स्नेहश्री,
तुझ्या मैत्रीणीला सासूबाईंना भेट देण्यासाठी अगदी मस्त पुस्तक सुचले आहे.
ही कादंबरी गौरी देशपांडेंनी वेगळ्या घाटात लिहिलेली आहे. मां आणि वसुमती ह्या सासू-सुनेच्या निवेदनांतून कथानक उलगडते.
कुटुंब केवळ रक्ताच्या नात्यानं तयार होत नाही. परस्परांच्या हितचिंतनातून, त्यासाठी केलेल्या कृतींतून आणि त्यातून निर्माण झालेल्या स्नेहातून नाती घडत असतात. असा ह्या पुस्तकाचा सारांश आहे. खास गौरी देशपांडे बाजातील ही कादंबरी वाचनीय आहे.
सुरुवातीला एकमेकींबद्दल मनात असणारी अढी, त्यानंतर नाईलाजाने जमवून घेणं- कर्तव्यबुध्दीने वागणं आणि सहवासातून निर्माण झालेली आपुलकी हे सारे टप्पे छान रंगवले आहेत.
~ चित्रा, मला नेमकं हेच लिहायचं होते.....'सून' असे जमवून घेईल....पण स्नेहश्रीच्या मैत्रिणीच्या सासुबाईनी असा जर ग्रह करून घेतला की, हिने मला 'जमवून घ्यावे कसे...' हे शिकविण्यासाठी 'गोफ' भेट दिली आहे का?...तर ताणतणाव मल्टीप्लाय होण्याची शक्यता आहे. (तुझ्या प्रतिसादातील "सहवासातून निर्माण झालेली आपुलकी..." हे छान आहे, पण प्रोव्हायडेड ती 'नाईलाजास्तव'ची क्यूब वापरली नाही तर...)
त्यासाठी त्यानी (पक्षी : मैत्रिणीने) प्रथम गोफ वाचणे गरजेचे आहे.
तुमच्या मैत्रिणीचा 'गोफ' हाच अंतिम निर्णय असेल तर ठीक आहे; पण गौरी देशपांडे यांच्या लिखाणाची (तसेच त्या मांडत असलेल्या अनुभवाची धाटणी) समस्त स्त्री वर्गाला पसंत पडेलच असे नाही...त्यातही 'सासुबाईं'. 'गोफ' ही कादंबरी तर सासू आणि सून या पिढ्यानपिढ्या "तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून राहवेना...' अशा नातेसंबंधावर आधारित आहे, हे लक्षात असू द्या. हळुवारपणे याचे कथानक (म्हणजेच सासू+सून यांचे स्वतंत्र असे भावविश्व) फुलत जाते आणि जीवनाबद्दलचे प्रत्येकीचे आकलन गौरी देशपांडे यानी अत्यंत समर्थपणे मांडले आहे.
इतपत सांगण्याचा हेतू हाच आहे की तुमच्या मैत्रिणीच्या सासुबाईंना आपल्या सुनेने 'गोफ' च का भेट दिली असा विचार पडला तर तो हेतू मैत्रिणीला सांगता आला पाहिजे....म्हणजेच दुसर्या शब्दात प्रथम त्यानी ही कादंबरी वाचावी, मग नक्की करावे की 'गोफ' द्यावी की अन्य एक.
इन्द्रा,
हे तुम्ही अगदी योग्य असेच सुचवलेत की आधी मैत्रीणीने `गोफ' समजून घेऊन मगच तो सासूबाईंना भेटीच्या स्वरूपात द्यावा. आणि देताना तो का द्यावासा वाटला हेदेखील स्पष्टपणे सांगावे. म्हणजे गैरसमजाला जागा उरणार नाही.
ह्यातून दिसते ते असे....
सासूला पुस्तक-भेट द्यावीशी वाटणे हे त्यांच्यातील (मैत्रीण व तिची सासू) प्रेमाचे व मोकळ्या संबंधांचे द्योतक वाटते.
