Submitted by देवेन्द्र प्रभुणे on
वल्ली

एकदम वेगळा प्रकार पाहून खूपच आनंदित झालोय. शक्य तेव्हढ्या प्रश्नांची उत्तरे व्यनिद्वारे देईनच. पाहू कितपत जमते ते.

Thu, 24/03/2011 - 21:37 Permalink
सागर

देवेन्द्र,

मित्रा काय हे झकास कोडे घातलेस.
सगळे प्रश्न एकसे बढकर एक आहेत :)

प्रयत्न करतोच आहे विरोपवून. सगळे येणार नाहीत एवढे नक्की

१० वा प्रश्न नक्की कळाला नाही.
१०.खास सु.शि.प्रेमीं साठी-हुच्च केणे च्या प्रकाशन संस्थेचे नाव काय?

यात हुच्च केणे हे कोणा व्यक्तीचे नाव आहे का पुस्तकाचे नाव आहे?
असे काही वाचल्याचे आठवत नाहीये :(

Fri, 25/03/2011 - 16:52 Permalink
देवेन्द्र प्रभुणे

मित्रांनो,
धन्यवाद!
सु.शिं.च्या एका प्रकाशन व्यवसायावर आधारित अप्रतिम कथे मध्ये अविस्मरणीय हुच्च हे पात्र
भेटते.
निश्चित वाचा,मित्रांनो!
(मला "हुच्च" हे नाव इतके आवडले की,माझ्या लाडक्या कुत्तु चे नाव ठेवले होते).
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.

Fri, 25/03/2011 - 19:02 Permalink
वल्ली

व्यनि केलाय पण या प्रश्नमंजुषेच्या निमित्ताने माझे साहित्यविषयक ज्ञान किती तोकडे आहे याची जाणीव होतेय. :(

Fri, 25/03/2011 - 22:48 Permalink
वाचक

माझ्याबाबतीत तर ज्ञानच नाहीये अशी परिस्थिती दिसते आहे, २/३ प्रश्नांची जेमतेम उत्तरे माहिती आहेत असे वाटते पण त्याचीही खात्री नाही.
प्रभुणे
तुम्हाला सु शी पुस्तकांची एवढी माहिती दिली त्याचा हा असा बदला घेता होय ? :) :)

Sat, 26/03/2011 - 04:14 Permalink
देवेन्द्र प्रभुणे

मित्रांनो,
अतीव धन्यवाद!
कदाचित्,प्रश्न्मंजुषा हा नवीन प्रकार असल्यामुळॅ असेल,
आपणास ती कठिण वाटत असेल.
असो.आपण प्रयत्न करा.उत्तरे मिळ्तीलच.
वाचकभाऊ,
अहो,बदला कसा घेईन?
आपण एकाच नावेचे प्रवासी!
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.

Sat, 26/03/2011 - 07:46 Permalink
वल्ली

देवेंद्र एक सूचना.
प्रश्नमंजुषा 'चर्चा' प्रकारात न टाकता जर 'पुस्तककोडे' प्रकारात टाकली गेली तर पुढे ट्रॅक करायला सोपे जाईल असे वाटते.
तेव्हा सूचनेचा जरूर विचार व्हावा.

Sat, 26/03/2011 - 19:24 Permalink
देवेन्द्र प्रभुणे

मित्रांनो,
प्रतिसादाबद्दल व उत्साहबद्दल आभार!
असाच लोभ राहु द्यावा.
सुचना व प्रतिक्रियेंचे हार्दिक स्वागत!
उत्तरे व विजेते जाहीर केले आहेत.
पुढची प्रश्नमंजुषा-मंगळ्वारी,अद्ययावत मराठी पुस्तकां वर!
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.

Sun, 27/03/2011 - 20:16 Permalink
वल्ली

धन्यवाद देवेंद्र. नवा प्रकार फारच आव्हानात्मक होता.
१० पैकी निदान ३ उत्तरे तरी बरोबर देउ शकलो यातच आनंद आहे. पण यापेक्षाही जास्त आनंद म्हणजे साहित्यविषयक अनेक माहित नसलेल्या गोष्टी समजल्या याचा.

दोन गोष्टी-
हुच्च केणे-तिकडम प्रकाशन 'थोडक्यात असं' मधलंच आहे ना?
आणि
जी.एं. नी साहित्य अकादमी पुरस्कार नाकारण्यामागचे कारण काय?

असो,
दुसर्‍या प्रश्नमंजुषेची उत्सुकतेने वाट पाहतो आहे हे वेगळे सांगणे न लगे.

