लेखकाचे चित्र
लेखकाचा पत्ता
http://www.sandeshbhandare.com

छाया प्रकाशाच्या माध्यमातून, मानवी स्थितीची अवस्था कॅमेऱ्यात अचूकपणे टिपणारे छायाचित्रकार म्हणून संदेश भंडारे सर्वांना परिचित आहेत. मानव त्याच्या भोवतीचे पर्यावरण नित्याच्या वापरातील वस्तू असे विषय त्यांच्या छायाचित्रणातून समोर येतात.

'पुणेरी ब्राह्मण, देवळी-कोनाडे, कुस्तीचा आखाडा, बहुरुपी, वारी-एक आनंदयात्रा, तमाशा-एक रांगडी गंमत' अशा छायाचित्र मालिकांतून त्यांनी छायाचित्रण कलेतले वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यांच्या छायाचित्रांकडे कलाकृती म्हणून पाहण्याबरोबर त्यातील सामाजिक संदर्भही महत्त्वाचा आहे. त्यांनी 'प्लॅन इंटरनॅशनल' या संस्थेसाठी केलेल्या बालकांच्या शारीरिक व मानसिक विकास अवस्थांचे छायाचित्रण ही सामाजिक छायाचित्रणाच्या क्षेत्रातील महत्त्वाची उपलब्धी आहे. पुणेरी ब्राह्मण, मुंबई विद्यापीठ, वारी-एक आनंद यात्रा, तमाशा-एक रांगडी गंमत, असाही एक महाराष्ट्र ही त्यांची पुस्तकेही प्रसिध्द झाली आहेत.