भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००७
किंमत
200.00
पृष्ठसंख्या
240

जीवनात भावलेल्या आणि भारवून टाकणार्‍या काही माणसांच्या व्यक्तिमत्वांचा विलोभनीय परिचय प्रसिद्ध ललित लेखक श्री. वसंत चिंचाळकर यांनी सगेसोयरे या ललित व्यक्तिचित्रांमध्ये करून दिला आहे. सा,रे,ग,म,प,ध,व नी या सात सूरांच्या वर्गवारीतून ही सर्व मंडळी आपल्याला जवळून भेटतात अन्‌ भारावून टाकतात. यात काही सार्वजनिक जीवनातील थोर व्यक्ती आहेत, तर काही नेहमीच्या जीवनातील सामान्य व्यक्ती. पण प्रत्येकात काही विलक्षण वेगळेपण आहे आणि ते लेखकाने नेमकेपणाने व हळुवारपणे टिपले आहे.