पहिला संकेत : वल्ली यांनी अंदाज केल्याप्रमाणे ही एक शिकार कथा आहे. पण मला नेमके पुस्तक आणि त्यातील कथा कोणती याची अपेक्षा आहे...यातच दुसरा संकेत आला की हा एक कथा संग्रह आहे :)
दुसरा संकेत : वल्ली यांनी पहिल्या प्रयत्नात लेखक ओळखला आहे. पुस्तकाचे नाव आणि त्यातली नेमकी कथा वाचकांनी ओळखणे अपेक्षित
या वेच्याचे पहिले विजेते आहेत स्पिन डॉक्टर.
आणि दुसरे विजेते आहेत वल्ली
वेच्याचे उत्तरः
पुस्तकाचे नाव : कुमाऊंचे नरभक्षक
लेखक : जिम कॉर्बेट
अनुवादः डॉ. सुभाष भेंडे
पान क्रमांक : ९१
कथेचे नाव : पोवळगडचा ब्रह्मचारी
पुनर्मुद्रण : सहावे (२००४)
वेचा:
-------------------------------------------------
सेमूल वृक्षानजीक पोचताच झाडोरा विरळ झालेला दिसला. जवळच सुकलेल्या पानावर वजन देऊन बसल्याप्रमाणं पोकळी निर्माण झालेली होती आणि त्यांवर रक्ताचे ताजे व वाळलेले, क्वचित थिजून गेलेले डाग दिसत होते. मी जमिनीला हात लावून पाहीलं. ती जागा अजून उबदार होती. खरोखरी, सारंच अजब होतं! आदले दिवशी मी शंभर काडतुसं व्यर्थ दवडली, परंतु वाघोबा ढिम्म या जागेवरुन हलले नव्हते आणि आता मात्र आम्हांला व म्हशींना दुरुन येत असल्याचे पाहून तो तिथून पुढं सटकला होता. म्हशींना रक्ताचा वास लागला होता आणि नाकाड टेकवून त्या जमीन हुंगत होत्या. हल्ला करायला अधीर झालेला वाघ आणि क्षुब्ध म्हशी यांच्यामध्ये सापडून अडचणीत येण्याचा माझा विचार नव्हता. म्हणून मी सोबत्याचा हात पकडून त्याचा मोहरा विरुद्ध बाजूने वळवला आणि म्हशींसह आम्ही उघड्या मैदानावर आलो. सुरक्षित ठिकाणी पोचल्यावर मी त्याला घरी जायची सूचना केली. दुसरे दिवशी मी त्या ठिकाणी परतून वाघाचा एकट्यानें समाचार घेईन असं त्याला सांगून टाकलं.
घराकडून या जागेकडे येताना व तेथून घरी परतताना मी ज्या रस्त्यावरुन ये जा करत होतो त्या रस्त्याचा काही भाग भुसभुशीत होता.
चौथ्या दिवशी मी वाघाची पावलं भुसभुशीत मातीत उमटलेली पाहिली. माग काढत पुढं आल्यावर सेमूल वृक्षाच्या उजवीकडे तीनशे फुटांवर असलेल्या दाट झाडींत वाघ शिरला असल्याचं मला आढळून आलं.
इथं एक अनपेक्षित गुंतागुंत माझ्या ध्यानात आली.....
-------------------------------------------------