पुस्तक देण्याबद्दल आणि दिलेले पुस्तक स्वीकारण्याबद्दल कोणतेच गैरसमज होत नसतात....होत असतील तर ते "लेखका" च्या नावावरून. दुसर्या बाजूने सांगायचे झाल्यास (अलिकडील) मराठी साहित्यातील गौरी देशपांडे, सानिया, मेघना पेठे आणि काही प्रमाणात कविता महाजन या स्त्री लेखिकांच्याबद्दल सर्वसाधारणपणे मतांचा असा प्रवाह आहे की या 'बोल्ड' लेखिका आहेत. हे अपसमज आहेत, पण ते आहेत हे मी जाणतो. त्याची कारणमीमांसा करण्याचे हे ठिकाण नव्हे.
माझी एक भाची व एक भाचा आत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षा समाप्तीनंतर मी त्याना काही पुस्तके द्यावीत असे त्यांच्या पालकांनी सुचविले आहे; जे मी मान्य केलेच आहे. असे असले तरी या दोघांना मी हॅरी पॉटर, रॉबिन्सन क्रुसो देईन पण गौरी देशपांडे यानी अत्यंत समर्थपणे अनुवाद केलेले 'अरेबियन नाईट्स' देऊ शकणार नाही....कारण उघड आहे.
आता प्रश्न असा आहे की स्नेहश्री मैत्रिणीच्या सासुबाईंना (त्या वाचक असतीलच, त्याशिवाय सून त्याना पुस्तक देण्याचा विचार तरी का करेल?) जर गौरी देशपांडे 'अरेबियन नाईट्स' मुळे परिचित असतील, तर 'गोफ' घेताना त्यानी तोच पूर्वग्रह मनी ठेवला तर? असे होण्याची शक्यता का, तर लेखक नामाचा महिमा.
इंद्रा, गैरसमज होत असतील तर ते "लेखका" च्या नावावरून......
मला वाटतं आपल्या विचारांच्या जडण-घडणीतच समज-गैरसमजांची मुळे आहेत.
`.... आणि राजा-राणी सुखाने नांदू लागले......' असे शेवट असलेल्या गोष्टी वाचायची सवय झालेल्यांना गौरी देशपांडे, सानिया, मेघना पेठे, कविता महाजन ह्यांच्याविषयी त्या `बोल्ड' आहेत असे वाटणे स्वाभाविक आहे.
`एकेक पान गळावया आणि नंतर....' डॉ. पुष्पलता राजापुरे तापस ह्यांनी लिहिलेलं गौरी देशपांडेंच्या ले़खनावरील हे समीक्षात्मक पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मनाची जडण-घडण अशी कशी होते हे माझं मलाच उलगडलं. `गौरी'चं लिखाण का आवडलं हे लख्खपणे जाणवलं.
स्नेहश्री, मैत्रिणीच्या सासुबाईंना वाचनाची आवड आहे का मुळात? बरं, असल्यास कशा प्रकारची पुस्तकं आवडतात हे तुमच्या मैत्रिणीला ठाऊक आहे का? तर, सासुबाईंच्या आवडीची पुस्तकं भेट म्हणून देणं अधिक उत्तम, जेणे करुन त्यांना ती वाचाविशी वाटतील आणि त्यांची आवड आवर्जून तुमच्या मैत्रिणीने जपली, ह्याचा आनंदही होईल. :)
कोणालाही भेट देताना ज्या व्यक्तीला भेट द्यायची तिची आवड निवड लक्षात घेणे अधिक संयुक्तिक वाटत नाही का?
तुम्हा सगळ्याना.. खुप खुप धन्यवाद.. त्या शाळेत शि़क्षिका आहेत. वरच्या सगळ्या प्रतिक्रिया वाचुन वाटले की त्यांनी नकारात्मक घेतले तर? मग मी तिला सजेस्ट केल की सरळ १ वर्षाचे लायब्ररीची मेंबरशीप त्यांना गिफ्ट म्हणुन दे..
तीने ऐकल.. तर सध्या दोघीही खुष....
पुवी फ्रेन्डस खरचं मनापासुन धन्यवाद.. :)
वेगळ्या घाटाची कादंबरी........
