'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
नाइन्टीन एटीफोर- जॉर्ज ऑरवेल - भाग १
मुखपृष्ठ
|
जॉर्ज ऑरवेलच्या अॅनिमल फ़ार्मवरील चर्चेच्या निमित्ताने त्याच्याच दुसया एका कादंबरीची आठवण झाली.
अॅनिमल फ़ार्ममधील "ऑल अॅनिमल्स आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल" या प्रसिद्ध वाक्यासारखेच "बिग ब्रदर इज वॉचिंग" हे १९८४ मधील प्रसिद्ध झालेले वाक्य बहुतेकांना माहिती असते. परंतु प्रत्यक्ष कादंबरी फ़ार जणांनी वाचलेली असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्या कादंबरीचा थोडक्यात परिचय. मला ही कादंबरी वाचून दहाएक वर्षे झाली आहेत पण त्यातली कथावस्तू आणि सोशल कॉमेंट मनावर कोरली गेलेली आहे.
पार्श्वभूमी :
ऑर्वेलने ही कादंबरी १९४८ मध्ये लिहिली आहे आणि १९८४ मधली परिस्थिती कल्पिली आहे. १९४८ हे साल म्हणजे दुसरे महायुद्ध संपून फ़ार काळ लोटला नव्हता. महायुद्धाचा परिणाम म्हणून पूर्व युरोप सोव्हिएट रशियाच्या अंमला खाली आला होता. त्याचप्रमाणे पाश्चात्यांच्या साम्राज्यातून अनेक देश हळूहळू मुक्त होत होते. त्यांतल्या बर्याच देशांच्या नव्या नेतृत्वावर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा पगडा होता. त्यामुळे सर्व जग साम्यवादाकडे वळण्याची शक्यता त्याकाळी वास्तव समजली जाई. त्यानुसार १९८४ पर्यंत सगळे जग साम्यवादी बनलेले असेल अशी कल्पना करून ही कादंबरी लिहिली आहे.
संपूर्ण जग साम्यवादी बनले आहे आणि आता जगात वेगवेगळे देश राहिलेले नसून तीनच देश राहिले आहेत. एक ओशियानिया म्हणजे अटलांटिक महासागराच्या पश्चिमेचा प्रदेश आणि ब्रिटन, दुसरा युरेशिया, म्हणजे सगळा युरोप आणि रशिया, मध्यपूर्वेतला प्रदेश, आफ़्रिका, आणि तिसरा इस्टेशिया म्हणजे पूर्वेकडील आशियाई देश. (ही विभागणी साधारण अशी असल्याचे स्मरते. चूभूदेघे.)
अशा जगातल्या ओशियानिया देशात राहणाया एका माणसाची विन्स्टन स्मिथची ही कथा आहे. हा माणूस आउटर पार्टीचा सदस्य आहे.
ओशियानिया राज्यात साधारण सामाजिक उतरंड बिग ब्रदर --> इनर पार्टी --> आउटर पार्टी --> सामान्य जन अशी आहे.
त्या अनुषंगाने राज्यकर्त्यांची वर्तणूक. राज्य करण्याच्या आणि टिकवण्याच्या युक्त्या, सामान्यांचे राज्यकर्त्यांविषयीचे मत, परंतु सर्वंकष सत्तेमुळे ते व्यक्त न करण्याची घ्यावी लागणारी काळजी यांचे अतिशय सिकनिंग वर्णन कादंबरीत आहे.
बिग ब्रदर इज वॉचिंग
या मनुष्याच्या घरात एक टीव्हीचा पडदा आहे आणि त्या पडद्यावर पार्टीच्या सर्वोच्च नेत्याची - बिग ब्रदरची (पार्टीचे सर्व सदस्य म्हणजे ब्रदर आणि हा नेता बिग ब्रदर)- भाषणे सतत चालू असतात. तो टीव्ही बंद करण्याची कोणतीही सोय नाही. इतकेच नाही तर त्या टीव्हीतून या मनुष्यावर नजर ठेवली जाते. आणि तो काही चुकीचे वागताना दिसला तर त्या पडद्यातून त्याची कानउघाडणी केली जाते. ही परिस्थिती देशातील प्रत्येक माणसाच्या घराची आहे. त्यावरून "बिग ब्रदर इज वॉचिंग" हे वाक्य जन्माला आले.
(मला नक्की आठवत नाही पण बहुधा लोकांना लग्न करण्याचीसुद्धा परवानगी नाही).
