Submitted by नितिन थत्ते on
सागर

छान ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद नितिन
हे पुस्तक वाचायचे आहे म्हणून जोडले आहे. नक्की वाचेन आता हे पुस्तक.
मुळात जॉर्ज ऑरवेल या प्राण्याबद्दल काहीच माहिती नव्हते, त्यामुळे पुस्तकाबद्दलही ऐकले नव्हते.
एका वेगळ्या विचारधारेची ओळख या पुस्तकाच्या निमित्ताने होईल असे वाटते आहे :)

Thu, 09/09/2010 - 18:33 Permalink
ऋषिकेश

आता वेळ काढून परिक्षण वाचले.. एक वेगळेच पुस्तक असणार याची खात्री पटली. पुस्तकाबद्दल ऐकुन होतोच.. आता नक्की वाचेन
छान विस्तृत परिचयाबद्दल आभार

Wed, 15/09/2010 - 09:48 Permalink
आनंदयात्री

खत्तरनाक्क आहे बाबा !!
सामाजिक वर्णन करणारी विज्ञानकथाच जणु.

Wed, 15/09/2010 - 11:12 Permalink
सागर

In reply to by प्रभाकर नानावटी

दुव्याबद्दल धन्यवाद प्रभाकर

इंग्रजीतून वाचेनच हे पुस्तक मी. पण मराठीतून देखील जास्त आवडेल
पुढेमागे कधी याची मराठी प्रत मिळाली तर नक्की घेणार आहे मी.
माझ्या यादीत हे पुस्तक नोंद करुन ठेवले आहे :)

धन्यवाद

Fri, 17/09/2010 - 12:49 Permalink
टण्या

१९८४ आता प्रताधिकारातून मुक्त आहे. खरे तर ऑरवेलची सर्व पुस्तके व निबंध आता खुले उपलब्ध आहेत. मराठीत माहिती नाही ह्या पुस्तकाच्या उपलब्धतेबद्दल पण इंग्रजीत १९८४ हे आजही प्रचंड खपणारे पुस्तक आहे. माझ्याकडे मुखपृष्ठावर पिकासोचे क्युबिस्ट स्टाइलमधले एक चित्र असलेली प्रत होती. दुर्दैवाने माझी एक मैत्रिण ते पुस्तक घेउन गेली आणि आता ती कुठे आहे हेच माहिती नाही. माझ्या हरवलेल्या/पळवलेल्या पुस्तकांपैकी सगळ्यात क्लेष देणारे हेच पुस्तक.

Thu, 16/09/2010 - 05:22 Permalink

एकूण पार्श्वभूमी वाचल्यावर कथानकाकडे वळूया......

असेच एकदा योगायोगाने त्याची गाठ एका मुलीशी पडते. ही मुलगी अ‍ॅण्टी सेक्स लीगची कार्यकर्ती असते. अ‍ॅण्टी सेक्स लीग ही पौगंडावस्थेतील मुलांची संघटना असते. लैंगिक व्यवहार हे राष्ट्रासाठी (पक्षी=पार्टीला कार्यकर्ते मिळावेत म्हणून) करायचे असतात त्याखेरीजच्या लैंगिक व्यवहारांचा निषेध करण्याचे काम ही संघटना करीत असते. त्या मुलीच्यामार्फत तो ओब्रायन नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात येतो.

हा ओब्रायन ब्रदरहूड नावाच्या भूमिगत संघटनेचा सदस्य असतो. ही संघटना बिग ब्रदरची आणि पार्टीची सत्ता उलथून टाकण्यासाठी कार्यरत असते. अशी संघटना अस्तित्वात आहे आणि गोल्डस्टाईन नावाची व्यक्ती तिचे नेतृत्व करते ही माहीती स्मिथला कुजबुज म्हणून माहिती असते. पार्टीच्या वर्तुळात या संघटनेच्या कुकर्मांची चर्चा होत असते. अनेकदा स्मिथला वाटत असते की अशी काही संघटना अस्तित्वात नाही आणि ती मिनिस्ट्री ऑफ ट्रुथचीच काल्पनिक निर्मिती आहे. पण ओब्रायनला भेटल्यावर अशी संघटना आहे अशी त्याची खात्री पटते.

