भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली ऑगस्ट २०१०
किंमत
370.00
पृष्ठसंख्या
376

या पुस्तकाच्या मलपृष्ठावरुन साभार:-
""गुलाम' हा शब्द अलीकडे आपण फक्त पत्ते खेळताना वापरतो; पण कित्येक शतकं या शब्दानं मानवतेची निव्वळ थट्टा केल्याचा जागतिक इतिहास घेतला, की त्या शब्दामागची दाहकता आपल्याला समजेल.

पुराणकाळापासून ते आजपर्यंतच्या गुलामगिरीच्या भीषण, दारुण, करुण, अमानवी, जुलमी, महाभयंकर, अत्याचारी इतिहासाची ही सुन्न करणारी सनसनाटी कहाणी आहे. त्यात मानवानं अतिशय क्रूरपणे वागल्याचे असंख्य दाखले तर आहेतच, तसंच लोकांना त्यांच्या वर्णावरून दुय्यम ठरवून त्यांच्यावर जाणीवपूर्वकरीत्या आणि संघटित प्रयत्नांतून गुलामगिरी लादायची, त्यांना त्यातच खितपत पडून राहावं लागेल, याची व्यवस्था करणारे वर्चस्ववादीही आहेत.

जनावरांपेक्षा भयानक स्थितीतल्या या गुलामांच्या चळवळींना आणि लढ्याला सलाम करणारी, अमेरिकेच्या वरवरच्या झगमगाटाचा बुरखा फाडून त्यातले भीषण कंगोरे दाखविणारी आणि म्हणूनच बराक ओबामांसारखा कृष्णवर्णीय माणूस या जगातल्या सगळ्यात बलाढ्य देशाचा सर्वोच्च नेता बनल्यावर त्याला सलाम करणारी, अशी ही सफर आहे."