मिलिंद बोकील ह्यांची ‘समुद्र’ ही कादंबरी आपल्या ‘पुवि’ च्या यादीमध्ये समाविष्ट करावी ही विनंती.
ह्या पुस्तकाचा परिचय वाचण्यासाठी खालील लिंकवर जा --
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=archive&filte…
आणि
पुस्तकाचे पान - रविवार, ११ एप्रिल २०१०
लोकरंग - पुस्तकाचे पान
विचारांना दिशा देणारं पुस्तकचित्रा राजेन्द्र जोशी - रविवार, ११ एप्रिल २०१०लग्नगाठी स्वर्गातच ब�...
येथे क्लिक करा
भास्कर नंदिनी....आणि विश्वास...!!
"तू वाच इन्द्रा ही तुझ्या मिलिंद बोकीलाची तिसरी कादंबरी...अन् मग सांग मला ती तुला 'शाळा' इतकीच आवडत्ये का."
"अरे, मी 'समुद्र' विकत घेणारच होतो....आणि मुद्दाम त्यावरील परिक्षणही वाचले नाही, पूर्वग्रह प्रस्थापित होईल म्हणून."
"ते काही असो. पण मी यातला भास्कर होऊ शकत नाही, इन्द्रा. मला नाही इतका मोठा होणं जमेल."
"वेल, मी यावर काही भाष्य करायला नालायक आहे, कारण अर्थातच 'समुद्र' वाचल्ये नाही अजून...!"
'होय, मला तेही माहित आहेच, पण तू ती आज रात्रीच वाच. ९० पाने तर आहेत खच्चून. होईल रात्रीतच."
"ठीक....आज रात्रीच..."
रात्र.....पान क्रमांक ९०...."स्वतःशीच हसत छातीवरच पट्टा सारखा केला आणि इंजिनाच्या आवाजात समुद्राची गाज आठवत तो संथपणे गाडी चालवत राहिला...."
परत जाणीवपूर्वक पहिले पान..."अॅक्सिलेटरवर पाय दाबला....गाडी दमदार वेगाने पळू लागली...सकाळची वेळ, डाव्या बाजूने सूर्य वरती आलेला पण ऊन अद्याप भ्हसत नव्हते...वाटले नंदिनीला उठवून सांगावे; बघ, गाडी कशी पळतीये ती. पण ती आता गाढ झोपून गेली होती..."
दोन प्रसंग ~ शेवटीही नंदिनी मागे गाढ झोपली होती...पण भास्कर गाडी संथपणे चालवत होता...तर प्रवासाच्या सुरुवातीलाही नंदिनी मागे गाढ झोपली होती...पण भास्कर गाडी पळवत होता. दोन्ही संकेत इतके महत्वाचे आहेत की तिथेच कादंबरीचे सार आहे....[वेग का वाढत होता....आणि आता तो संथ का झाला, याबद्दल खरेतर सविस्तर लिहिता येईल, पण मग ज्याने/जिने "समुद्र' वाचलेली नाही, त्याबाबत मग रसभंग होईल.]
"हॅल्लो दिलीप...इन्द्रा बोलतोय....'समुद्र' बद्दल बोलू काय?"
"गो अहेड, मला खात्री होती की तू ती रात्री पूर्ण करणार....आणि भास्करने नंदिनीला परत गाडीत घेणे चुकीचे आहे असे म्हणणार....राईट?"
"नोप....आय नेव्हर वुड से सो, फ्रेण्ड ! ऑन द कॉन्ट्ररी, हॅड इट बीन सो, देन मि.बोकील सर्टनली हॅड सम रॉन्ग नोशन्स अबाऊट नंदिनी'ज कॅपॅबिलिटीज टूवर्डस इंडिपेन्ड्न्ट थिंकिंग. आय मस्ट अॅडमायर हर फ्रॅन्क अॅडमिशन."
"तु लेका अजून सिंगल आहेस म्हणून असं म्हणू शकतोस. पण ज्या मित्राचे लग्न झाले आहे त्याचे मत विचारात घे."
"सॉरी....एकतर लग्न झाले नाही म्हणून एक मत व उद्या झाले म्हणून सरड्याप्रमाणे मतबदल....असे होऊ देणार नाही."
"पाहू या..."
"पाहाच...मीनव्हाईल...बास्केटफुल ऑफ थॅन्क्स फॉर रेकमंडिग वन ऑफ फॅब्युलस बूक्स ऑफ धिस डीकेड..."
मौजेने ब्लर्बवर म्हटलेच आहे..."मिलिंद बोकील यांच्या प्रतिभेचे एक नवे रूप प्रकट होताना इथे जाणवते..." अगदी खरं.
थॅन्क्स चित्रा....मी कादंबरी अगोदर वाचलीच होती, पण या निमित्ताने तुमचा ११ एप्रिल २०१० चा यावरील लेखही आत्ता वाचला. कादंबरीवरील तुमचे प्रेमही त्यातून तितक्याच अवीट गोडीने प्रकट झाले आहे.
इन्द्रा
या पुस्तकाबद्दलचा लेख
आपण हा लेख वाचलात का?
In reply to या पुस्तकाबद्दलचा लेख by प्रभाकर नानावटी
क्षमस्व!
होय. तुमचा हा लेख वाचला. पण तुमचे विचार मला तितकेसे पटले नाहीत. क्षमस्व!
मी ह्या सार्याकडे वेगळ्या पध्दतीने बघितले आणि मला जे वाटले ते मी माझ्या लेखात म्हटले आहे.
आणखी एक
याच पुस्तकावरचा आणखी एक लेख
http://mr.upakram.org/node/3153
In reply to आणखी एक by मुक्तसुनीत
आभार....
मुक्तसुनीत,
आवडत्या ले़खकाच्या आणि आवडत्या पुस्तकाच्या विषयी अनेकांनी किती भरभरून लिहिले आहे, पटलेले-न पटलेले, सर्वकाही. अर्थात सर्वात जास्त आवडला सन्जोप राव ह्यांनी करून दिलेला पुस्तक-परिचय!
ह्या माहितीबद्दल मनापासून आभारी आहे.