• '

एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग -८

भाग-७ दुसर्‍या पानावर जायला आला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.

आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक वगैरे देणे इथे अपेक्षित आहे. त्याच बरोबर पुस्तकाची संक्षिप्त ओळख करून दिलीत तर अधिक चांगले.

मी आज खालील पुस्तके विकत घेतली.
१. मित्रहो - पु. ल. देशपांडे. परचुरे प्रकाशन. किंमत ३०० रू. पुलंच्या भाषणांचा संग्रह आहे. छान वाटते आहे.
२. कल्पनेच्या तीरावर - वि. वा. शिरवाडकर. काँटिनेंटल प्रकाशन. किंमत ५० रू.
३. क्रांतिसूर्य - विश्वास पाटील. मेहता पब्लिकेशन. किंमत १३० रू. क्रांतिसिंह नाना पाटलांवर आहे.
कोल्हापुरातील 'ग्रंथ'मधून १०% सवलतीत घेतली.

छान खरेदी मिहीर

दिग्गज लेखकांची आगळीवेगळी पुस्तके घेतलीस तू

छानच... Smile

माझ्या संग्रहात नेमाड्यांच्या पुस्तकांपैकी फक्त हिंदूच घ्यायचे राहिलेले आहे. ते घ्यायचा मोह मुद्दाम टाळतो आहे Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

आषाढी एकादशी चा मुहूर्त

आषाढी एकादशी चा मुहूर्त साधून पुढील पुस्तके माझ्या संग्रहात आली.

वारी एक आनंदयात्रा - संदेश भंडारे - येथे माहिती मिळेल
असाही एक महाराष्ट्र - संदेश भंडारे या दुव्यावर माहिती मिळेल
हसत खेळत ध्यानधारणा - ओशो
आणि विज्ञानावर
डार्विन आणि जीवसृष्टी रहस्य -संपादित (१२ लेखकांनी डार्विनच्या सिद्धांताचा घेतलेला वेध)-यात नंदा खरे पण आहेत
सोनेरी टोळी - नाथमाधव (कादंबरी)
आर्य चाणक्य - जनार्दन ओक (कादंबरी)
क्षितिज - सुहास शिरवळकर (कादंबरी)
झूम - सुहास शिरवळकर (कादंबरी)

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

दमदार

परत एकदा दमदार खरेदी झाली रे मित्रा तुझी.
वारी एक आनंदयात्रा आणि असाही एक महाराष्ट्र बहुधा तुला सप्रेम भेट म्हणूनच मिळाली असतील Smile
ओशोंचे पुस्तक तुझ्या संग्रहात बघून थोडेसे आश्चर्यच वाटले.
झूम तर सुशिंची सुवर्णमहोत्सवी कादंबरी आहे ना. दारूसारख्या एकदम वेगळ्याच विषयावरची चित्तवेधक कादंबरी.

खरे आहे मित्रा

म्हणूनच मी संग्रहात आली असे लिहिले होते Wink

ओशोंची माझ्याकडे ६ पुस्तके आहेत आणि त्यांच्या कित्येक प्रवचनांच्या एमपी थ्री पण आहेत.
तुला आश्चर्य कशाचे वाटले ते जाणून घ्यायला आवडेल Wink

सुशिंचे संग्रहात नसलेले पुस्तक मिळाले की मी लगेच उचलतो. यावेळी झूम आणि क्षितिज मिळाले... Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

आश्चर्य

तुला आश्चर्य कशाचे वाटले ते जाणून घ्यायला आवडेल

तुझ्याकडे विज्ञानाची पुस्तके बरीच आहेत, खगोलाची पण. त्यात ओशोंसारखे एकदम धार्मिक पुस्तक शिवाय ते पण कादंबरी नसून प्रवचनात्मक असलेले बघून जरा चकित झालो.Smile

अध्यात्म आणि विज्ञान

अरे अध्यात्मावरची पण माझ्याकडे भरपूर पुस्तके आहेत Smile
ध्यानधारणा, साधना, योग्यांची आत्मचरित्रे, प्रवचने, अशा अनेक स्वरुपांत आहेत

साद देती हिमशिखरे तू वाचले असशील असे वाटते आहे. पण नसेन तर अवश्य वाच
कादंबरी आहे पण मी वाचलेल्या आध्यात्मिक पुस्तकांपैकी अगदी सोप्या शब्दांत अध्यात्म त्यात विशद करुन सांगितले आहे.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

काय सांगतोस

साद देती हिमशिखरे मला हिमालयावर आधारीत मोहिमांपैकी वाटायचे.
अध्यात्मिक पुस्तक आहे हे बघून चक्रावूनच गेलो. Smile कदाचित घेउनही टाकेन मग आता.