Sun, 27/03/2011 - 20:58 Permalink
देवेन्द्र प्रभुणे

In reply to by वल्ली

तिकडम प्रकाशन हे "थोडक्यात असे" मधिल नाही, मित्रा!
हे एक कथे मध्ये येते.
"काजळमाया" च्या प्रकाशन वर्षाबाबत वाद उपस्थीत करण्यात आले.
अगोदरच्या वर्षी प्रकाशित पुस्तकासाठी पुढ्च्या वर्षी चा पुरस्कार मिळाला,असा
गहजब झाला.
अर्थात यात तथ्यांश काही नव्हता,हे ही खरेच!
व्यथित मनाने जी.एं.नी पुरस्कार नाकारला.
-देवेन्द्र प्रभुणे,यवतमाळ.

Sun, 27/03/2011 - 21:25 Permalink
वल्ली

In reply to by देवेन्द्र प्रभुणे

बरोबर.
हुच्च केणे-तिकडम प्रकाशन 'कथापौर्णिमा' संग्रहात वाचलेले आहे.

Mon, 28/03/2011 - 08:23 Permalink
सागर

यातले जवळपास काहीच आले नाही :(

पुढच्या कोड्याच्या वेळी चांगला अभ्यास करावा लागेन असे दिसते आहे :)

कन्सेप्ट मनापासून आवडली देवेन्द्र.

पुढच्या प्रश्नमंजुषेची आतुरतेने वाट पहात आहे...

Mon, 28/03/2011 - 13:43 Permalink
चित्रा राजेन्द…

देवेन्द्र,
तुम्ही आभिनंदन केलेत त्याबद्दल धन्यवाद!
ह्या प्रश्नमंजुषेमुळे काही गोष्टी अर्धवट माहिती होत्या. त्या आता पूर्णपणे नीट ठाऊक झाल्या.

Mon, 28/03/2011 - 15:48 Permalink

मित्रांनो,
विजेते आहेत-मणीकर्णीका
व चित्रा राजेंद्र---
अभिनंदन!!
सागर्,वल्ली व टेण्या यांचे आभार!
पुढील प्रश्नमंजुषेसाठी तयार राहा.(अधिक प्रतिसादांच्या खात्रिने!)
एक नवे धाडस! प्रश्नमंजुषा ! शनीवार रात्री पर्यंत उत्तरे संदेशाद्वारे पाठवावीत. उत्तरे व विजेते रविवारी जाहीर करेन.

  1. "सानिया" ह्यंचे मूळ नाव काय?
  2. सुनंदा कुल़कर्णी-बलरामक्रूर्‍ष्णन

  3. "उंबरठा" चित्रपट कोणत्या कांदबरी वर आधारीत होता?
  4. बेघर्-शांता निसळ

  5. तांबडी माती व पाणी ह्या कांदबं-यांचे लेखक कोण?
  6. बा.सी.मर्ढेकर

  7. साहित्य अकादमी चा पुरस्कार नाकारणारे लेखक कोण्?पुस्तकाचे नाव काय?
  8. जी.ए.कुळ्कर्णी-काजळ्माया

  9. अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले एकमात्र पती-पत्नी कोण?
  10. आ.रा.देशपांडे,कुसुमावती देश्पांडे

  11. मेलडी/melody हा काव्यसंग्रह कोणाचा?
  12. भालचन्द्र नेमाडे

  13. एका प्रथितयश लेखिकेने/विदुषीने केवल एका झाडावर आधारीत मोठे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचे नाव व लेखिका कोण?
  14. कदंब्-दुर्गा भागवत

  15. तीन वेगळ्या नावांनी तीन साहित्य प्रकार हाताळ्लेले साहित्यिक कोण?
  16. राम गणेश गडकरी,गोविन्दाग्रज,
    बाळकराम्(तीन नावे,तीन साहित्य प्रकार्.अत्रेंनी दोन प्रकार हाताळले.तसे,मालतीबाई बेडेकरंनी गद्य प्रकारच हाताळ्ले,तीन नावांनी!)

  17. सर्वात जास्त मराठी पुस्तके लिहिण्याचा विक्रम कोणाच्या नावे आहे?
  18. बाबुराव अर्णाऴकर

  19. खास सु.शि.प्रेमीं साठी-हुच्च केणे च्या प्रकाशन संस्थेचे नाव काय?
  20. तिकडम प्रकाशन

हा पहिलाच प्रयत्न आहे. पुढ्ची प्रश्नमंजुषा अद्ययावत मराठी पुस्तकांवर आधारीत असेल्.गुरुवार ठरला तर!
आपल्या सहभागाची अपेक्षा व खात्री!

-
देवेन्द्र प्रभुणे,
यवतमाळ.