आधी ताताथय्या,
काढ एकमेक मैया,
आता एक शय्या,
विरोधकांशी ||

सर्व पक्षांची भेळ,
ना कुणाचा मेळ,
आकड्यांचा खेळ,
खुर्ची साठी ||

पक्षफुटी ची भीती,
अनीती हीच रीती,
समर्थन शब्द किती,
बुडबुडे ||

By रांचो, 23 January, 2026

खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती.
ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे.
इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता.

वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती.

By युयुत्सु, 23 January, 2026

निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा?

-राजीव उपाध्ये

भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत काही संकल्पना इतक्या तेजस्वी वाटतात की त्या ऐकतानाच मन आपोआप नम्र होतं.