नक्की घे मित्रा

साद देती हिमशिखरे तुला एक अत्भुत अनुभव देईल याची खात्री आहे Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

नक्कीच

नक्कीच घेउन टाकेन रे मित्रा आता. Smile

सागर, जी के प्रधानांचेच

सागर, जी के प्रधानांचेच 'अंतरीचा मागोवा' हे पुस्तक सुद्धा खूप छान आहे. मिळाले तर नक्की वाच.
ह्या पुस्तकाचे बरेचसे लेखन प्रधानांनी लिहून त्यांच्या ऑफिसम्ध्ये ठेवले होते. पण त्यांचे निधन झाल्यामुळे ते पुस्तक प्रकाशित झाले नव्हते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी द्रुष्टांताद्वारे ( कोणाला ते नीट आठवत नाही ) ह्या त्यांच्या लेखनाची माहिती दिली, शिवाय ते 'म. ना. धोंड' यांच्याकडून अनुवादीत करून घ्यावे असे ही सुचवले.
मी दिलेल्या तपशीलात कदाचित काही चूक असेल पण साधारण अशी त्या पुस्तकाची जन्मकथा आहे.
छान पुस्तक आहे.

+१ सहमत आहे

शमिश अगदी बरोबर

अंतरीचा मागोवा हेदेखील पुस्तक आहे माझ्याकडे.
हे लेखन सगळे जी.के.प्रधान यांचे पार्टनर (आशर) यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले.
अप्रतिम पुस्तक आहे हे देखील. साद देती हिमशिखरे मध्ये ज्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे त्याचा बर्‍यापैकी विस्तार आहे या पुस्तकात. Smile

बाकी तू म्हणतोस तसे अंतरीचा मागोवा हे देखील एक वाचनीय आणि संग्राह्य पुस्तक आहे

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

साद देती हिमशिखरे हे पुस्तक

साद देती हिमशिखरे हे पुस्तक मला पूर्वी बरेच आवडायचे. त्यानंतर मी अंतरीचा मागोवा घेतले.ते सुध्दा खूप आवडले.पण काही का़ळानंतर जे.कृष्णमूर्तींची पुस्तके वाचनात आली आणि मी आश्चर्यचकित झालो.अंतरीचा मागोवा ह्या पुस्तकावर जे.कृष्णमूर्तींच्या पुस्तकांचा बराच प्रभाव जाणवला.नुसता प्रभाव नाही तर,काही वेचे तर अगदी sentence to sentence copy केल्या सारखे आहेत.टीका करण्याचा हेतू अजिबात नाही.योगायोग म्हणता येईल. Wise people think alike असे म्हणून सोडून देता येईल.

लायब्ररीत आणि मित्रांकडून

लायब्ररीत आणि मित्रांकडून भरपूर पुस्तके मिळत असल्याने फारशी विकत घेत नाहीच.
पण तरी नुकतेच प्रोतिमा बेदी यांचे 'टाईमपास' आणि जी ए कुलकर्णी यांचे 'काजळमाया' विकत घेतले.
टाईमपास वाचून झाले आहे. आवडले.
काजळ्माया वाचायचा मात्र अजून मूड नाही झाला. Stare

दरम्यान मिलींद बोकीलांचा 'झेन गार्डन' हा कथासंग्रह पण वाचून झालाय. मस्तच आहे.

काजळमाया

काजळमाया म्हणजे एक कथा वाचायची हिंमत करायची, त्यातले दु:ख आणि भीतीचे मिश्रण असे बादलीभर पाणी डोक्यावर उपडे झाल्यासारखे अंगावर कोसळते, मग नंतर महिनाभार काजळमायेला हातही लाववत नाही.

अरबी!!!

१. एक अरबी कहाणी-- जी. ए. कुलकर्णी ह्यांनी केलेला अनुवाद...
२. अरेबियन नाईट्स -- गौरी देशपांडे ह्यांनी केलेले १६ खंड....

सागरच्या सौजन्याने आणि
http://shop.mimarathi.net/ च्या कृपेने

सर्व पुस्तके घरपो...च!!!!

