गौरवशाली भारतीय कालगणना

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम
किंमत
50.00
पृष्ठसंख्या
48

इतिहासाचा आधार असते कालगणनेची संदर्भ रेषा. त्यामुळे योग्य इतिहासाचे भान येण्याकरिता भारतीय कालगणना माहीत हवीच. काल ही चौथी मिती आहे. या कालगणनेचा भारतीयांनीही किती व्यापक, सखोल व शास्त्रीय विचार केला आहे, याची संपूर्ण साधार माहिती गौरवशाली भारतीय कालगणना यात आहे. कालगणना हा फक्त ज्योतिष्य किंवा विद्‌वानांचा बोजड विषय आहे, असे समजून आपण सामान्य माणसे यापासून दूर राहतो. परंतु असे नाही. आपल्यालाही ते सहज समजू शकेल, अशी सोपी व नेमकी मांडणी यात आहे. जगभर सोमवार नंतर मंगळवारच येतो. तसा तो का येतो, या सारख्या अनेक संकल्पनांचे स्पष्टीकरण फक्त भारतीय कालगणनाच देऊ शकते.

श्री गुरुग्रंथसाहेब परिचय

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००८
किंमत
40.00
पृष्ठसंख्या
48

देशभरातील नानाविध जाती जमातीतील संत महात्म्यांच्या अभंगांचा साठा असलेले श्री गुरूग्रंथसाहेब म्हणजे सर्व मानवी समाजासाठी आदर्श आहे. सामाजिक समरसतेचा, श्रम प्रतिष्ठेचा, साधेपणाचा व उच्च मानवी मूल्यांचा संदेश देणाऱ्या या श्री गुरूग्रंथसाहेबाचा परिचय सर्व समाजाला सोप्या भाषेत करून दिला आहे प्रसिद्ध लेखिका श्रीमती उत्तरा हुद्दार यांनी. श्री गुरूग्रंथसाहेबास गुरूपद मिळाल्यास यंदा 300 वर्ष झाली, त्यानिमित्त ही आदरांजली.

श्री गुरुचरित्र

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००७
किंमत
300.00
पृष्ठसंख्या
400

कोणत्याही कर्मकांडाचा कंटाळा असणाऱ्या पर्यंतही आध्यात्मिक ज्ञान पोहचावे. ज्यांना वय/प्रकृती आदी नानाविध कारणांमुळे मूळ अलौकिक श्री गुरूचरित्राचे वाचन/पारायण इच्छा असून शक्य होत नाही आणि साररूपाने ज्यांचे समाधान होत नाही, अशा सर्वांसाठी श्री गुरूचरित्र जसे आहे तसे हा अनुवाद दत्तभक्त श्री. बाळ पंचभाई यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीने सिद्ध केला आहे. सर्व प्रकारच्या भाविकांनी याचे वाचन करून भावार्थ जाणावा व स्वत:चे कल्याण करून घ्यावे, यासाठी हे प्रकाशन आहे. केव्हाही, कुठेही, कोणालाही, कसेही याचे वाचन करता येईल, हे याचे वैशिष्ट्य होय.

साधनामस्त

भाषा
मराठी
आवृत्ती
सातवी
किंमत
220.00
पृष्ठसंख्या
256

साधनामस्त हे श्री. जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेले दुसरे पुस्तक. पहिले पुस्तक नर्मदे हर. पहिली नर्मदा परिक्रमा केल्यानंतर नर्मदे हर ची निर्मिती झाली.
त्यानंतर जगन्नाथबुवांना मोठ्या नर्मदा परिक्रमेची आज्ञा झाली, त्याप्रमाणे त्यांनी नर्मदा परिक्रमा ३ वर्ष ३ महिने आणि १३ दिवसांत पूर्ण केली त्याचा सविस्तर वृत्तांत आणि साधनामार्गातील अनुभव यांचे सुरेख वर्णन जगन्नाथबुवांनी केले आहे.

अध्यात्म मार्गात रुची असणार्‍या प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.