• '

गो.नी. दांडेकर

 
लेखकाचा पत्ता: 
तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे
 
 

Birth Date

871916
 
 

लेखकाचे चित्र

 
 

Author Info

श्री.गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर अर्थात गोनीदां हे मराठी साहित्यातील एक अनमोल असं रत्न्.त्यांना जवळचे, नात्यातले आणि ओळखीतले लोक आप्पा दाण्डेकर या नावाने देखील ओळखत.

गोनीदांचा जन्म विदर्भातील परतवाड्याचा. आप्पांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी घर सोडलं ते गांधीजींनी युवकांना स्वातंत्र्यलढयात सामील होण्याची हाक दिली तेव्हा.पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. काही वर्षं ते गाडगेबाबांच्या सहवासात राहिले. आप्पा आयुष्यभर मनसोक्त भटकले. गड किल्ल्यांची त्यांची भटकंती अव्याहत चालूच राहिली. शिवाजी महाराजांवरची त्यांची श्रद्धा त्यांच्या लिखाणातून सहज दिसून येते. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची माहिती तमाम वाचकांना त्यांच्यामुले झाली असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. त्यांच्या कादंबर्‍यांतील कथा देखील बहुतांशी अशाच कुठल्या ना कुठल्या किल्ल्यांच्या आस्पास घडतात. ( उदाहरणादाखलः माचीवरला बुधा, जैत रे जैत, पवनाकाठचा धोंडी, झुंजार माची इ. )

स्मरणगाथा या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या आयुष्यातली जवळपास तीस वर्षे उलगडली आहेत. याच पुस्तकासाठी त्यांना १९७६ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच १९८१ साली अकोला इथे भरलेल्या मराठी साहित्य सम्मेलनाचे ते अध्यक्ष होते.