वाटेवरले सोबती
साहित्यातील आवडलेल्या व्यक्तिरेखांविशयी लिहिलेले ले़ख. उदा. `पाडस' मधील ज्योडी व पेनी हे पिता-पुत्र, माचीवरला बुधा, `कैरी' मधील तानीमावशी, इ.
वाटेवरले सोबती
साहित्यातील आवडलेल्या व्यक्तिरेखांविशयी लिहिलेले ले़. उदा. `पाडस' मधील ज्योडी व पेनी हे पिता-पुत्र, माचीवरला बुधा, `कैरी' मधील तानीमावशी, इ.
सोयरे सकळ
संगीत, साहित्य, कला आदी क्षेत्रातील प्रतिभावान, नामवंत व्यक्तींचा लोभ, स्नेह, सहवास लेखिकेला लाभला. त्यातल्या काहींची व्यक्तिचित्रे. भारतीय संगीतातले तीन दिग्गज मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, मातब्बर कथाकार जी. ए. कुलकर्णी, समीक्षक माधव आचवल, भाषाशास्त्रज्ञ ड्~ओ. ना. गो. कालेलक्र आदींची व्यक्तिचित्रे ह्यात आहेत.
मृगजळाची तळी
डॉन क्विक्झोट व त्याचा इतर साहित्यावर प्रभाव ह्या सूत्राभोवती लिहिलेल्या ललित लेखांचा संग्रह. त्याअनुषंगाने सर्वांतिस, दोस्टोव्हस्की, फ्लॉबेर, बिमल मित्र व जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या साहित्यकृतींचा घेतलेला धांडोळा.
आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वातही एक डॉन कसा लपलेला आहे हे ह्या लेखांतून लेखक विजय पाडळकरांनी दाखवले आहे. त्यानिमित्ताने साहित्य आणि जीवन ह्यातील संबंध अधोरेखित होतो.
किमया
`किमया' ही एक वाटचाल आहे. दैनंदिन जीवनातील रुक्ष व्यवहारी भूमिकेकडून, सौंदर्याने `फुली फुलून' आलेल्या विश्वाच्या उत्कट व संपन्न जाणिवेकडचा हा प्रवास आहे.......