भाषा
मराठी
आवृत्ती
१
किंमत
300.00
पृष्ठसंख्या
384

स्त्रोत : मेहता पब्लिशिंग हाऊस.कॉम

पुस्तकातील निवडक भाग:

""गी, मी लक्ष्मी मित्तल बोलतो आहे. मी केवळ औपचारिकपणे तुझ्या कानावर घालण्यासाठी हा फोन केला आहे, की उद्या मित्तल स्टील तुझ्या भागधारकांच्यासमोर आर्सेलरच्या शेअर्ससाठी थेट प्रस्ताव मांडणार आहे.'' -लक्ष्मी मित्तल ""खरं सांगू का, मी त्या भारतीय माणसाच्या एकदम विरोधात होतो,'' तो म्हणाला. ""ही आमची कंपनी आहे त्या भारतीयाला ती घेण्याचा काहीच हक्क नाही; पण एक सांगू, आता वाटतं, त्या भानगड्या रशियन माणसापेक्षा भारतीय माणसाशी झालेला स्वच्छ व्यवहार मी केव्हाही मान्य करीन...'' -लक्सेम्बर्गचा टॅक्सी ड्रायव्हर ""भारतीय वंशाचा एक उद्योजक जगातील पहिल्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक झाला आहे, याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे...'' -अर्थमंत्री पी. सी. चिदंबरम "एक वर्षापूर्वी फ्रान्समध्ये तू आंगतुक होतास; पण आता परिस्थिती बदलेली आहे,' असं म्हणत जॅक शिराकने हसून मित्तलशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाला "आता फ्रान्समध्ये सर्वत्र तुझं स्वागतच केलं जात आहे.' -फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक "ही तर एकप्रकारची लढाईच आहे,' जॉन कास्टेगन्रोने जाहीर केलं. "आपण आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपय|त लढलं पाहिजे.' मित्तलचा प्रस्ताव आर्सेलरच्या संचालकमंडळाने एकमुखाने फेटाळून लावला.