ओब्रायन स्मिथला गोल्डस्टाईनने लिहिलेले एक पुस्तक - प्रिन्सिपल्स & प्रॅक्टिस ऑफ कलेक्टिव्ह ऑलिगार्किझम- वाचायला देतो. पार्टी कशाप्रकारे सर्व लोकांना कंट्रोल करून राज्य करते त्याची तत्त्वे त्या पुस्तकात लिहिलेली असतात. पार्टीच्या "फ्रीडम इज स्लेव्हरी", "इग्नरन्स इज स्ट्रेन्ग्थ" आणि "वॉर इज पीस" या घोषणांमागची विचार प्रेरणा काय याचे स्पष्टीकरण त्यात असते.

त्या पुस्तकातील एका प्रकरणाची थोडक्यात ओळख
----------------------------------------------------------------------
वॉर ईज पीस

औद्योगिक क्रांतीच्या काळात यंत्रांचा शोध लागल्यापासूनच मानवी कष्ट, हालअपेष्टा यांपासून मुक्ती मिळण्याची स्वप्ने समाजातल्या विचारवंतांना पडू लागली. जसजसे उत्पादन वाढू लागले तसतसे सर्व जनतेला कष्टरहित आणि वस्तूंची मुबलक उपलब्धता असलेले जीवन देणे शक्य असल्याची जाणीव त्यांना झाली. काही दशकातच असा समाज निर्माण होईल की ज्यात लोक कमी तास काम करतील, त्यांना मुबलक प्रमाणात सर्व उपभोग्य वस्तू उपलब्ध होतील आणि त्यांना कलांचा आणि जीवनाचा पुरेपूर आस्वाद घेणे शक्य होईल अशी चित्रे रंगवली जाऊ लागली.
परंतु असा समाज निर्माण होणे हे मुळातूनच धोकादायक असल्याचे समाजव्यवहाराचे नियंत्रण करणार्‍या लोकांना जाणवू लागले. ज्या समाजात सर्व लोक भरभराटीचे आयुष्य जगतात आणि सर्वांना सर्व सुखसोयी सहज उपलब्ध असतात अशा समाजात उतरंडीची उघड चिह्ने शिल्लक रहात नाहीत. [माझी टिपण्णी: एखाद्या कंपनीत सर्वांना ओपन क्यूबिकल/शेअर्ड क्युबिकल असेल आणि त्यातल्या एखाद्याला बंद केबिन असेल तर त्या बंद केबिनवाल्याला मिळणार्‍या छोट्याश्या सोयीचे मोल जास्त असते आणि तो त्यात खूष राहून अधिक आउटपुट देतो].

अशा भरपूर मोकळा वेळ असणार्‍या लोकांना स्वतःचा विचार करता येईल आणि केव्हा ना केव्हा तरी नियंत्रक सत्ताधार्‍यांचे इथे काय काम? असा प्रश्न त्यांना पडून ते त्या सत्ताधार्‍यांना बाजूस सारतील. म्हणून उतरंडीची समाजरचना दारिद्र्य आणि अज्ञानाच्या वातावरणातच शक्य आहे. म्हणून ज्यात लोकांचा बराचसा वेळ जगण्यापुरते मिळवण्यात खर्च होतो अशीच रचना असणे आवश्यक आहे.

यावर उपाय म्हणून काहींनी शेतकीप्रधान भूतकाळाकडे परतावे असा प्रचार करायचा प्रयत्न केला पण एकूणात औद्योगीकरणाची ओढ फार प्रबळ झालेली होती. शिवाय त्यातून लष्करीदृष्ट्या कमकुवत होण्याचा आणि त्यामुळे पराभूत होण्याचा धोका होता.

काहींनी उत्पादन कमी करण्याचा उपाय करून पाहिला. १९२०-४० च्या दरम्यान अनेक अर्थव्यवस्था कुजवण्यात आल्या, लोकांना बेकार करून त्यांना सरकारी मदतीवर जगवले गेले. परंतु यातूनही लष्करी कमकुवतपणाचा धोका टळत नव्हताच. पुन्हा टंचाई कृत्रिम असल्याचे लोकांना उघड दिसत होते. प्रश्न होता लोकांचा खरा फायदा करून न देता यंत्रयुगाची चाके फिरती कशी ठेवायची? वस्तू निर्माण करायच्या पण त्यांचे समाजात वाटप करायचे नाही. (किंवा वाटप करण्यायोग्य वस्तू निर्माणच करायच्या नाहीत).

