Submitted by निखिल देशपांडे on
आरागॉर्न

राजीव गांधींच्या सहवासात - राम प्रधान
टीचर - सिल्व्हिया अ‍ॅश्टॅन-वॉर्नर : अनुवाद अरूण ठाकूर

अवांतर : अ‍ॅ का गंडतो?

Wed, 23/02/2011 - 12:06 Permalink
वल्ली

एस. एल. भैरप्पांचे 'पर्व' हातात घेतलेय.
पर्वच्या महापुरात नुसता वाहून जातोय. वाचकाला खिळवून ठेवणारी भैरप्पांची ताकदवान लेखनशैली आणि तिचा तितकाच समर्थ असा उमा कुलकर्णींचा मराठी अनुवाद.

Sat, 12/03/2011 - 08:51 Permalink
सागर

In reply to by वल्ली

वल्लीशी थोडी चर्चा झाली तेव्हा मलाही वाटले की पर्व वाचूयात.
पर्व वाचून झाल्यावर पुढे केव्हातरी पर्व च्या अनुषंगाने चर्चा करत येईल म्हणूनही सध्या वाचायला घेतली आहे
भैरप्पांनी 'पर्व' च्या माध्यमातून महाभारताचे जे चित्रण वाचकांसमोर ठेवले आहे त्याला तोड नाहीये.
हे माझे 'पर्व'चे तिसरे वाचन :)

Sat, 12/03/2011 - 11:16 Permalink

सध्या काय वाचताय? (भाग २) बराच मागे गेलाय. आणि मधल्या काळात सगळ्या मित्रांनी भरपूर खरेदीचे धागे टाकले. ( जळजळ दुसरे काय. ;)) त्यातले काय काय वाचून झाले हे जाणून घेण्यासाठी काढलेला हा धागा.

अशात ऑफिसमधे कामाचा व्याप वाढल्यामुळे वाचायला वेळ काढावा लागत आहे. तरी जसा वेळ मिळेल तसे काहीतरी वाचायचा प्रयत्न करत आहेच. मध्यंतरी अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी लिहिलेले गुलाम हे पुस्तक हातात पडले. अच्युत गोडबोलेंच्या इतर पुस्तकात जसा एखाद्या विषयाचा आढावा घेतलेला असतो तसा याही पुस्तकात गुलामगिरीचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. अगदी सुरवातीला गुलामगिरीच्या सुरूवातीपासून ते अगदी नव्वदीच्या दशकात दक्षिण आफ्रिकेत चालु असलेल्या गुलामगिरीचा इतिहासच मांडलेला आहे. पुस्तकाचा बराचसा भाग हा अमेरिकेतली वर्णद्वेषातून अभारलेल्या गुलामगिरीचा आणि त्या अनुषंगाने अमेरिकेचा इतिहासच सांगतो. एकुणच पुस्तक एकदा वाचावे असे नक्कीच आहे.