२६/११ च्या रात्री अतिरेक्यांशी लढताना वीरमरण पत्करणारे मुंबईच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांची ही जीवन कहाणी. भारतीय पोलीस दलातल्या एका अत्यंत साहसी आणि कार्यक्षम अधिकार्याची ही प्रेरणादायी जीवनकहाणी त्यांची पत्नी विनीता यांनीच सांगितली आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या या हल्ल्याचे नेमके सूत्रधार कोण, त्यांना अटक होणार की नाही, अजमल कसाबला शिक्षा कधी होणार, अशोक कामटे, करकरे, साळसकर यांचा मृत्यू नेमका कशा पद्धतीने झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लोक शोधत आहेत. धडाडीचे पोलिस अधिकारी अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता यांनी या तीनही पोलिस अधिकार्यांचा त्या दिवशी कशा प्रकारे मृत्यू झाला, हे शोधून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी २६ नोव्हेंबर रोजी कामा हॉस्पिटलजवळ काय घडले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या शोधाचे निष्कर्ष त्यांनी "टू द लास्ट बुलेट' या पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडले आहेत. भगवान दातार यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.
भाषा
मराठी
आवृत्ती
चौथी , एप्रिल २०१०
किंमत
192.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
240