अरेबियन नाईट्स वर लेखन अपेक्षित

चित्रा,

छान खरेदी झाली आहे.
आता तुझ्या खुमासदार शैलीत अरेबियन नाईट्स वर एक परिक्षण नक्की येऊ देत:)

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

वेग

सागर,
`अरेबियन नाइट्स'चे १६ खंड आहेत म्हटलं....
आणि माझा वाचन-वेग आणि त्यावर लिहिण्याचा वेग किती `सुपरफास्ट' आहे हे तुला आता ठाऊक झाले असावे!!!!
प्रयत्न नक्की करेन.

वेळ लागला तरी चालेल

चित्रा,

वेळ लागला तरी चालेल पण नक्की लिहि.
अरेबियन नाईट्स हा जादूचा असा भुलभुलैया आहे की एकदा त्यात शिरले की कधी एकदा सगळ्या खंडांचे वाचन पूर्ण करतो असे होते. तेव्हा तू सुरुवात कर चित्रा, मग आपोआप सगळे खंड वाचले जातील Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

१९८४

जॉर्ज ऑर्वेलचे '१९८४' (इंग्रजी) विकत घेतले. अजून वाचले नाही आहे. वाशीतील एका दुकानात हे १०० रू.चे पुस्तक ५० रुपयांना मिळाले. Smile

मिहिर

एकही नाही

पुस्तकविश्व बंद झाल्यापासून आज-चालु झाल्याचे कळे-पर्यंत एकही पुस्तक विकत घेतलेले नाहि (वाचली बरीच Smile )

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

कुठली

कुठली कुठली वाचून काढलीस रे? परी़क्षण लिही की रे १/२ पुस्तकांचे. Smile

+१ असेच म्हणतो

ऋ नक्की लिहि रे वाचलेल्या पुस्तकांवर Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

झेरॉक्स काढल्या

(श्री.) चारुता सागर यांचे नागीण, नदीपार आणि मामाचा वाडा हे तीन्ही कथासंग्रह औट ऑफ प्रिंट असल्याने त्यांच्या झेरॉक्स काढाव्या लागल्या. पैकी नागीण आणि मामाचा वाडा हे मॅजेस्टिकचे तर नदीपार हे राही प्रकाशनाचे आहे.

इथल्या (पुस्तकविश्व) डेटाबेसमध्ये ही पुस्तके सापडली नाहीत. संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी आणि त्यांची भर घालावी ही विनंती.

आज

पुस्तकविश्ववरील आपला सर्वांचा लाडका पुस्तकवेडा मित्र सध्या बंगळूरू येथून पुण्यात आलेला असल्याने त्याला भेटणे क्रमप्राप्तच होते. भेटीसाठी सुयोग्य ठिकाण अर्थातच एखादे पुस्तक प्रदर्शनच, तेव्हा पुण्यात आचार्य अत्रे सभागृहात लागलेल्या ज्ञानगंगा पुस्तक प्रदर्शनाच्या ठिकाणी भेटायचे ठरले. प्रत्यक्ष असे पहिल्यांदाच भेटत असूनही पुविवरच्या सततच्या संवांदामुळे प्रथमच भेटत आहोत असे वाटलेच नाही.
पुस्तकांविषयीच्या भरपूर गप्पा मारता मारता पुढील खरेदीही उरकली गेलीच. पुस्तक प्रदर्शनातून रिक्तहस्ते फिरणे कसे शक्य आहे म्हणा.Smile

१. रण/दुर्ग - मिलिंद बोकील - मौज प्रकाशन - १५० रू. (मिलिंद बोकीलांची कोरी करकरीत जोडकादंबरी)

२. महाराष्ट्राची कुळकथा - डॉ. मधुकर केशव ढवळीकर - राजहंस प्रकाशन - १४० रू. (पुरातत्वीय पुराव्यावर आधारीत महाराष्ट्राचा प्रागेतिहासिक काळापासूनचा वृत्तांत)

३ जाता येता - सुहास शिरवळकर - नंदिनी पब्लिशिंग हाउस - १५० रू. (बरेच दिवस मिळत नसलेली सुशिंच्या या सदाबहार कादंबरीची नुकतीच प्रसिद्ध झालेली नवी आवृत्ती)

सागरने पण अर्थात खरेदी केलीस. त्याची यादी तो देईलच इथे.
एकंदरीत एका पुस्तकवेड्या मित्राला भेटून खूप छान वाटले.

अगदी खरे आहे... असेच म्हणतो

प्रत्यक्ष असे पहिल्यांदाच भेटत असूनही पुविवरच्या सततच्या संवांदामुळे प्रथमच भेटत आहोत असे वाटलेच नाही.

