काथ्याकूट

By प्रकाश घाटपांडे, 8 February, 2026

आतापर्यंत उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. मध्यंतरी "जानव्याची पॉवर" हा मिपावरील धागा अप्रकाशित झाला. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे.

By kvponkshe, 5 February, 2026

सायबर सेक्युरिटी मध्ये मी आणि माझ्या वयाचे म्हणजे ५०शी च्या आसपासचे लोक एक नवीन आव्हान झेलत आहोत. पूर्वी म्हणजे २००० ते २०१० बिग ४ कंपनीत जॉब मिळणे म्हणजे एक शान होती. तिथे जॉब मिळाला तर उमेदवार उत्तम प्रतीचे कौशल्ये असणारा असणारच असे मानले जात होते. मी अनेकदा बिग ४ मध्ये प्रयत्न केला पण एकदाही यश आले नाही.

By तुर्रमखान, 2 February, 2026

खरं सांगायचं तर बजेट २०२६ मी पूर्णपणे ऐकलं नाही. संसदेतल्या दीर्घ भाषणाचा संयम माझ्यात नाही आणि तो असल्याचा आव आणणंही मला योग्य वाटत नाही. पण हो, सोशल मीडियावर फिरणारे मीम्स पाहिले, “निर्मला आंटीने रविवारीच बाजार कोसळवून इतिहास रचला” अशा हेडलाईन्स नजरेत आल्या. थोडंफार वाचलं, काही मुद्दे कानावर पडले. त्यामुळे माझी मतं पूर्ण बजेटवर नाहीत, तर ज्या मुद्द्यांनी थेट मला आणि माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांना टोचलं त्यांवर आहेत.

By कांदा लिंबू, 1 February, 2026

चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६

पाहता पाहता नवीन वर्षाचा पहिला महिना संपला. थर्टीफर्स्टची धुंदी अजून उतरलेली नसतानाच, स्नेहीजणांनी दिलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा अजून मनात असतानाच, त्यांनी दिलेल्या संक्रांतीच्या तिळगुळाचा गोडवा अजून जिभेवर असतानाच येत्या महाशिवरात्रीच्या उपवासाचे वेध लागले आहेत. नवीन वर्षाचा साडेआठ टक्के काळ संपून फेब्रुवारी महिना सुरूही झालाय.

काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे!

मागच्या महिन्यात स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

By प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, 30 January, 2026

बारामती येथे कोसळलेल्या 'व्हीटी-एसएसके' (VT-SSK) या लियरजेट ४५ बिझनेस विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्रभर दुःख, आवेग आणि शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दादांविषयी व सहप्रवाशांविषयी हळहळ व्यक्त होत आहे.

By नूतन, 21 January, 2026

नमस्कार मंडळी.
हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
मला तर तो अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. म्हणजे असं की , लग्न -मुंजी, शुभकार्य, त्या निमित्ताने होणारी देवाणघेवाण, हौस, बघितल्यावर घ्यावीशी वाटली म्हणून, कुणाला तरी तेवढीच मदत होईल म्हणून...अशा अनेक कारणांमुळे साड्या जमा होतात. कपाटं ओसंडून वहातात.
तीच साडी पुन्हा कुठे नेसायची? यामुळे हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या या साड्या पडून रहातात. इतक्या सुंदर आणि हौशीने घेतलेल्या साड्या द्यायच्या तरी कोणाला आणि किती? कारण आता दुसऱ्याचे कपडे कोण वापरतं?