गुरुजींनी दुखर्या अंगानं उन्हाळा काढला. मृग संपला. यंदा पाऊसकाळ चांगला होता. भाताची पिकं नेटाला लागली होती. उसाच्या मळ्यात पाटकी-पलाणी समढम होऊन वाहत होत्या. रिपरिप पाऊस पडायचा आणि अनेक खोपटं गळायची. पुढच्या वर्षी पक्की घरं बांधायची अशी सालाबादगत माणसं बोलायची. उसाच्या मळ्यातला गारठा बांध ओलांडून गावठाणात घुसायचा. गावठाण काकडून जायचं. गुरुजींनी आयुष्यभर तालुक्याला-जिल्ह्याला अनेक खेटा मारलेल्या. जन्माची दगदग करून घेतलेली. तीच म्हातारपणी उबदारी आलेली. त्यांचं अंग दुखायचं आणि काकडून आकडायचं. शेवंती चुलीच्या पोटात शेणी धुमत ठेवायची. चुलीपुढं गुरुजी धगाला पडायचे, तरी अंगातला गारठा पळायचा नाही. न्याहारीपर्यंत गुरुजी चुलीजवळच वैलासारखे बसून राहायचे. पुन्हा भाळ मारून म्होरच्या सोप्याला यायचे. ओघळणार्या पागोळ्या बघायचे. गावठाणात जागोजाग डबकी साचलेली. डासांचा धिंगाणा सुरु असायचा. माजलेल्या पिसवा गुरांना चटाचटा चावायच्या. रात्री आड्याकडं बघीत गुरुजी वाकळेवर पडले की बाहेरून बेडकांचं डराव डराव गाणं ऐकू यायचं. ऊस पाऊसवार्यात कडाकडा वाजायचा. इठलाईचा आंबाही चळ लागल्यासारखा फांद्या हलवीत नाचायचा. गुरुजींना काही खरं वाटत नव्हतं.
संकेत १. मराठीतील ही एक माईलस्टोन कादंबरी बहुतेक पुविकरांनी वाचलेली असावी.
संकेत २. लेखकाने अगदी मोजक्याच कादंबर्या लिहिल्या आहेत पण ठराविक साच्यात अडकून न पडता.
संकेत ३: लेखक कदाचित मराठीतील सर्वाधिक मानधन घेणारे लेखक आहेत. मध्यंतरी एका पुस्तकाच्या निमित्ताने(अधिक मानधनासाठी) त्यांनी नेहमीचे प्रकाशक सोडून मराठीतील दुसर्या चमचमत्या प्रकाशकाकडे मोर्चा वळवल्यावर बरीच चर्चा झाली होती.
संकेत ४: वेच्यातील गुरुजींचे नाव खैरमोडे गुरुजी आहे.
सागरचे अभिनंदन पुस्तकाचे अचूक उत्खनन करून वेच्याचा पहिला विजेता झाल्याबद्दल. :)
श्रावण मोडक, मणिकर्णिका आणि देवेंद्र प्रभुणे यांनी पण पुस्तक अचूक ओळखले आहे तेव्हा त्यांचेही अभिनंदन.
आता उत्तर जाहिर करत आहे.
पुस्तक - झाडाझडती
लेखक - विश्वास पाटील
पान नं - ४०८
वेच्याची छान निवड
हे पुस्तक ओळखू शकेन असे वाटते आहे.
वाचले आहे, पण मेंदूवर ताण द्यावा लागेल. प्रयत्न करतो आहेच.
पण वेचा खूप आवडला हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद :)
उत्तर कळकवले (कळफलकाच्या साहाय्याने टंकवले) आहे
घुमा देनेवाला वेचा असेच म्हणेन मी या वेच्याबद्दल....
ही कादंबरी जबरदस्त आहे यात काहीच शंका नाही. अगदी माईलस्टोन असेच म्हणता येईल या कादंबरीबद्दल :)
In reply to उत्तर कळकवले (कळफलकाच्या साहाय्याने टंकवले) आहे by सागर
येस्स
ही कादंबरी न वाचलेला निदान पुविवर तरी विरळाच.
आता पुढच्या वेच्याची जबाबदारी तुझी. :)
In reply to येस्स by वल्ली
डन् नक्की देईन
वेचा मी देईनच.
पण देवेन्द्र च्या प्रश्नमंजुषेचा निकाल जाहीर व्हायची पण वाट बघतो आहे :)
पुढचा वेचा मी नक्की देईन.
हे पुस्तक जबरदस्त आहे. नथिंग टू से ... अगदी असेच
ज्यादाचे
आणखी संकेत वर दिले आहेतच. त्यावरून लेखक आणि पुस्तक हुडकणे फारसे अवघड जाउ नये. लागलेच तर अजून संकेत देईनच.
फार उशीरा वेचा पाहिला
फार उशीरा वेचा पाहिला
वाचायचे राहिलेले.....
विश्वास पाटील........ इच्छा असूनही, अजूनही, वाचायचे राहिलेले एक लेखक!
In reply to वाचायचे राहिलेले..... by चित्रा राजेन्द…
पानिपत नाही वाचले????
चित्रा,
या लेखकाची पुस्तके सुंदरच आहेत हे जरी असले तरी 'पानिपत'कार अशी बिरुदावली मिळालेल्या विश्वास पाटील यांची किमान पानिपत तरी तू वाचलेली असावीस असे वाटले होते
`क'ची मालिका.....
सागर,
हीच तर गंमत आहे. इथे `पुवि'वर आल्यापासून जाणवते आहे की, मी न वाचलेले बरेच आहे. आणि रात्र थोडी सोंगे फार... ह्यानुसार `कधी, काय, किती, कसे' वाचायचे ह्या `क'च्या (त्या एकता कपूरप्रमाणेच का? कुणास ठाऊक!!!) मालिकेत गुरफटते आहे....
In reply to `क'ची मालिका..... by चित्रा राजेन्द…
+१ असेच म्हणतो
थोड्या फार फरकाने माझी ही तीच अवस्था आहे :)