मलाही अगदी असेच वाटले. पुस्तकविश्व वर इतक्या वेळा आमच्या चर्चा झाल्या, विचारांचे आदानप्रदान झाले आहे की वल्ली हे व्यक्तीमत्त्व मला परके कधी वाटलेच नाही. प्रत्यक्ष भेटीत वल्लीचा तोच स्वभाव दिसला. खरे तर त्याला पुन्हा भेटायचे होते पण काही कारणांस्तव पुनर्भेट नाही झाली. असो..

वल्लीबरोबर मी माफकच खरेदी केली ती अशी
१. तो - सुहास शिरवळकर
२. सत्र - सुहास शिरवळकर
३. मुक्काम शेंडेनक्षत्र - भा.रा. भागवत - उत्कर्ष प्रकाशन रुपये १२५/-
(ही संपूर्ण आवृत्ती आहे. संक्षिप्त नव्हे :)हे पुस्तक सूर्यावर स्वारी ह्या ज्यूल्स व्हर्नच्या कथेचा पुढचा भाग आहे.)

बोलता बोलता किती घेऊ आणि किती नको असे झाले होते. आम्ही दोघं पुस्तकप्रेमी ज्यावेळी अत्रे सभागृहात पुस्तके बघत होतो तेव्हा नुसती चर्चा चालू होती. हे पुस्तक असे आहे. हे पुस्तक शोध. असे करता करता वल्ली कडून मला काही पुस्तकेही कळाली जी मी घ्यायच्या यादीत टाकली. त्यातले १ मात्र मी नंतर परत जाऊन घेतले.

- संपूर्ण शेर‌लॉक होम्स - गजानन क्षीरसागर - ७०० रुपये (१०% सवलत मिळाली) - अर्थात आमच्या बंधूराजांना पण शेरलॉक होम्सची आवड असल्यामुळे बंगळुरात परत येताना हे पुस्तक माझ्या बॅगेत नाही आले Sad

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

हो रे

अगदी खरे रे मित्रा. खरे तर तू अगदी वेळ नसतानाही भेटीला तयार होतास पण ऑफीसच्या कामांमध्ये वाईट्ट अडकल्यामुळे जमूच शकले नाही. Sad

पुस्तक प्रदर्शनातल्या भेटीमध्ये भैरप्पांच्या 'वंशवृक्ष'वर चर्चा झाली होती आणि दुसर्‍याच दिवशी फ्लिपकार्टवरून ऑर्डरवले गेले होते.
आज सकाळीच अतिशय दर्जेदार अश्या पॅकिंगमध्ये घरपोच हजर झाले.

अरे वा अभिनंदन

भैरप्पांची वंशवृक्ष संग्रहात असावी अशीच आहे.
अनेकवेळा वाचता येते.

फ्लिपकार्टचा अनुभव मस्तच आहे यात वाद नाही पण shop.mimarathi.net चाही अनुभव घे एकदा.
सवलत पण चांगली मिळेल आणि पुस्तके फ्री शिपिंगमध्ये मिळू शकतील तुला. तू कारण पुण्यातच आहेस Smile

याच प्रदर्शनात मी अजून २ पुस्तके पाहिली होती. जडत्व जास्त असल्यामुळे या पुस्तकांच्या वाटेला गेलो नाही.
१. महाराष्ट्राचे महामंथन - लालजी पेंडसे (७०० रुपये) - संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावरचा जुना दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध
२. शं.बा.दीक्षितांचे - भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिष शास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास

मी घेतलेली अजून १ पुस्तक सांगायचे राहिले. संपूर्ण शेरलॉक होम्स बरोबर हे पण घेतले.

- अणुविवेक - दिलिप कुलकर्णी - राजहंस प्रकाशन

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अणुविवेक

अणुविवेक सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारीत आहे का पूर्णपणे अणुविज्ञानाच्या तांत्रिक बाजूवर प्रकाश टाकणारे?

अणु विज्ञानावर आहे

पूर्णपणे अणुविज्ञानाच्या तांत्रिक बाजूवर प्रकाश टाकणारे आहे Smile

थोडेसे चाळले आहे पुस्तक. शेवटी शेवटी राजकीय दृष्टीकोनावर देखील टिप्पणी आहेत. पण मुख्य करुन अणुचे कार्य कसे चालते व अणुशक्ती च्या सर्व तांत्रिक बाबींकडे एकंदरीत रोख आहे या पुस्तकाचा.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

श्रीमानयोगी

पुण्याला घरी असलेले श्रीमानयोगी गायब झालेले दिसले खरे तर त्यामुळे घेतले. पण दुधात साखर तशी सवलतही मस्त मिळाली.

