दास कॅपिटल
जेव्हा माणूस जागा होतो
१९७२ सालचे साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवलेले पुस्तक.
ठाणे जिल्ह्यातील डहाणू-तलासरी भागातील आदिवासी वस्त्यांमधल्या भुकेकंगाल लोकांपर्यंत, मुख्य म्हणजे पिढय़ान्पिढय़ा गुलामीचे जिणे जगत असलेल्या त्यांच्या थिजलेल्या मनापर्यंत पोहोचण्याचे खडतर कार्य चिकाटीने करणार्या गोदावरी परुळेकर यांचे अनुभवकथन म्हणजे ‘जेव्हा माणूस जागा होतो’.
असाही एक महाराष्ट्र
महाराष्ट्रातील विविध भागातील कष्टकऱ्यांचा, लहान व्यावसायिकांचा, रोजंदारीवर काम करणा-या व्यक्तिंचा ख्यातनाम छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी छायाचित्रांच्या माध्यमातून घेतलेला वेध 'असाही एक महाराष्ट्र' च्या निमित्ताने मिळणार आहे.
पिंजर
Conquest of Happiness
बर्ट्रांड रसलने पैशांसाठी लिहीलेले पुस्तक! "पैशांसाठी" हा शब्द अशासाठी की रसलचे रूढीविरोधी विचार या पुस्तकात नाहीत. आनंदात जगण्यासाठी आपणच अडथळा निर्माण करतो त्यांना मागे टाकण्यासाठी लिहीलेलं सुबोध पुस्तक! अतिशय सोप्या शब्दांमधे मांडलेले विचार नक्कीच आचरणीय!