मित्रांनो,
विलंबासाठी क्षमस्व!
उत्तरे गुरुवार रात्री पर्यंत पाठवावीत.
---चला फार आनंद झाला.
अतिशय उत्तम व दर्जेदार प्रतिसाद आहेत.
पण,
HATS OF TO SAAGAR(छे,ज्ञानसागर!)
व मणिकर्णिका ताई__--!
सागर्-परीपुर्ण १०,लगे रहो,भाई!
ताई-उत्क्रुष्ट -७
चित्राताई-५,वल्ली-४,मेघनाताई-३.५
१.समुद्काठची रात्र हा कोणत्या प्रसिद्ध कवीचा कथासंग्रह आहे?(किंवा समुद्रकिनार्या वरची रात्र)
बा.भ्.बोरकर
२."लाट" हे कोणत्या दिवंगत आधुनीक विचारवंताचे ललित लेखन आहे?
हमीद दलवाई(मित्रा सागर्,जबरदस्त् उत्तर दिले तु!)
३.काशीनाथ घाणेकरांची दोन चरित्रे कोणती?
नाथ हा माझा व ----आणि डा.काशिनाथ घाणेकर
४."ऐसी कळ्वळ्याची जाती" ह्या नावाच्या दोन पुस्तकांचे लेखक कोण/
ना.धों.महानोर व सुभाश भेंडे
५.मराठी काव्यात हायकु हा प्रकार कोणी आणला?
शिरिष पै
६.अज्ञात झरयाच्या काठी/रात्री हे अप्रतीम पुस्तक कोणी लिहिले आहे?
-अरुणा ढेरे
७ कलंदर ह्या टोपणनावाने लेखन करणारॅ कोण?
-अशोक जैन
८.कोणत्या अतीप्रसिद्ध साहित्यिकाने नाव नसलेल्या (फक्त क्रमांक असलेल्या)
कादंबरया लिहिल्या?
-विजय तेंडुलकर
९भ यंकरसु दरम राठी भाषा हे पुस्तक कोणाचे?
-द्.दि.पुंडे(अवश्य वाचा,मित्रांनो!)
१०."गीतभान" हे विविध कवींचा धांडोळा घेणारया पुस्तकाचे
लेखक कोण्?(हे एका वेगळ्या कारणासाठी सुप्रसिद्ध आहेत)
-रमेश तेंडुलकर्(सचिनचे पप्पा!)
*पुढ्ची प्रश्नमंजुषा परवा,शनीवारी*(जरा हटके व घुंमावदार!)*
सर्वांचे अभिनंदन व हार्दिक आभार,*
चला मंडळी,
पाठवा उत्तरे!
काही शंका असल्यास अवश्य विचारा.
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.
व्यनि
व्यनि केला आहे. किमान ४/५ प्रश्नांची उत्तरे तरी बरोबर असावीत.
उत्तरे........
कृपया व्यनि वाचावा!!!!
उद्यापासून चार-पाच दिवस बाहेरगावी जात आहे. जेवढी माहिती आहेत तेवढी उत्तरे पाठवली आहेत. निकाल आल्यावर बघेन. ह्यावेळी थोडेतरी जमले असे वाटले...........
व्यनि केला आहे.
प्रिय मित्र देवेन्द्र,
व्यनि केला आहे.
२-३ चुकलेली असू शकतील. :)
सागरचे अभिनंदन
देवेंद्र मित्रा, खरे आहे. सागर नव्हेच, ज्ञानसागर. १० पैकी १० अचूक उत्तरे म्हणजे गंमत नाही. :)
मणिकर्णिका यांचेही अभिनंदन.
विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या कादंबर्या कुठल्या आहेत? त्यांनी फक्त नाटके आणि कथाच लिहिल्यात असे समजत होतो आतापर्यंत.
सागर व मणि अभिनंदन!
सागर व मणि अभिनंदन!
(ज्ञान) सागरा - अभिनंदन
१० ही उत्तरे अचूक देणे म्हणजे वाचनाची 'खोली' पण तितकीच पाहीजे.
अवांतर - तेंडुलकरांची 'कादंबरी एक' ही एकच 'नंबराची' कादंबरी माहिती आहे, अजूनही आहेत का?
कादंबरी २
दुसरी कादंबरी 'कादंबरी २'
अभिनंदनाबद्दल आभार
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
तुम्ही माझे अभिनंदन केलेत त्याबद्दल मनापासून आभारी आहे.
मी उत्तरे देऊ शकलो तरी तितका पात्र आहे असे मला मुळीच वाटत नाही.
उलटपक्षी माझे परमस्नेही देवेन्द्र यांचे अभिनंदन करणे जास्त गरजेचे आहे.
कारण त्यांच्या प्रश्नमंजुषेमुळे वाचकाच्या गंज चढलेल्या बुद्धीला धार देण्याचे अतिशय मोलाचे कार्य ते करीत आहेत.
काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्रांपैकी एकच ओळखता आले कारण तेच सर्वप्रसिद्ध आहे.
त्यामुळे त्या प्रश्नाचे अर्धेच उत्तर बरोबर आले होते. हे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो.
दुसरे एक असे की उत्तरे आली असली तरी वाचनाची तेवढी खोली मात्र माझी आहे असे मलाही वाटत नाही. अजून काही वर्षांनी ती थोडीफार येऊ शकेन
कारण वाचकाची खोली येण्यासाठी एक 'तप'श्चर्या लागते हे अगदी खरे आहे. एक तप (१२ वर्षे) वाचन केल्यावर थोडीफार खोली नक्की प्राप्त होईन. मी जरी गेली २४-२५ वर्षे वाचन करत असलो तरी त्यात सातत्याचा अभाव असल्याकारणाने नंदन, देवेन्द्र, टण्या, यशोधरा, चित्रा, मणि व इतर अनेक सदस्यांएवढे वाचन होण्यास अजून अवकाश आहे. माझा येथील अजून एक परममित्र वल्ली याचे वाचनही चतुरस्त्र आहे. असे असले तरी त्याला व मला तुम्हा सर्वांएवढे वाचन करण्यास अजून बराच वेळ जाईन असे दिसते
पुन्हा एकदा सर्वांचेच आभार :)