रणजित देसाईंचे 'श्रीमानयोगी' आज फ्लिपकार्टवरुन उचलले.
३५ % सवलत आणि फ्री शिपिंग - अजून काय पाहिजे Wink

४८० चे पुस्तक फक्त ३१२ रुपयांना मिळाले Smile

हा फ्लिपकार्टचा दुवा

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

मस्त रे

श्रीमान योगी हे कादंबरीच्या निकषावर जरी चांगले असले तरी ऐतिहासिकतेच्या निकषावर पाहिले असता ते कमीच पडते. महाराजांच्या जीवनातील समरप्रसंग तसे कमीच आहेत, लेखकाने कल्पनाशक्तीवरच जास्त भर दिलाय असे वाटून जाते.
पानिपत कादंबरीच्या संदर्भात विश्वास पाटलांचे एक वाक्य उद्धृत करू इच्छितो. ते म्हणतात की त्यांनी कादंबरीला घरातून समरांगणावर आणले जे अगदी खरे आहे.
अर्थात फक्त (आणि फक्तच) कादंबरी म्हणून पाहता श्रीमान योगी श्रेष्ठच आहे यात शंकाच नाही. श्रीमान योगीवरील नरहर कुरुंदकरांची सविस्तर प्रस्तावना मराठीतील आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ प्रस्तावनांपैकी एक ठरावी.

खरे आहे तू म्हणतोस ते

कादंबरी ही शेवटी लेखकाची कल्पनाविश्वातील भरारीच असते.
पण मराठीतील एक उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून श्रीमानयोगी केवळ अद्वितियच आहे.
सत्य इतिहासाचे उदात्तीकरण आपल्याला कादंबरीत पहावयास मिळते.
पण एकंदरीत समाजमन पाहता अशा उदात्तीकरणामुळे प्रेरणा प्रचंड प्रमाणावर मिळते, त्यासाठी 'श्रीमानयोगी' सारख्या अलौकीक आणि अत्भुत साहित्यकृतींची नितांत गरज आहे.

कुरुंदकरांची प्रस्तावना नक्कीच महत्त्वपूर्ण आहे आणि श्रेष्ठही. मला सर्वात आवडलेली प्रस्तावना म्हणजे ब.रा.हिवरगांवकर यांच्या कौटिलिय अर्थशास्त्र या ग्रंथाला दुर्गा भागवत यांनी लिहिलेली प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना. (हे पुस्तक अत्रे सभागृहात खरेदीसाठी उपलब्ध आहे) त्यानंतर आवडलेली प्रस्तावना ती व्यंकटेश माडगूळकरांच्या स्वतःच्याच 'सत्तांतर' कादंबरीसाठीची. कुरुंदकरांची प्रस्तावना अल्पशी आठवते आहे, त्यामुळे पुनर्वाचन झाल्यावर तीही माझ्या उत्तम प्रस्तावनांच्या यादीत येणार हे नक्की Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

लिखाणास प्रवृत्त ....

सागर,

कौटिलीय अर्थशास्त्र असे गुगल सर्च वर बघितल्यास खालील माहिती मिळाली ---

पुस्तक क्र. १. -
ह्या पुस्तकाच्या लेखकाबाबत मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

पुस्तक क्र. २ -

पुस्तक क्र. ३ -

याशिवाय देखील इतर पुस्तके असतील. काही विषय अनेकांना लिखाणास प्रवृत्त करणारे असतात. आणि प्रत्येक जण आपापल्या परिने त्याचा अर्थ लावत असतो.

कौटिलीय अर्थशास्त्र

"ह्या पुस्तकाच्या लेखकाबाबत मनात संभ्रम निर्माण झाला आहे."

~ तुम्हाला अभिप्रेत असलेले कौटिलीय अर्थशास्त्र [जे वरदा बुक्सने प्रकाशित केले आहे] त्याचे लेखक श्री.ह.अ.भावे असून त्याला दुर्गा भागवत यानी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे.

विद्यापीठ पातळीवरील अर्थशास्त्राच्या [आणि समाजशास्त्राच्यादेखील] अभ्यासक्रमात या पुस्तकाचा सातत्याने वापर केला जातो. - दुव्यावरील कव्हरमुळे पुस्तकाचे लेखक माझ्या लक्षात आले. पण त्या कव्हरवर केवळ प्रस्तावनाकार दुर्गा भागवत यांचाच का उल्लेख केला गेला आहे ते मात्र समजत नाही.