स्नेहश्री,
तुझ्या मैत्रीणीला सासूबाईंना भेट देण्यासाठी अगदी मस्त पुस्तक सुचले आहे.
ही कादंबरी गौरी देशपांडेंनी वेगळ्या घाटात लिहिलेली आहे. मां आणि वसुमती ह्या सासू-सुनेच्या निवेदनांतून कथानक उलगडते.
कुटुंब केवळ रक्ताच्या नात्यानं तयार होत नाही. परस्परांच्या हितचिंतनातून, त्यासाठी केलेल्या कृतींतून आणि त्यातून निर्माण झालेल्या स्नेहातून नाती घडत असतात. असा ह्या पुस्तकाचा सारांश आहे. खास गौरी देशपांडे बाजातील ही कादंबरी वाचनीय आहे.
सुरुवातीला एकमेकींबद्दल मनात असणारी अढी, त्यानंतर नाईलाजाने जमवून घेणं- कर्तव्यबुध्दीने वागणं आणि सहवासातून निर्माण झालेली आपुलकी हे सारे टप्पे छान रंगवले आहेत.
In reply to वेगळ्या घाटाची कादंबरी........ by चित्रा राजेन्द…
नाईलाज...!!
"...त्यानंतर नाईलाजाने जमवून घेणं..."
~ चित्रा, मला नेमकं हेच लिहायचं होते.....'सून' असे जमवून घेईल....पण स्नेहश्रीच्या मैत्रिणीच्या सासुबाईनी असा जर ग्रह करून घेतला की, हिने मला 'जमवून घ्यावे कसे...' हे शिकविण्यासाठी 'गोफ' भेट दिली आहे का?...तर ताणतणाव मल्टीप्लाय होण्याची शक्यता आहे. (तुझ्या प्रतिसादातील "सहवासातून निर्माण झालेली आपुलकी..." हे छान आहे, पण प्रोव्हायडेड ती 'नाईलाजास्तव'ची क्यूब वापरली नाही तर...)
त्यासाठी त्यानी (पक्षी : मैत्रिणीने) प्रथम गोफ वाचणे गरजेचे आहे.
इन्द्रा
In reply to नाईलाज...!! by इंद्रराज पवार
हा हा हा
परफेक्ट !!
सासू आणि सून...!
तुमच्या मैत्रिणीचा 'गोफ' हाच अंतिम निर्णय असेल तर ठीक आहे; पण गौरी देशपांडे यांच्या लिखाणाची (तसेच त्या मांडत असलेल्या अनुभवाची धाटणी) समस्त स्त्री वर्गाला पसंत पडेलच असे नाही...त्यातही 'सासुबाईं'. 'गोफ' ही कादंबरी तर सासू आणि सून या पिढ्यानपिढ्या "तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून राहवेना...' अशा नातेसंबंधावर आधारित आहे, हे लक्षात असू द्या. हळुवारपणे याचे कथानक (म्हणजेच सासू+सून यांचे स्वतंत्र असे भावविश्व) फुलत जाते आणि जीवनाबद्दलचे प्रत्येकीचे आकलन गौरी देशपांडे यानी अत्यंत समर्थपणे मांडले आहे.
इतपत सांगण्याचा हेतू हाच आहे की तुमच्या मैत्रिणीच्या सासुबाईंना आपल्या सुनेने 'गोफ' च का भेट दिली असा विचार पडला तर तो हेतू मैत्रिणीला सांगता आला पाहिजे....म्हणजेच दुसर्या शब्दात प्रथम त्यानी ही कादंबरी वाचावी, मग नक्की करावे की 'गोफ' द्यावी की अन्य एक.
इन्द्रा
In reply to सासू आणि सून...! by इंद्रराज पवार
द्योतक.....
इन्द्रा,
हे तुम्ही अगदी योग्य असेच सुचवलेत की आधी मैत्रीणीने `गोफ' समजून घेऊन मगच तो सासूबाईंना भेटीच्या स्वरूपात द्यावा. आणि देताना तो का द्यावासा वाटला हेदेखील स्पष्टपणे सांगावे. म्हणजे गैरसमजाला जागा उरणार नाही.
ह्यातून दिसते ते असे....
