काथ्याकूट

By कांदा लिंबू, 16 January, 2026

(उर्फ: “निकाल आले, पण अर्थ कुणाला लागला?”)

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल आज अखेर जाहीर झाले आणि लगेचच राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा “आम्ही जिंकलो”, “नैतिक विजय आमचाच”, “जनतेने स्पष्ट कौल दिला” अशा घोषणांची आतषबाजी सुरू झाली. निकाल कोणताही असो, प्रत्येक पक्षाच्या गळ्यात विजयाची माळ, तर पराभवाची माळ मात्र नेहमीच “जनतेच्या चुकीच्या समजुतींनी” किंवा “ईव्हीएमच्या गडबडीने” दुसऱ्याच कुणाच्या गळ्यात पडलेली दिसते.

By चंद्रसूर्यकुमार, 16 January, 2026

समुद्राच्या अथांग विश्वात आढळणारा **स्टारफिश** (मराठीत *समुद्रतारा*) हा दिसायला जितका साधा आणि सुंदर वाटतो, तितकीच त्याची अंतर्गत रचना विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेषतः त्याची **पचनसंस्था** ही प्राणिजगतातील एक अद्वितीय रचना मानली जाते. इतर प्राण्यांप्रमाणे तोंड, अन्ननलिका, जठर आणि आतडी असा सरळ पचनमार्ग स्टारफिशमध्ये आढळत नाही. उलट, त्याची पचनक्रिया काही अंशी शरीराच्या बाहेरच घडते, ही गोष्ट त्याला इतर सागरी जीवांपेक्षा वेगळे स्थान देते.

By युयुत्सु, 16 January, 2026

व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्म

जगातले वेगवेगळे धर्म 'व्यक्तीस्वातंत्र्य' या कल्पनेकडे कसे बघतात, अशी उत्सुकता सक्काळी-सकाळी निर्माण झाली. मग ए०आय्०ला शरण गेलो. प्राथमिक शोध चॅटजीपीटीच्या मदतीने घेतल्यानंतर अधिक खोल शोध घेण्याची इच्छा निर्माण झाली. यासाठी जेमिनीसारखा दुसरा त्राता नाही.

जेमिनीने मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर 'जसेच्या तसे' कोणताही हस्तक्षेप न करता देत आहे. त्यामुळे माझा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

By ताजे प्रेत, 14 January, 2026

आज गुगल ने त्यांच्या डेटा सेंटर ची विजेची प्रचंड मागणी लक्षात घेऊन एक वीजनिर्मिती कंपनी विकत घेतली

एक भीषण गोष्ट लक्षात आली का ?
कोणी AI बद्दल काहीही ऐकले नसेल तेंव्हा २००४/५ मध्ये अडानी ने प्लान केला
आणि २००६ मध्ये पहिला पॉवर प्लांट उभारला

आणि अडानी पॉवर ने बराच विस्तार केला
अगदी विदेशातून कोळसा आणण्याचा पर्यंत केला

अगदी AI कोणी ऐकले नव्हते तेंव्हा २०१९ मध्ये अडानी ने डेटा सेंटर बिझनेस मध्ये प्रवेश केला .

कोणी त्यांना माहिती दिली असेल ? कशी त्यांना माहिती मिळत असेल ???
माझा थरकाप होत आहे

By शाम भागवत, 14 January, 2026

https://youtu.be/iMSlfNNhYcc?si=FxwPDV18AKiKCfX4&t=1
काल वरचा व्हिडीओ पाहिला. विचार करण्यासारखा वाटला. मग मी सारांश लिहून काढून मग तो मिसळपाववर टाकावा असे ठरवले. अर्घ्यातासाचा व्हिडीओ पहायला फारसा लोकांना वेळ नसतो. पण थोडक्यात कोणी सांगत असेल तर मात्र लोकं तयार असतात. हाच विचार करून हा प्रयोग करून पाहातो आहे. :)

By निनाद, 9 January, 2026

दूरवरची स्पष्ट प्रतिमा दाखवणार्‍या दुर्बीण किंवा बायनॉक्लर्स, बायनॉक्युलर्स Binoculars चर्चेसाठी हा धागा काढत आहे.

By मदनबाण, 3 January, 2026

P1
कराटे गर्ल्स ही एक प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा वेब सिरीज आहे, जी हल्लीच माझ्या पाहण्यात आली. ही २०२४ मध्ये प्रदर्शित झाली वेब सिरीज असुन हा पहिला सिझन आहे.

By Bhakti, 2 January, 2026

1
या रे या
stranger things च्या फ्यान लोकांनो
इकडे या
भावनांचे पाट वाहू द्या
stranger things ला भरलेल्या मनाने
गुड बाय करू या

By कांदा लिंबू, 1 January, 2026

सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!

सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना.

या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत.

तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

By ताजे प्रेत, 24 December, 2025

उद्या आहे नाताळचा सण. नाताळ उर्फ ख्रिसमस हा सण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून अत्यंत श्रद्धेने साजरा साजरा केला जातो. तसे पाहता येशू ख्रिस्त यांचा जन्म 25 डिसेंम्बर ला झाला याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. परंतु भोळ्या भाबड्या ख्रिस्ती समाजाची श्रद्धा म्हणून हा सण साजरा करण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही. पण सण साजरा करण्याची सुद्धा एक आचारसंहिता असली पाहिजे.