(अवांतर : हेच श्री.ह.अ.भावे त्यांच्या मराठी-इंग्रजी शब्दकोशाविषयीही खूप प्रसिद्ध आहेत.)

खुलासा करावा...

श्री. अशोक पाटील / सागर,

ह्या पुस्तकाच्या लेखिका म्हणूनही दुर्गाबाईंचा उल्लेख आहे, आणि प्रस्तावना कै. हिरगावकर आणि दुर्गाबाईंची असेही म्हटले आहे.
आपल्या इथल्या यादीत काही वेगळा उल्लेख आहे.

पुस्तक प्रत्यक्ष बघणार्‍यांनी ह्यावर खुलासा करावा ही नम्र विनंती...

मूळ लेखक

चित्रा ~
http://www.dkagencies.com/doc/from/1063/to/1123/bkId/DKA2521716276322527...
इथे दिलेल्या माहितीवरून तुम्हाला नक्की समजेल की चर्चेत असलेल्या कौटिलीय अर्थशास्त्राचे लेखक ह.अ.भावे असून त्याला प्रस्तावना दुर्गा भागवत आणि हिरगावकर या दोघांची आहे.

मी याच पुस्तकाबद्दल म्हणत आहे

वरील ३ दुव्यांपैकी रसिक च्या दुव्यामधील माहिती चुकीची आहे.
दुसरी २ पुस्तके वेगळीच आहेत.

याव्यक्तिरिक्तही मला ४थे पुस्तक माहिती आहे Wink बहुतेक गोपाळ टिपणीस यांचे.

अशोक काकांनी डीके एजन्सीच्या दुव्यावर जे पुस्तक दिले आहे मी त्याच पुस्तकाबद्दल म्हणत आहे

माझ्या माहिती प्रमाणे मी म्हणत असलेल्या कौटिलिय अर्थशास्त्र या ग्रंथाचे संपादन ब.रा.हिवरगांवकर यांचे आहे. त्याला प्रस्तावना दुर्गा भागवत यांची आहे आणि ग्रंथाचे प्रकाशक वरदा प्रकाशन चे मालक ह.अ.भावे हे असल्यामुळे त्यांचेही नाव त्यात आले असण्याची शक्यता आहे. हिवरगांवकर यांची फक्त प्रस्तावना नक्कीच नाहिये.

कौटिलिय अर्थशास्त्रावरचा हिवरगांवकर यांचा ग्रंथ माझ्यामते सर्वोत्कॄष्ट आहे. मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचा अर्थ आणि सविस्तर माहिती या ग्रंथांत आहे.

अर्थात मी हा सुंदर ग्रंथ वाचून दीड दशकाहूनही अधिक काळ लोटला असल्यामुळे मला नीटसे आठवत नाहिये.

अत्रे सभागृहातील पुस्तक प्रदर्शनात कौटिलिय अर्थशास्त्रावरचा हा सुंदर ग्रंथ खरेदीसाठी उपलब्ध आहे.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

ह्म्म

मी आठवीत असताना बहुधा श्रीमानयोगी वाचायला घेतलेले. निम्मे संपवले. त्यावेळी मिर्झाराजे आणि शिवाजी महाराजांचे बोलणे १०० पाने आणि मुरारबाजीची लढाई केवळ अर्धाच पान याचा मला फार राग आलेला. याचा निषेध म्हणून मी ते निम्म्यावर सोडून दिलेले. Smile
अर्थात वाचायचा कंटाळा आलेलाच म्हणा.

मिहिर

संधी मिळाली तर नक्की वाच मिहिर

श्रीमानयोगीची उत्तुंगता कादंबरी संपत जाते तसतशी वाढत जाते.
तेव्हा मिहिर मित्रा, पुन्हा ही कादंबरी अवश्य वाच Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

गणेशोत्सवाची लूट

शॉप.मीमराठी.नेट वर गणेशोत्सवानिमित्त एक छान ऑफर चालू आहे. आणि सवलत छान मिळाली म्हणून पुढील पुस्तके घेतली आहेत. आजच ऑर्डर नोंदवली आहे.

