By Deepak Pawar, 13 February, 2026

जरा आगळे आज वाटते
मनी काहीसे आज दाटते
करमत नाही
हुरहुर काही
कुणी सारखे स्वप्नात येते.

आज झऱ्याचा नाद वेगळा
आज नभाला साज वेगळा
वेगळ वाटतं नभातल चांदणं
काळजा छेडती कुणाची पैंजण
मना कुणीसे आज वेढते.

आज उदासी मना भारुनी
उरी कुणीसे येई फिरुनी
कळेना असे का भिरभिरते मन
मनी प्रीत कुणाची फुले क्षणक्षण
प्रीत कुणाची मनी उमलते.

https://youtu.be/8g_lRY-rduk

By नागनिका, 12 February, 2026

काही दिवसांपासून एपिस्टन फाईल्स चर्चेत आहे आणि या संबधित असणारी छायाचित्रे व व्हिडिओने तर समाज माध्यमांवर एकच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये नामांकित व्यक्ती असण्याची चर्चा आजूबाजूला होताना दिसत आहे. जेफ्री एपिस्टन नावाचा कोणी एक धनाढ्य व्यक्ती एका खाजगी बेटावर लहान मुलींची तस्करी करत होता. धनाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलींचे या बेटावर लैंगिक शोषण केले जायचे. ३० लाख कागदपत्रे असलेल्या या फाईलमध्ये समाजातील मान्यवर व्यक्तीची नावे असली तरी ही मंडळी दोषी असल्याचे अजूनतरी सिद्ध झाले नाही. या कागदपत्रांमध्ये ‘cannibalism’ या शब्दाने खळबळ माजवली आहे. Cannibalism म्हणजे स्वजातीचे भक्षण करणे.

By युयुत्सु, 8 February, 2026

डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
==============

--राजीव उपाध्ये

चीनच्या अधोगतीची स्वप्ने बघणार्‍या आणि त्यावरून माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची मला अधूनमधून आठवण येते. त्याने माझ्याशी भांडण केल्याला आता २-२.५ वर्षे होऊन गेली असतील. मी त्याच्याकडे २-३ वर्षे मागितली होती. प्रत्य्क्षात चीनच्या पिछेहाटीचा कुठेही मागमूस पण दिसत नाहीये. सतत गोलपोस्ट हलवत राहायचं, लोकांची दिशाभूल करत राहायचं हा अशा ’समर्पित’ लोकांचा आवडता उद्योग असतो. आणि मग हे मंदबुद्धी लोक जेव्हा तोंडावर आपटतात तेव्हा "चीन मध्ये जाऊन राहा" असा एकच घोष चालू करतात. [*]

By प्रकाश घाटपांडे, 8 February, 2026

आतापर्यंत उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. मध्यंतरी "जानव्याची पॉवर" हा मिपावरील धागा अप्रकाशित झाला. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे.

By श्वेता२४, 7 February, 2026

प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता...

तरीही....

नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही
का होईना पोळी माझी गोल तरीही....

पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे..
अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही....

काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी...
तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही....

भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय
म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही....

कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी
का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही....

By गणेशा, 6 February, 2026

मी:
शेवटचं तुला भेटायचं राहून गेलं,
स्वप्नच तू, जगायचं राहून गेलं...
चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ,
त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं...

ती:
अंतरातले अंतर मोजताना,
अंतर काही संपत नाही… (२)
अंतरात माझ्या पाहताना,
अंतर तुला तिथेही नाही.

मी:
माळले नवकिरणांनी नभाचे हार,
रात्रीस बिलगायचं, शेवटचं राहून गेलं...
बांधले नजरेचे पूल या डोळ्यांनी,
तुझ्यासवे शेवटचं चालायचं राहून गेलं...