पुस्तकाचे नाव
वल्ली

आत्मचरित्र दिसतेय. वाचलेले नाही हे स्पष्टच आहे. तसेही मी कुणाचेही आत्मचरित्र अजून वाचलेले नाहीच. अपवाद गोनीदांच्या स्मरणगाथा आणि दुर्गभ्रमणगाथेचा. पण ती तशी आत्मचरित्रे नसून आठवणींचा कोलाज.
तात्पर्यः संकेत हवाच.

Fri, 11/03/2011 - 21:55 Permalink
चित्रा राजेन्द…

In reply to by वल्ली

वल्ली,
आता पुलंची पत्रे कुठे कुठे शोधायची?
हे खरेच अवघड काम आहे की......

Sat, 12/03/2011 - 11:17 Permalink
सागर

In reply to by वल्ली

बर ठीक आहे अजून एक संकेत थोड्या वेळाने देतो.
पण संकेत खूप स्पष्ट आहेत रे.. थोडा ताण दे..
सध्या एकटा जीव सदाशिव आहे १ आठवड्यापुरता तेव्हा बाहेरुन पेटपूजा करुन येतो. :)

Sat, 12/03/2011 - 11:18 Permalink

एवढे संकेत दिले आहेत की कोणीही हे पुस्तक ओळखावे :)

या कोड्याला अजून एकही विजेता मिळालेला नाहीये.
पण नव्या संकेतावरुन कोणीही हे ओळखावे....

बहुतेक या पुस्तकातील एक धडा शालेय अभ्यासक्रमात असावा असे अंधुक आठ्वते आहे. पण नक्की नाही आठवत

Sun, 13/03/2011 - 13:33 Permalink
वल्ली

काल मी दिवसभर ट्रेकला गेलो होतो तेव्हढ्यात तू मोठा संकेत दिलास आणि त्यापाठोपाठ उत्तरही जाहीर करून टाकलेस आणि कोड्याला अजून एक विजेता मिळण्याची संधी हुकवलीस. :)

Mon, 14/03/2011 - 10:08 Permalink

चित्राने दिलेल्या वेच्याला २ विजेते मिळाले आहेत आणि जवळपास त्याचे उत्तर फक्त जाहीर करायचे बाकी आहे म्हणून हा नवीन वेचा देत आहे.

या कोड्याचे पहिले विजेते आहेत स्पिन डॉक्टर.
चित्राने पण ओळखले, चित्रा दुसरी विजेती आहे.
तिसरे विजेते श्रावण मोडक
आणि चौथे विजेते देवेन्द्र प्रभुणे

चार उत्तरे एकापाठोपाठ आल्याने उत्तर जाहीर करतो आहे. :)
पुस्तकाचे नाव : कोसबाडच्या टेकडीवरुन
लेखिका : अनुताई वाघ (त्यांच्या लेखनाला व्यवस्थित आकार देताना अशोक चिटणीस यांनी संपादनाचे काम केले)
वेच्याचे पुस्तकातील स्थान : पान क्र. ४६ (आवृत्ती पाचवी) माझी माणसे माझी घडण या पहिल्याच प्रकरणातला हा वेचा आहे. अनुताई वाघ यांच्यावर ताराबाई मोडक यांचा खूप प्रभाव होता. त्यांचेच काम अनुताईंनी पुढे नेऊन त्याला मूर्त रुप दिले व शिक्षणपद्धतीत क्रांतीकारक असा बदल घडवण्यात मोठी भूमिका बजावली.

------------

वाचले असेन तर वेच्यावरुन पुस्तक कोणते ते लगेच कळेल :)

संकेत क्र. १ : हे एका स्त्रीचे आत्मचरित्र आहे.
संकेत क्र. २ : या चरित्रातील स्त्रीच्या कार्याचा गौरव पु.ल. देशपांडें यांनी स.ह.देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे. स.ह.देशपांडे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे.
संकेत क्र. ३ : भारत सरकारने त्यांच्या कामाचा गौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन केला आहे.
संकेत क्र. ४ : यांच्या जीवनावर एक स्त्रीचा खूप मोठा प्रभाव होता. या बाईंनी चालू केलेली शिक्षण पत्रिका नंतर चरित्रनायिकेने सांभाळली व आजतागायत तिचे प्रकाशन चालू आहे.
(उद्यापर्यंत कोणी उत्तर दिले नाही तर सहज ओळखता येईल असा संकेत देईन)
संकेत क्र. ५ : शिक्षणपद्धतीत एक क्रांती घडवणारी स्त्री म्हणून यांना ओळखले जाते. गरिब आदिवासींना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आयुष्याची कित्येक वर्षे दिली. पद्मश्री , महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार असे अनेक पुरस्कार यांना मिळाले आहेत. एवढ्या संकेतांवरुन आता कोणीही ओळखू शकेल :)

वेचा:
---------------------------------
लो. टिळक स्वर्गवासी होऊन फक्त ३-४ वर्षेच झालेली. त्यामुळे त्या काळातील लो. टिळक जयंतीस अपार महत्त्व. वातावरणही उत्साहाचे. त्याची कल्पना कदाचित आज येणारही नाही.
मी तर 'टिळक राष्ट्रीय कन्या शाळे'ची विद्यार्थिनी! मला वक्तृत्त्वस्पर्धेत संधी मिळालीच पाहिजे, असा आमच्या माईंचा आग्रह!
शेवटी संयोजकांनी माईंना सांगितले, "भाषण करण्यास परवानगी देऊ. पण स्पर्धक म्हणून बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही!"
माईंनी मला ८ फुलस्केप कागदांवर लो. टिळकांचे विषयी चरित्रपर भाषण माझ्याकडून वदवून घेतले.
गच्चीवर लांब अंतरावर खुर्ची टाकून माई बसायच्या. मला दुसर्‍या टोकाला उभे ठेवून भाषण करायला सांगत. त्या काळी माईक, लाऊडस्पीकर्स नव्हते. त्यामुळे त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने भाषण करावे लागे. "आवाजात चढउतार हवा, तोंडावर भाव हवेत," अशा माईंच्या सूचना असत. भाषणाची जय्यत तयारी करवून घेतली. मग स्पर्धेच्या वेळी मी भाषण केले.
परीक्षकांनी तोंडभरुन माझी स्तुती केली. परीक्षक स्पर्धेनंतर म्हणाले,
"स्पर्धेत मुलींना भाग घेता येत नाही, या तांत्रिक अडचणीमुळे हिला बक्षीस देता येत नाही. पण नंबर कुणाचा आहे, ते सांगायला नकोच!"
परीक्षकांचे ते उद्गार मला अजून आठवतात. सभेत धीटपणे बोलण्याचा हा पहिला धडा मला आजही उपयोगी पडतो.
---------------------------------