१. कोवळे दिवस - व्यंकटेश माडगुळकर
२. सनसनाटी - सुहास शिरवळकर
३. संपूर्ण शेरलॉक होम्स - गजानन क्षीरसागर (पुन्हा घ्यावे लागले. पुण्यात घेतले तेव्हा बंधुराजांच्या अनुपस्थितित त्याच्या एका मित्राने उचलून नेले आणि वर परत आईकडे पैसे पण ठेवून गेला Sad म्हणजे परत मागायची सोय नाही )
४. माणूस - मनोहर तल्हार

याशिवाय घेतलेले १ पुस्तक सांगायचे राहिले होते.
५. माझे विद्यापीठ - नारायण सुर्वे (फक्त ५१ रुपयांचे आहे)

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अरे

अरे बास आता.
आधी घेतलेली सर्व पुस्तके वाचून काढ बघ आधी, मगच नवीन पुस्तके घे आता.
अजून किती जळवशील आम्हास. Smile

खरे आहे

हॅ हॅ हॅ,

तू म्हणतोस ते खरे आहे मित्रा, पण वाचनही आता सुरु केले आहे.
सध्या भा.रा.भागवतांचे पुण्यात तू बरोबर असताना घेतलेले पुस्तक वाचतोय 'मुक्काम शेंडेनक्षत्र'

एकदम अफलातून पुस्तक आहे. विज्ञानाची आवड असणार्‍या प्रत्येकाने भा.रा.भागवतांनी अनुवादित केलेली ज्युल्स व्हर्नची सर्व पुस्तके कायम संग्रही ठेवावीत इतकी सुंदर आहेत.

सध्या माझ्या आवडत्या विषयावर - खगोलशास्त्रावर- चे हे पुस्तक असल्याकारणाने मी वाचनानंदात अक्षरशः तरंगतो आहे Smile

एकदम भन्नाट पुस्तक आहे हे. आवड असेन तर नक्की घे हे पुस्तक. या पुस्तकाबरोबर सूर्यावर स्वारी हा पहिला भाग मिळाला तर बघ. नाही मिळाला तरी फारसे बिघडत नाही. पहिल्या भागाचा सारांश सुरुवातीला आहेच.
खूप सुंदर आहे हे पुस्तक

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

ज्युल्स व्हर्न

अवांतरः
ज्युल्स व्हर्नच्या पुस्तकांच्या ही भाषांतरे लहान असतानाच वाचली तहोती. मागे NYPL मधे त्यांची पुस्तके इंग्रजीत दिसली. लगेच उचलली मात्र इंग्रजीत ती तितकी रोचक वाटली नाहित.
आता ही मर्यादा माझ्या इंग्रजी भाषांतराची की मुळ लेखनाची माहित नाहि. मराठी भाषांतर मात्र मला तरी इंग्रजी भाषांतराहून बरेच उजवे वाटले होते.

ज्यूल्स व्हर्न च्या कथांचं वैषिष्ट्य असविसाचेकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याने जेव्हा ह्या कादंबर्‍या लिहिल्या तेव्हा यातील वर्णिलेल्या बर्‍याच गोष्टींचे शोधही लागले नव्हते. मात्र या लेखकाची वैज्ञानिक दृष्टी/तर्कशुद्धता इतकी तल्लख होती की त्यापैकी अनेक कल्पना जशाच्या तशा किंवा त्याच तत्त्वावर आधारीत दिसतात. आज १५०+ वर्षांनंतरही इतक्या वैज्ञानीक स्थितीत बदल होऊनही त्या कल्पना 'पुराण' किंवा 'त्यात काय विषेश' असे वाटत नाहित हे ज्युल्स व्हर्नचे सर्वात मोठे यश.
त्याचा पुस्तके लिहिताना अभ्यासही खुप असे. नीटिलस ही 'Twenty Thousand Leagues Under the Se' या कथेतील पाणबुडी जन्माला घालण्याआधी त्यांनी सगळ्यात अद्ययावत फ्रेंच पाणबुडी प्लॉन्गरचा अभ्यास केला होता. त्यानंतर त्याच्या कथेतील नीटिलस ही 'भविष्यातील प्लॉन्गर'चे रुप रंगवले होते.

प्रत्येकाने वाचली नसतील तर सारी पुस्तके वाचावीत.. आपल्या मुलांना (वेळीच) वाचायला द्यावीत

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

अगदी बरोब्बर बोललास ऋ

खरे आहे ते ऋ,

इंग्रजी पुस्तकांपेक्षा मराठी अनुवाद सरस आहेत.
ज्यूल्स व्हर्नची मूळ पुस्तके फ्रेंच भाषेतून होती. आणि इंग्रजी पुस्तके मीपण नाही वाचलेली त्यामुळे इंग्रजी अनुवाद तितके सरस होते की नाही माहिती नाही. पण भा.रा.भागवतांनी मराठीत जो अनुवाद केला आहे त्याला तोड नाही. एवढे सुंदर अनुवाद आहेत की मूळ पुस्तकाकडे फक्त एक रेफरन्स म्हणून वळायची इच्छा व्हावी. ज्यूल्स व्हर्नचे मी फक्त एकच इंग्रजी पुस्तक वाचले आहे A Journey to the Center of the Earth पण त्यापेक्षा मराठी अनुवाद जास्त सरस वाटला मला.

