By आजी, 18 February, 2026

हेलनसारखा नाच मी करु शकत नाही. अगदी जयश्री गडकर सारखाही नाही. पण तिच्यासारखं न नाचूनही मध्यंतरी माझी कंबर लचकली. दुखायला लागली. मी व्हाटस् ॲप वर लग्गेच ते सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना कळवलं. मग लगेच सूचना सुरू झाल्या
"चोळ,शेक,अमुक पेन किलर घे. तमकं क्रीम लाव. पडून राहा. विश्रांती घे."
काहीजणांनी विचारपूस केली. "काही जड वस्तू उचललीस का? फार वेळ खाली वाकून काही केर पोछाचं काम केलंस का?" (ही असली कामं सुनेला करायला सांगत जा."असा सल्लाही काहीजणांनी दिला.)

By kvponkshe, 18 February, 2026

२००३ ते २००६ मी भूगाव पुणे येथे एका लिमिटेड कंपनीत प्रोडक्शन मध्ये इंजिनिअर म्हणून काम करत होतो. पगारवाढीसाठीचे डिस्कशन अगदी तोंडावर येऊन ठेपले होते. सोबत मार्च चे टार्गेट कम्प्लिट करायचे होते. आमची कंपनी ऍक्सेस कंट्रोल सिस्टम्स बनवायची. माझे काम PCB टेस्ट करणे, डिबग करणे, सिस्टिम नीट असेम्बल होतीये की नाही ते पाहणे आणि फायनल टेस्ट करून ती सिस्टिम QA ला देणे, आणि QA मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो दुरुस्त करून परत टेस्टिंग करून ती सिस्टिम QA ला देऊन मग फायनल पॅकिंग ला देणे असे होते.

By विवेकपटाईत, 17 February, 2026

नवरा: तुमच्या रोजच्या कटकटींमुळे मी त्रासून गेलो आहे. आत्महत्येचा विचार मनात येतो आहे.

बायको: "खुशाल कर, कुणी रोखले आहे तुला? पण लक्षात ठेव, लग्नात मला जन्म भर पोसण्याचे वचन दिले होते तुझी दोन लेकरं आहेत. त्यांचा उद्धारही तुलाच करायचा आहे.

नवरा: माझा कोट्यवधीचा विमा आहे, काही कमी पडणार नाही तुला.

बायको: तेवढ्या पैश्यांनी काही ही होणार नाही. ज्या मुलीच्या बापाने आत्महत्या केली आहे, तिला लग्नाच्या बाजारात खपविण्यासाठी भरपूर हुंडा द्यावा लागेल. मुलीचे लग्न करून ही जवाबदारी संपता नाही. त्यासाठी आठ-दहा कोटी लागतील.

By हेमंतकुमार, 16 February, 2026

शेवटची (मराठी) कादंबरी वाचली होती त्याला आता १३ वर्षे उलटून गेली होती. ती ग्रंथालयातून आणून आणि पान अन् पान न वाचता काहीशी उडतउडत संपवली होती. आयुष्याच्या त्या टप्प्यावर मनोमन वाटू लागलं होतं की आता कादंबरी व कथावाचन नकोस वाटतंय; कल्पिताचे दीर्घवाचन हा काही आता आपला प्रांत राहिलेला नाही. पुढे 2019मध्ये ग्रंथालय कायमचे बंद केले आणि तिथून पुढे दरवर्षी मोजकी पुस्तके विकत घेऊनच वाचतोय. ग्रंथालयातून पुस्तक आणताना माणूस निवडीबाबत काहीसा शिथिल असतो. परंतु पुस्तक विकत घ्यायचे म्हटल्यानंतर तो (अति) चिकित्सक बनतो !