हा दुहेरी हेतू सततच्या युद्धांनी साध्य होतो. लोकांना (सुखसोयी पुरवण्यासाठी वापरता येण्याजोग्या) वस्तूंचा नाश करण्याचा युद्ध हा मार्ग आहे. जरी युद्धात प्रत्यक्ष वस्तू नष्ट झाल्या नाहीत तरी त्यांचे उत्पादन चालू ठेवता येते; आता एक लाख क्षेपनास्त्राम्चा साठा झाला आहे म्हणून आता क्षेपनास्त्रे बनवणे थांबवूया असे कोणी म्हणत नाही. अजून क्षेपणास्त्रे बनवणे शक्य असते. यामुळे मनुष्यबळाचा आणि संसाधनांचा वापर कुठल्याही प्रकारे उपयुक्त नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी करता येतो. प्रचंड खर्च करून आपण तरंगता किल्ला बांधत आहोत. थोड्या वर्षांनी हा तरंगता किल्ला कालबाह्य म्हणून टाकून दिला जाईल आणि नवा तरंगता किल्ला बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.

अशा रीतीने युद्ध हे संपत्तीचा आवश्यक नाश घडवून तर आणतेच पण त्याच बरोबर हे कार्य मानसिकदृष्ट्या स्वीकारार्ह रीतीने घडवून आणते. सततची युद्धमान परिस्थिती लोकांना (इथे आऊटर पार्टी) कायम त्यागासाठी तयार ठेवते. भविष्यात मिळणार्‍या काल्पनिक विजयाच्या आशेने आणि सध्या परिस्थितीची गरज म्हणून सत्ताधार्‍यांना संपूर्ण अधिकार द्यायला लोक तयार होतात. मुळात युद्ध निर्णायक व्हायची शक्यता नसल्याने प्रत्यक्ष परिस्थितीत काही फरक पडण्याची शक्यता नसते. म्हणुन युद्ध हीच समाजात शांतता राखणारी गोष्ट आहे.
------------------------------------------------------
पुढे स्मिथ त्या चळवळीत ओढला जातो. काही काळ चळवळीचे काम केल्यावर त्याला एक दिवशी कळते की ओब्रायन...................

अतिशय सिनिकल वर्णनाची कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते ती त्यात सांगितलेल्या राजकीय तत्त्वज्ञानाने. तेही संपूर्ण निराशावादी वाटू शकते. पण त्या तत्त्वज्ञानात आपल्याला आपल्या आजूबाजूच्या समाजात पहायला / ऐकायला मिळणारी इतकी साम्यस्थळे दिसतात की चकित व्हायला होते. [याची संभावना कोणी आशावादी मनुष्य कदाचित - एखाद्या रोगाची लक्षणे वाचल्यावर आपल्याला तो रोग झाल्याचे वाटते अशी करेल]

न्यूस्पीक

आधीच्या भागात दोन विचित्र भासतील असे शब्द वेगळ्या रंगात लिहिले होते (डबलप्लसअनगुड आणि अनपर्सन). ते या राज्यातील नव्या भाषेतले आहेत. नव्या भाषेला न्यूस्पीक असे म्हटले जाते. ही इंग्लिशची मोडतोड करून मुद्दाम घडवण्यात आलेली भाषा आहे. या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे हिच्यात कमीत कमी शब्द आहेत. आणि जास्तीचे शब्द अनावश्यक म्हणून रद्द केले जात आहेत. उदा गुड आणि बॅड असे दोन शब्द न ठेवता गुड हा एकच शब्द आहे. बॅड ऐवजी अनगुड एक्स्ट्रीमली बॅड च्या ऐवजी डबलप्लस अनगुड वगैरे. दुसरा शब्द अनपर्सन. म्हणजे नसलेलि व्यक्ती.

असे अनेक शब्द आणि वाक्यरचना ऑरवेलने सांगितल्या आहेत. मला स्वत:ला या भाषेच्या खटाटोपाने लोकांची मने नियंत्रित करण्यात सत्ताधार्‍यांना काय फायदा होऊ शकेल हे कळलेले नाही. पुरेसे शब्दच नसतील तर लोकांना एकमेकांशी कम्युनिकेट करणे अवघड होईल आणि उठावाची शक्यता कमी होत जाईल अशी काही विचारसरणी असल्याचे एका परिचिताचे म्हणणे आहे. कुणाला कळले तर प्रतिसादातून प्रकाश टाकावा.

पुस्तक समाजव्यवहारावर भाष्य करणारे म्हणून वाचनीय आहे. वाचताना मुळापासून हलायला होते.

समाप्त.