ज्यूल्स व्हर्न हा जितका उत्कृष्ट लेखक होता त्याहीपेक्षा मोठा द्रष्टा होता असे म्हणावे लागेल.
त्याच्या कथांमधून वर्णन केलेली कित्येक साधने त्याकाळी अस्तित्त्वात आलेली नव्हती. आणि त्याच्या पुस्तकांतून किचकट असलेली वैज्ञानिक माहिती इतकी सोपी करुन सांगायचा की वाचकाला विज्ञान हा विषय अवघड वाटूच नये.
उदाहरण द्यायचे झाले तर मी आत्ता जे पुस्तक वाचतो आहे -'मुक्काम शेंडेनक्षत्र'- त्यात धूमकेतूबद्दलची माहिती एवढी सोप्या पद्धतीने दिली आहे की त्याला तोड नाही.

धूमकेतूच्या भ्रमणमार्गाचे किती प्रकार आहेत?
धूमकेतूचा भ्रमणमार्ग कसा निश्चित करावा ?
आकारमान कसे काढावे ?
धूमकेतूचे वजन कसे करावे ?
आतापर्यंतचे ज्ञात धूमकेतू कोणकोणते होते? त्यांचा इतिहास...
धूमकेतूच्या भ्रमणमार्गात बदल होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत होतात?

इत्यादी कित्येक क्लिष्ट वाटणार्‍या प्रश्नांची उत्तरे 'मुक्काम शेंडेनक्षत्र' या कादंबरीतून अगदी सोप्या भाषेत मिळतात.

तू दिलेली नॉटीलस पाणबुडीची माहिती खूप छान आहे , याबद्दल मला माहिती नव्हते.

बाकी शेवटी दिलेले तुझे वाक्य मलाही म्हणावेसे वाटते Smile
प्रत्येकाने वाचली नसतील तर सारी पुस्तके वाचावीत.. आपल्या मुलांना (वेळीच) वाचायला द्यावीत

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

सवलतीच्या पुस्तकाच्या यादीचा दुवा

हा थेट दुवा देतो आहे ज्यामुळे गणेशोत्सवाच्या सवलतीत कोणती पुस्तके समाविश्ट आहेत याचा अंदाज येईल.
या यादीत नसलेली पुस्तके देखील तुम्ही ऑर्डर करु शकता, त्यासाठी याच धाग्यावर किंवा या साईट च्या व्यवस्थापकांना तुमची यादी व्यनि करावी लागते इतकेच. मी ही तेच केले होते Smile
स्वस्तात मस्त पुस्तके मिळणार असतील तर आपण कुछ भी करेगा Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

खरेदी

'पाथफाइंडर'मधून 'मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास' विकत घेतले. Smile

मिहिर

काय योगायोग आहे...

मिहिर मित्रा,

काय योगायोग आहे पहा. मी पण पुलंचं हेच पुस्तक परवा 'व्यक्ती आणि वल्ली' सोबत खरेदी केलं Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

व्यासपर्व आणि प्रेषित

व्यासपर्व आणि प्रेषित विकत घेतलं. माझ्याकडील प्रेषितची प्रत पुस्तक-आढावा घेते वेळी गायब असल्याचं कळलं.. दु:ख झालं.. मात्र अजून पुस्तक औट ऑफ प्रिंट नसल्याने लगेच घेतलं

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

नशिबवान आहेस ऋ

माझ्याकडील प्रेषितची प्रत पुस्तक-आढावा घेते वेळी गायब असल्याचं कळलं.. दु:ख झालं.. मात्र अजून पुस्तक औट ऑफ प्रिंट नसल्याने लगेच घेतलं

याबद्दल तू नशीबवान आहेस ऋ.

माझ्याकडची प्रेषितची प्रत ३ वेळा गायब झाली आहे. Smile
जयंत नारळीकरांची ग्रंथसंपदा विपुल असली तरी एवढी दर्जेदार आहे की ती सतत पुनर्मुद्रीत होऊन वाचकांना उपलब्ध होईल. Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

४ थी

४ थी प्रत तुझ्याजवळ असेलच, ती मला दे मग तुझ्याकडची प्रेषितची प्रत ४ वेळा गायब होईल. Wink