सासूला पुस्तक-भेट द्यावीशी वाटणे हे त्यांच्यातील (मैत्रीण व तिची सासू) प्रेमाचे व मोकळ्या संबंधांचे द्योतक वाटते.
नाम महिमा...!!
चित्रा....
पुस्तक देण्याबद्दल आणि दिलेले पुस्तक स्वीकारण्याबद्दल कोणतेच गैरसमज होत नसतात....होत असतील तर ते "लेखका" च्या नावावरून. दुसर्या बाजूने सांगायचे झाल्यास (अलिकडील) मराठी साहित्यातील गौरी देशपांडे, सानिया, मेघना पेठे आणि काही प्रमाणात कविता महाजन या स्त्री लेखिकांच्याबद्दल सर्वसाधारणपणे मतांचा असा प्रवाह आहे की या 'बोल्ड' लेखिका आहेत. हे अपसमज आहेत, पण ते आहेत हे मी जाणतो. त्याची कारणमीमांसा करण्याचे हे ठिकाण नव्हे.
माझी एक भाची व एक भाचा आत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षा समाप्तीनंतर मी त्याना काही पुस्तके द्यावीत असे त्यांच्या पालकांनी सुचविले आहे; जे मी मान्य केलेच आहे. असे असले तरी या दोघांना मी हॅरी पॉटर, रॉबिन्सन क्रुसो देईन पण गौरी देशपांडे यानी अत्यंत समर्थपणे अनुवाद केलेले 'अरेबियन नाईट्स' देऊ शकणार नाही....कारण उघड आहे.
आता प्रश्न असा आहे की स्नेहश्री मैत्रिणीच्या सासुबाईंना (त्या वाचक असतीलच, त्याशिवाय सून त्याना पुस्तक देण्याचा विचार तरी का करेल?) जर गौरी देशपांडे 'अरेबियन नाईट्स' मुळे परिचित असतील, तर 'गोफ' घेताना त्यानी तोच पूर्वग्रह मनी ठेवला तर? असे होण्याची शक्यता का, तर लेखक नामाचा महिमा.
इन्द्रा
In reply to नाम महिमा...!! by इंद्रराज पवार
जडण-घडण
इंद्रा,
गैरसमज होत असतील तर ते "लेखका" च्या नावावरून......
मला वाटतं आपल्या विचारांच्या जडण-घडणीतच समज-गैरसमजांची मुळे आहेत.
`.... आणि राजा-राणी सुखाने नांदू लागले......' असे शेवट असलेल्या गोष्टी वाचायची सवय झालेल्यांना गौरी देशपांडे, सानिया, मेघना पेठे, कविता महाजन ह्यांच्याविषयी त्या `बोल्ड' आहेत असे वाटणे स्वाभाविक आहे.
`एकेक पान गळावया आणि नंतर....' डॉ. पुष्पलता राजापुरे तापस ह्यांनी लिहिलेलं गौरी देशपांडेंच्या ले़खनावरील हे समीक्षात्मक पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मनाची जडण-घडण अशी कशी होते हे माझं मलाच उलगडलं. `गौरी'चं लिखाण का आवडलं हे लख्खपणे जाणवलं.
स्नेहश्री, मैत्रिणीच्या
स्नेहश्री, मैत्रिणीच्या सासुबाईंना वाचनाची आवड आहे का मुळात? बरं, असल्यास कशा प्रकारची पुस्तकं आवडतात हे तुमच्या मैत्रिणीला ठाऊक आहे का? तर, सासुबाईंच्या आवडीची पुस्तकं भेट म्हणून देणं अधिक उत्तम, जेणे करुन त्यांना ती वाचाविशी वाटतील आणि त्यांची आवड आवर्जून तुमच्या मैत्रिणीने जपली, ह्याचा आनंदही होईल. :)
कोणालाही भेट देताना ज्या व्यक्तीला भेट द्यायची तिची आवड निवड लक्षात घेणे अधिक संयुक्तिक वाटत नाही का?
In reply to स्नेहश्री, मैत्रिणीच्या by यशोधरा
सहमत
सहमत :)
हाय..