प्रचार
या मनुष्याच्या कामाचे स्वरूपही रोचक आहे. सरकारी रेकॉर्डस् सांभाळण्याचे काम त्याच्याकडे आहे. रेकॉर्डस् सांभाळणे म्हणजे सध्याच्या सरकारी धोरणाशी रेकॉर्डस् सुसंगत राखणे. उदा. मागच्या आठवड्यात रेशनचा कोटा क्ष आहे आणि या आठवड्यात तो कमी करून य इतका केला गेला आहे. असे असूनही सरकारी घोषणा "सरकारला हे कळवण्यात आनंद होत आहे की या आठवड्यापासून रेशनचा कोटा वाढवून य इतका करण्यात आला आहे. आपल्या शेतकरी बांधवांच्या उत्कृष्ट प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे" अशी होते. आता या घोषणेला अनुसरून मागच्या आठवड्यापर्यंतचे जुने रेकॉर्ड बदलून घेणे हे या माणसाचे काम आहे. मागच्या कुठच्याही रेकॉर्डमध्ये हा कोटा आधी य पेक्षा जास्त होता असे पुरावे राहता कामा नयेत. रेकॉर्ड बदलल्यावर जुने रेकॉर्डचे कागद तो एका नळकांड्यात टाकतो.
सरकारी प्रचाराचा दणका एवढा असतो की पूर्वी हा कोटा जास्त होता हे ह्या रेकॉर्डची अफरातफर करणार्या विन्स्टन स्मिथलाही नीटसे आठवत नाही.
हे तीनही देश एकमेकांशी कायम युद्ध करीत असतात. देशातल्या बहुतेकांसाठी हे युद्ध कुठेतरी लांबवर सीमेवर चालू असते. पण त्या युद्धाशी संबंधित प्रचार मात्र प्रसारमाध्यमातून चालू असतो.
तीन देशातले कोणतेतरी दोन देश युतीत असतात. आणि ते तिसर्याविरुद्ध लढत असतात. पण या युत्या स्थिर नसतात आणि युती बदलेल त्यानुसार शत्रू आणि मित्रांची नावे प्रचारात बदलतात. आपल्या सैन्याने मोठा विजय मिळवला असल्याची बातमी अधूनमधून सांगितली जाते. खरेतर या बातमीने प्रत्यक्ष वस्तुस्थितीत काहीही फरक पडत नाही.
असा हा विन्स्टन स्मिथ ज्या खात्यात काम करत असतो त्या खात्याचे नाव मिनिस्ट्री ऑफ ट्रुथ असे असते. या खात्याचे काम सत्य फॅब्रिकेट करणे असे असते.
विन्स्टन स्मिथला एकदा एक सूचना मिळते. "अमुक दिवशीच्या बिगब्रदरच्या भाषणाचा वृत्तांतात अतिशय ढिसाळपणे (डबलप्लसअनगुड) दिलेला आहे. त्यात काही अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींविषयी (अनपर्सन्स्) उल्लेख आहेत." स्मिथ ते भाषण काढून वाचतो. त्या भाषणात बिग ब्रदरने कुणा एका कॉम्रेडच्या त्यागाबद्दल आणि निष्ठेबद्दल कौतुक केलेले असते आणि त्याला एक क्रॉस बक्षिस दिलेला असतो. सूचनेतील अनपर्सन या उल्लेखावरून स्मिथला कळते की हा कॉम्रेड बिग ब्रदरच्या मर्जीतून उतरला आणि त्याला ठार करण्यात आले आहे. आता स्मिथचे काम हे आहे की त्या कॉम्रेडचे नामोनिशान सर्व रेकॉर्डमधून पुसणे. तो कॉम्रेड जणू कधी अस्तित्वातच नव्हता.
टीपः निळ्या अक्षरातील शब्दांचे स्पष्टीकरण पुढील भागात.
क्रमश:
वाट पहातो पुढच्या भागाची
नितिन,
सुंदर ओळख करुन दिलीत पुस्तकाची.
वाचतो आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
पुविवर स्वागत! येऊ द्यात अशीच
पुविवर स्वागत!
येऊ द्यात अशीच परिक्षणे
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
पुविवर स्वागत.. अशाच अजून
पुविवर स्वागत..
अशाच अजून परिक्षणांची वाट पाहात आहे...
ग्रेट पुस्तक
simply great novel!! ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे.. मी प्रथम मराठीतच वाचले होते. अतिशय समर्थ अनुवाद केलेला आहे. आता अनुवादक कोण आहे ते आठवत नाही. पण भाषेबद्दल इतका समूळ विचार करुन लिहिलेले हे पुस्तक दुसर्या भाषेत अनुवादित करायचे म्हणजे कठिण काम. (अधिक उतुस्कता असेल तर ऑरवेलचा language and politics हा निबंध वाचा).
पुढे जेव्हा इंग्रजीत हे पुस्तक वाचले तर उखडूनच गेलो होतो. मग अनेकदा वाचले, कधी संपूर्ण, कधी तुकड्या तुकड्यात.. भाषा, तिचा विचारांवरील प्रभाव, totalitarian political and social system, ओब्रायनचे विन्स्टनला टॉर्चर करणे - विशेषतः जिथे तो मनातून करप्ट होतो.. सिंपली ग्रेट एव्हडेच म्हणु शकतो..
WAR IS PEACE
FREEDOM IS SLAVERY
IGNORANCE IS STRENGTH
मला नेट वर शोधताना अॅनिमल
मला नेट वर शोधताना अॅनिमल फार्म चा अनुवाद सापडला. पण १९८४ चा नाही. सापडल्यास दुवा नक्की देणे
निखिल देशपांडे






यावे
यावे...!