कुमाऊंचे नरभक्षक
देवळाचा वाघ आणि कुमाऊंचे आणखी काही नरभक्षक
रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता
हॉरसशू क्रॅब्स अँड शोअर बर्ड्स
पुस्तक अतिशय रसाळ आणि ओघवत्या शैलीत लिहीले असून बाल तसेच कुमारवयीन मुलांना शिकण्याकरता बरेच मुद्दे आहेत. एक तर भाषा अप्रतिम आहे तसेच हॉरसशू खेकड्याचे संपूर्ण जीवनचक्र (लाइफ्-सायकल) सुरेख रीतीने उकलून दाखविले आहे. पुस्तकाची किंमत $६.९९ आहे. पाने ४० आहेत.पुस्तक सचित्र आणि संग्रहणीय आहे.
दुर्गभ्रमणगाथा
एका किल्ल्याच्या कुशींत जन्मलेला एक गडवेडा माणूस जन्मभर किल्ले भटकला किल्ल्यांएवढे प्रेम त्याने कशावरही केले नाही.
दरदर झरत्या पावसांत काकडत्या थंडीत भाजणार्या उन्हांत रात्रीं, दिवसां, पाहाटेंस, सायंकाळी तो किल्ले चढला-उतरला.
पांच तपे उलटून गेलीं किल्ल्यागडांचा वेध घेत तो त्यांच्या वाटा तुडवीत राहिला, कधीं आनंदाने थिरकला, कधीं प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेला असे त्याचे किल्ल्यागडांशी मैत्र
आयुष्याच्या सायंकाळीं क्षण स्वस्थ बसून तो तीं सगळीं स्मरणे जागवीत आहे.
दुर्गभ्रमणगाथा
एका किल्ल्याच्या कुशीत जन्मलेला
एक गडवेडा माणूस
जन्मभर किल्ले भटकला
किल्ल्यांएवढे प्रेम त्याने कशावरही केले नाही.
दरदर झरत्या पावसात
काकडत्या थंडीत
भाजणार्या उन्हांत
रात्री, दिवसां, पहाटेस, सायंकाळी
तो किल्ले चढला-उतरला.
पाच तपें उलटून गेली
किल्ल्यागडांचा वेध घेत
तो त्यांच्या वाटा तुडवत राहिला
कधी आनंदाने थिरकला,
कधी प्रमादाच्या पुराबरोबर वाहत गेला
असे त्याचे किल्ल्यागडांशी मैत्र
आयुष्याच्या सायंकाळी क्षण स्वस्थ बसून
तो ती सगळी स्मरणे जागवीत आहे.
एका रानवेड्याची शोधयात्रा
प्रा. मिलिंद वाटवे यांच्या संशोधनात मदत करण्यासाठी त्यांनी नेमून दिलेले काम करण्यला लेखक जंगलात गेले होते.हे पुस्तक म्हणजे लेखकाला तेव्हा आलेल्या जंगलातील अनुभवांची गाथा आहे. ही एक शोधयात्रा आहे. हा शोध केवळ जंगलाचा नाही, जंगल आणि मानव यांच्या नात्याचा आहे. तसेच लेखकाचा स्वत:चा शोध आहे.
या पुस्तकात जंगलातील वैशिष्ट्यपूर्ण अशा छायाचित्रांचा समावेश आहे. मुखपृष्ट आणि सजावट पण कलात्मक असल्यामुळे त्याची या पुस्तकाच्या आकर्षकेत भर पडली आहे.
भारतीय पक्षी
डॉ. सलिम अली व सहलेखिका लईक फतेहअली या दोन पक्षीप्रेमींची मौल्यवान भेट. भारतातील पक्ष्यांची माहिती मिळवण्यासाठी परकीय लेखकांच्याच्या पुस्तकांवर अवलंबून रहाण्यापेक्षा आपल्या भारतीयाचे हे पुस्तक खूप नवी आणि एकत्रित माहिती देते.
रा. वि. सोवनी यांनी पुस्तकाचा अनुवाद उत्तम केला आहे. केवळ हिंदीच नव्हे तर मोठ्या परिश्रमाने मराठी नावे शोधून तीही दिली आहेत. प्रत्येक पक्षाचे चित्र, त्याच्या सवयी, विणीच्या हंगामातील बदल, आवाज, घरटे याबद्द्ल नीट माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच आहे